रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

ई फेरफार प्रणालीतील नवीन सुधारणा – १९ एप्रिल २०२१ पासून पुणे रायगड आणि जळगाव मध्ये टेस्टिंग सुरु

ई फेरफार प्रणालीतील नवीन सुधारणा – या सर्व नवीन सुविधा पुणे रायगड आणि जळगाव जिल्ह्यात खालील लिंकवर टेस्टिंग साठी उपलब्ध करून दिल्या आहेत. कृपया तपासून feedback देण्यात यावा लिंक - https;//mahaferfarnas.enlightcloud.com/scotestsite5/ १. ई फेरफार घेताना अनेक वेळा मेनू मध्ये येवून पुढील काम करावे लागत होते आता त्याच पेज वर next बटन दिले आहे त्यामुळे नोंद घेताना वेळेची बचत होईल . २. ई फेरफार मध्ये या पूर्वी प्रत्येक सातबारा व नमुना ९ ची नोटीस pdf केली जात होती आता त्याची गरज नाही सर्व ठिकाणी डिजिटल स्वाक्षरी घेतली जात असल्याने pdf स्वाक्षरी करण्याची गरज नाही. ३. एकाच दस्त प्रक्रिया करताना अनेक क्लिक करावे लागत होते ते कमी करून अनेक स्टेप्स आत्ता एका क्लिक वरच प्रक्रिया पूर्ण होईल. ४. तलाठी स्थरावर फेरफार डिजिटल स्वाक्षरीत करणे व नोटीस तयार करण्यासाठी फिफो लागू करण्यात आला आहे. ५. तलाठी यांनी कोणत्याही फेरफार साठी अपलोड केलेली कागदपत्र सर्व वरिष्ठ अधिकारी यांना पाहण्यासाठी उपलब्ध राहतील. ६. भूधारणा वर १ , वर्ग २ , सरकार आणि सरकारी पट्टेदार या चारही भूधारणा चे उप प्रकार बदलण्याची सुविधा कलम १५५ अन्वये भूधारणा उप प्रकार बदले ची सोय उपलब्ध करून दिली. ७. भोगवटादार वर्ग २ व वर्ग १ मध्ये भूसंपादन करून वाटप केलेल्या जमिनी आणि वक्फ जमिनी हे दोन उप प्रकार नव्याने उपलब्ध करून दिले आहेत. ८. ई हक्क प्रणालीतून आलेले वारस नोंदीचे अर्जाचे थेट गाव नमुना न. ६ क (वारस नोंदवही ) रुपांतरीत होवून त्याचे निर्णयानंतर वारस ठराव प्रमाणे वारस फेरफार होण्याची एकत्रित सुविधा देण्यात आली आहे. ९. DDE Login ला -अतिरिक्त तहसिलदार कार्यालयाचे नाव व ठिकाण नमूद कण्यासाठी नवीन सुविधा देण्यात आली आहे. १०. डी बी ए लोगिन ला तलाठी व मंडळ अधिकारी यांची बायोमेट्रिक नोंदणी सुविधा Secugen व Precision biometric device वापरून करता येईल . ११. DDE Login ला डी.बी.ए. आणि तहसीलदार यांचे मराठी व इंग्लिश मधील नावात दुरुस्ती करण्याची सुविधा देण्यात आली आहे. १२. Precesion किंवा Secugen biometric मशीन द्वारे नोंदविलेले वापरकर्ते यांचे अंगठे त्यापैकी कोणत्याही एका मशीन ने पडताळणी करता येईल. १३. SRO कडून येणाऱ्या सर्व नोंदणीकृत दस्तातील (सूची २ मधील) दस्त करून देणार व घेणार यांचे नाव, पत्ते, मोबाईल नंबर ई मेल आय डी तलाठी यांना नोटीस तयार करताना उपलब्ध करून दिले आहेत. १४. एक लक्ष पेक्षा मोठ्या नंबर चा खाते क्रमांक तयार करण्याच्या सुविधेतील अडचण दूर करण्यात आलेली आहे. १५. भाडे पट्टा फेरफार मध्ये भाडेपट्टा मुदत ९९९ वर्षे पर्यंत ची सोय दिली आहे. १६. ई हक्क प्रणालीत फेरफार नोंदविण्यासाठी सोय असलेले फेरफार आता ई फेरफार मध्ये नोंदविता येणार नाहीत. तलाठी यांचे कडे प्रत्यक्ष आलेले आठ प्रकारचे अर्ज तलाठी यांना देखील ई हक्क मधूनच भरावे लागतील. १७. ई हक्क अर्ज प्रणालीचे अर्जांवर फेरफार नोंदविताना देखील फिफो लागू केला आहे. १८. अहवाल ३१ मधील imaginary mutation number ची अडचण दूर केलीये आहे. १९. गोंदिया जिल्ह्यातील सात गावे व जिवती तालुक्याच्या सर्व अडचणी दूर केल्या आहेत. आपला रामदास जगताप दिनांक १९.४.२०२१

Comments

Archive

Contact Form

Send