1.इकरार- जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकांकडून शेतकऱ्यांना
वितरीत होणारे पीक कर्ज विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीमार्फत
खातेदाराकडून करून घेतलेल्या कराराप्रमाणे मंजूर केले जाते त्यास इकरार असे
म्हणतात.त्याची नोंद गाव नमुना न. ७/१२
च्या इतर हक्कात घ्यावी
लागते.त्यासाठी विविध कार्यकारी सोसायटीतील सचिव यांनी असा इकरार संबंधित तलाठी यांकडे ई-हक्क
प्रणालीतून दाखल करण्यासाठी https://pdeigr.maharashtra.gov.in/Helpfile.aspx या संकेतस्थळावर नोंदणी करून इकराराच्या छायाप्रतीसह असे अर्ज दाखल करावेत.
सोसायटीची
नोंद करण्याकरीता ऑनलाईन अर्ज
करण्यासाठी खालील माहिती जवळ असणे आवश्यक आहे
१. ज्या
जमिनीवर नाव लावायचे ते स्थान (जिल्हा,तालुका,गाव,गट/सर्वे नं.)
२. अर्जदाराचे संपूर्ण नाव
३. अर्जदाराचा मोबाईल नंबर
४. अर्जदाराचा इ-मेल
आय डी (असल्यास)
५. सोसायटी
चढविण्यासाठी सोसायटीचे पत्र
खालील कागदपत्रे जोडणे आवश्य आहे (कागदपत्रांच्या स्कॅन कॉपी फक्त ब्लॅक ऍंड
व्हाईट पी.डी.एफ फॉर्म मधील
)
१. अर्जदाराचे ओळखपत्र
२. सोसायटी इकरारची प्रत
2.
बोजा चढविणे / गहाणखत - शेतकरी जमिनीवर जे
कर्ज घेतात त्याची नोंद गाव न.नं.७/१२ च्या इतर हक्कात घेतली जाते त्याला ’बोजा’
असे म्हणतात. हि नोंद ज्या फेरफाराने होते त्याला ’बोजा चढविणे’ असे म्हणतात.’बोजा चढविणे’ साठी ऑनलाईन अर्ज नागरिक स्वतः,तलाठी अथवा ज्या
बॅंकेकडून कर्ज घेतले आहे ती बॅंक देखील करु शकते.
बोजा चढविणे / गहाणखताची नोंद करण्याकरीता ऑनलाईन अर्ज
करण्यासाठी खालील माहिती जवळ असणे आवश्यक आहे
१. ज्या
जमिनीवर नाव लावायचे ते स्थान (जिल्हा,तालुका,गाव,गट/सर्वे नं.)
२. अर्जदाराचे संपूर्ण नाव
३. अर्जदाराचा मोबाईल नंबर
४. अर्जदाराचा इ-मेल
आय डी (असल्यास)
५. बोजा चढविण्यासाठी बँकेचे पत्र अथवा
गहानखताच्या दस्ताची प्रत
खालील कागदपत्रे जोडणे आवश्य आहे (कागदपत्रांच्या स्कॅन कॉपी फक्त ब्लॅक ऍंड
व्हाईट पी.डी.एफ फॉर्म मधील
)
३. अर्जदाराचे ओळखपत्र
४. बँकेच्या पत्राची प्रत अथवा गहानखताची प्रत
3. बोजा कमी करणे :
शेतकरी
जमिन तारण ठेऊन जे कर्ज घेतात त्याची
नोंद ७/१२ वर घेतली जाते त्याला ’बोजा’ असे
म्हणतात. हि नोंद ज्या फेरफाराने होते त्याला ’बोजा
चढविणे’ असे म्हणतात . ज्यावेळी शेतकरी कर्ज फेडतात,
त्यावेळी ७/१२ वरील ’बोजा’ची नोंद कमी होणे आवश्यक असते.
हि नोंद ज्या फेरफाराने होते त्याला ’बोजा कमी
करणे’ असे म्हणतात . ’बोजा कमी
करणे’ करणे साठी
ऑनलाईन अर्ज नागरिक स्वतः करु
शकतात, ज्या बॅंकेकडून कर्ज घेतले आहे ती बॅंक देखील करु
शकते.
बोजा कमी करण्याकरीता ऑनलाईन अर्ज
करण्यासाठी खालील माहिती जवळ असणे आवश्यक आहे
१. ज्या जमिनीवर नाव लावायचे ते स्थान
(जिल्हा,तालुका,गाव,गट नंबर/सर्वे नं, कर्जदाराचे नाव )
२. अर्जदाराचे संपूर्ण नाव
३. अर्जदाराचा मोबाईल नंबर
४. अर्जदाराचा इ-मेल
आय डी (असल्यास)
खालील कागदपत्रे जोडणे आवश्य आहे(कागदपत्रांच्या स्कॅन कॉपी फक्त ब्लॅक ऍंड
व्हाईट पी.डी.एफ फॉर्म मधील
)
१.
