रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

अक्षरी भूमापन क्रमांक/ गट क्रमांक दुरूस्त करणेबाबत.

 

 

                                    

विषय:   अक्षरी भूमापन क्रमांक/ गट क्रमांक दुरूस्त करणेबाबत.

 

 

  संदर्भ:-शासन परिपत्रक क्रमांक दिनांक 13/11/2002

 

महोदय,

                                                                                                                                                                                                                                                                                                        

                    उपरोक्त विषयाबाबत डिजीटल इंडिया लँड रेकॉर्ड मॉडलायझेशन प्रोग्राम अंतर्गत संगणकीकृत अधिकार अभिलेखांचे अचूक डेटाबेस तयार करण्यासाठी महसुल विभागाने अनेक उपाय योजना तयार करून 98.65% अचूकता साध्य केली आहे.त्यासाठी सर्वाचे अभिनंदन .

 

                    शासनाच्या दिनांक 13/11/2002 च्या परिपत्रकाप्रमाणे 7/12 उतारे संगणकीकरण करण्यासाठी आवश्यक दप्तर अद्यावतीकरण करण्यासाठी सर्वसमावेशक सुचना देण्यात आल्या होत्या. त्यामध्ये भूमापन क्रमांक/ हिस्सा क्रमांक कसा लिहावा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले होते. असे असुनही 7/12 संगणकीकृत करतांना अनेक ठिकाणी स.नं. व त्याचा हिस्सा क्रमांक योग्य पध्दतीने न लिहिल्याने हा संगणकीकृत 7/12 अन्य विभागांना लिंक करतांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो.

 

                           यासाठी ODC अहवाल क्रं. 9 मध्ये चुकीच्या पध्दतीचे भरलेले क्रमांक दर्शविण्यात आलेले आहे. व यासाठी आदेश व दस्तवेज या फेरफार प्रकारातुन स. नं. बदलने हा पर्याय वापरून दुरस्ती देखील करता येते. कोणताही स.नं./ ग.नं. लिहितांना तो त्याच्या पोटहिस्सा सह 1ते9 रकान्यात नमुद करणे आवश्यक असते. पहिल्या रकान्यात फक्त इंग्रजी अंक स.नं./ ग.नं. नमुद करून स.नं./ग.नं.चे हिस्सा नं. पुढिल Pin -1 To Pin-8 या रकान्यात नमुद करणे आवश्यक आहे. पहिल्या रकान्यात कोणतेही अक्षर किंवा मराठी अंक किंवा इंग्रजी अंक व अक्षर एकत्र लिहिणे अपेक्षीत नाही. तथापी Pin -1 To Pin-8 या रकान्यात फक्त इंग्रजी अंक व मराठी अक्षर नमुद करता येईल आणि शेवटच्या Pin-8 मध्ये + किंवा / नमुद करता येईल अशी वस्तुस्थिती असतांना अनेक ठिकाणी स.नं. व पोटहिस्से योग्य पदध्दतीने नमुद केले नाही. यामध्ये पहिल्या रकान्यात खालीलप्रमाणे त्रृटी/ चूका दिसून येतात.

 

एन.ए.,

बिनशेती सं.नं.,

एस एन नं.,

16 ते 23, 25, 27 ते 29

पर्डी नं., रस्ता,

प.न. , पैकी,

प्रासव्हेट,

प्रा.स्किम,

61,62,63,

बी,

स्किम,

5-3 21.1,

वार्ड क्रं.,

विनाअंकी जुना गट नं.,

बिन भोगवटादार

मराठी अंक ११९५

गावठाण, गा.पं.नं.,

50+51+52,

खुबडा,

खुले गावठाण,

गुरचरण,

गावं,

महार परडी,

गावंठाण प्लॉट,

मळई, गाळपेरा,

,

फ्लॅट नं.

                      

           वरिलप्रमाणे त्रृटीयुक्त अक्षरी स.नं./ ग.नं. दुरूस्त करण्यासाठी तहसिलदार यांनी गावनिहाय सं.नं. दुरूस्तीचे आदेश काढून या आदेशाची अंमलबजावणी तलाठी यांनी आदेश व दस्तावेज या फेरफार प्रकारातुन सं.नं. बदलणे हा पर्याय वापरून करावी. यासाठी या मार्गदर्शक सुचना सोबत चुकीच्या पध्दतीने लिहीले सं.नं. ची  जिल्हानिहाय यादी जोडण्यात आली आहे.

                             तरी याबाबत संबंधीत तहसिलदार यांनी स.नं./ ग.नं. दुरूस्तीची कार्यवाही करावी. याबाबत गरज असल्यास संबंधीत उप अधिक्षक भूमि अभिलेख यांचे सहकार्य  घ्यावे. व या आदेशाने होणा-या फेरफाराच्या प्रतीसह आदेशाची प्रत उप अधिक्षक भूमि अभिलेख व संबंधीत खातेदार यांना माहितीसाठी पाठवावी.

                            वरिलप्रमाणे मार्गदर्शक सुचना सर्व संबंधीत यांच्या निदर्शनास आणुन दयाव्या 

हि विनंती.

 

 

 

 

  (रामदास जगताप)

उपजिल्हाधिकारी तथा

राज्य समन्वयक, ई- फेरफार

जमाबंदी आयुक्त कार्यालय ,पुणे

 

 

 

Comments

Archive

Contact Form

Send