अर्जदाराचे
ओळखपत्र
२.
बँकेच्या पत्राची प्रत
4. वारस :
कोणताही
खातेदार विनामृत्युपत्र मयत झाला असल्यास त्याच्या मिळकतीला त्याच्या कायदेशीर
वारसांची नावे दाखल केली जातात या प्रक्रियेला वारसनोंद असे म्हणतात . मयत
खातेदाराने धारण केलेल्या ( भोगवटदार अथवा कुळ म्हणून ) जमिनीच्या गाव नमुना
नं.७/१२ वर सर्व वारसांची नावे दाखल करण्यासाठी वारासापैकी एकाला वारस हा
फेरफार प्रकार निवडून वारस नोंदी साठी जमीन ज्या गावात आहे त्या तलाठ्याकडे
ऑनलाईन अर्ज दाखल करता येईल.
वारसांची
नोंद करण्याकरीता करावयाच्या ऑनलाईन
अर्जासाठी खालील माहिती जवळ असणे आवश्यक आहे
१. ज्या जमिनीवर नाव लावायचे ते स्थान (जिल्हा,तालुका,गाव,गट नंबर/
सर्वे नं , मृत व्यक्तिचे नाव)
२. वारसांची संपूर्ण
नावे
३. वारसांच्या
जन्म तारखा
४. वारसांचे मोबाईल नंबर
५. वारसांचे आधार नंबर
६. वारसांचे इ-मेल आय.डी. (असल्यास)
खालील
कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे (कागदपत्रांच्या
स्कॅन कॉपी फक्त ब्लॅक ऍंड व्हाईट पी.डी.एफ फॉर्म मधील)
१. अर्जदाराचे ओळखपत्र
२. मयत व्यक्तीच्या मृत्यू प्रमाणपत्र ( जून २०१५ तारखेनंतर
मृत्यू झाला असेल तर प्रमाणपत्राचा क्रमांक)
३. वारसाचे मृत व्यक्तीशी असलेल्या नाते दाखवणारे
दस्त (उदा : जन्म प्रमाणपत्र,शाळा
सोडल्याचा दाखला , शालांत परीक्षेचे प्रमाणपत्र , रेशन कार्ड , मतदार ओळखपत्र , राष्ट्रीयकृत
बँक पासबुक, ...)
5. मयताचे नाव कमी करणे :
एखाद्या जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर नावे असलेल्या
व्यक्तींपैकी एखाद्या व्यक्तीचा मॄत्यू झाल्यास व त्या मयत
व्यक्तीला असलेले सर्व वारसांची नावे
यापूर्वीच ७/१२ वर दाखल असल्यास
फक्त त्याचे नाव ७/१२ उताऱ्यावरुन
काढून टाकणे आवश्यक असते. त्यामुळे फक्त मयत व्यक्तीचे नाव कमी करण्याकरीता या
फेरफार प्रकारचा चा उपयोग करावा.
मयताचे नाव कमी करणे ची फेरफार
नोंद करण्याकरीता करावयाच्या ऑनलाईन
अर्जा साठी खालील माहिती जवळ असणे आवश्यक आहे
१. ज्या जमिनीवरील नाव
कमी करायचे त्या जमिनीचे स्थान (जिल्हा,तालुका,गाव,गट नंबर/ सर्वे नं , मृत व्यक्तिचे नाव)
२. संपूर्ण नाव ( मयत
व्यक्तीचे )
३. मयत व्यक्तीचा आधार क्रमांक
४ . अर्जदाराचे नाव व मोबाईल नंबर
५ . इ-मेल आय डी (असल्यास)
खालील कागदपत्रे जोडणे आवश्य आहे (कागदपत्रांच्या स्कॅन कॉपी फक्त ब्लॅक ऍंड व्हाईट पी.डी.एफ फॉर्म मधील)
१. अर्जदाराचे ओळखपत्र
२ .मृत्यूचा दाखला
३.
स्वयंघोषणा संमती पत्र ( या मध्ये सर्व वारसांची माहिती असावी )
6.
अ.पा.क.शेरा कमी करणे :
एखाद्या जमीनीवर नावे असलेल्या व्यक्तींपैकी कोणी
व्यक्ती कायद्याने अज्ञान (१८ वर्षांपेक्षा लहान) असेल तर तिच्या सोबत अज्ञान
पालक कर्ता म्हणून सज्ञान व्यक्तीचे नाव ७/१२ उताऱ्यावर लावण्यात येते. अज्ञान व्यक्तीचे वय १८ पूर्ण झाल्यानंतर
अज्ञान पालक कर्ता व्यक्तिचे नाव ७/१२ वरुन कमी करण्यात येते. याला ’अ.पा.क. शेरा कमी करणे ’ असे म्हणतात .
अ.पा.क.शेरा कमी करणे करण्याकरीता ऑनलाईन अर्ज
करण्यासाठी खालील माहिती जवळ असणे आवश्यक आहे.
१. ज्या जमीनीवरील अ.पा.क.शेरा कमी करायचा त्या जमिनीचे स्थान (जिल्हा,तालुका,गाव,गट नंबर/सर्वे नं. अज्ञान व्यक्तिचे नाव)
२. अर्जदाराचे संपूर्ण नाव
३. अर्जदाराचा मोबाईल नंबर
४. अर्जदाराचा इ-मेल
आय डी (असल्यास)
५. अज्ञान खातेदाराची जंन्मतारीख
खालील कागदपत्रे जोडणे आवश्य आहे (कागदपत्रांच्या स्कॅन कॉपी फक्त ब्लॅक ऍंड
व्हाईट पी.डी.एफ फॉर्म मधील
)
१. अर्जदाराचे ओळखपत्र
२. वयाचा पुरावा
7. ए. कु.मॅ. नोंद कमी करणे :
एखाद्या जमिनीवर
एखाद्या व्यक्तिची ’एकत्र
कुटुंब मॅनेजर ’ अशी नोंद झालेली असेल आणि ती नोंद कमी
करून सर्व वारसांची नोंद ७/१२ वर घेण्यासाठी या पर्यायाची निवड करावी
ए. कु.मॅ. नोंद कमी करणे नोंद करण्याकरीता खालील माहिती
जवळ असणे आवश्यक आहे
१. ज्या
जमिनीवर नोंद कमी करायची ते स्थान ( जिल्हा, तालुका, गाव, गट नंबर/ सर्वे नं. )
२. ए.
कु.मॅ. नोंद दाखल
झालेल्या मूळ / जुन्या फेरफार ची नक्कल
३. अर्जदाराचे
नाव व मोबाईल नंबर
४. अर्जदाराचा इ-मेल
आय.डी. (असल्यास)
खालील
कागदपत्रे जोडणे आवश्य आहे (कागदपत्रांच्या
स्कॅन कॉपी फक्त ब्लॅक ऍंड व्हाईट पी.डी.एफ फॉर्म मधील)
१. अर्जदाराचे ओळखपत्र
२. ए.
कु.मॅ. ची नोंद दाखल
झालेल्या मूळ फेरफाराची नक्कल
३. मूळ
फेरफारातील सहधारकाचे / वारसाचे स्वयंघोषणा संमती पत्र
8.
विश्वस्तांचे नावे बदलणे:
ज्या धर्मादाय / सामाजिक / सहकारी संस्था यांच्या विश्वस्तांची नावे दाखल असतात त्या बाबतीत विश्वस्तांचे नावे बदलणे
नोंद करण्याकरीता खालील माहिती जवळ असणे आवश्यक आहे.
१. ज्या
जमिनीवर विश्वस्तांचे नावे बदलावायचे आहे त्या जमिनीचे स्थान (जिल्हा,तालुका,गाव,गट नंबर/सर्वे नं. )
२. अर्जदाराचे संपूर्ण नाव
३. अर्जदाराचा मोबाईल नंबर
४. अर्जदाराचा इ-मेल आय डी (असल्यास)
५. विश्वस्तांचे
नाव बदलणे बाबत चा आदेशाची प्रत
खालील
कागदपत्रे जोडणे आवश्य आहे (कागदपत्रांच्या
स्कॅन कॉपी फक्त ब्लॅक ऍंड व्हाईट पी.डी.एफ फॉर्म मधील )
१. अर्जदाराचे ओळखपत्र
२.धर्मदाय आयुक्त यांचं आदेश प्रत
9.संगणीकृत ७/१२ मधील चूक दुरुस्ती
करण्यासाठी अर्ज :
संगणीकृत ७/१२ मधील चूक दुरुस्ती नोंद करण्याकरीता खालील माहिती जवळ असणे आवश्यक आहे
१.अर्जदाराचे ओळखपत्र
२.जुना हस्तलिखित
७/१२ प्रत
३.जुना हस्तलिखित
फेरफार
४.इतर
|
सर एकाच व्यक्तीचे सातबारा वरील नाव व आधार कार्ड किंवा इतर कागदपत्रांवरील नाव वेगवेगळी असल्यास काय कार्यवाही करावी.
ReplyDeleteप्रत्येक व्यक्ती राजपत्र घेऊन येत नाही अशावेळी काय कार्यवाही करावी कृपया मार्गदर्शन करावे