रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

DDM प्रणाली द्वारे वितरित अभिलेखांची नक्कल फी बँक खात्यावर जमा करून घेणे बाबत

 

प्रति,


      उपजिल्हाधिकारी तथा डी.डी.ई.(सर्व)


                 विषय :   सन २०२०-२१ या आर्थिक वर्षातील- DDM प्रणाली

 द्वारेवितरित महसुली अभिलेख नक्कल शुल्क बँक खात्यावर जमा करून 

त्याचे लेखापरीक्षण करून घेणे व रक्कम   जमा  न केलेल्या महिन्याचे 

VAN सह तयार होणा-या चलना द्वारे भरणा करून घेणे बाबत.

 

            सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात - मार्च २०२० पासून  DDM  प्रणाली  द्वारा वितरीत केलेल्या

 महसुली अभिलेखाच्या नक्कल फीची रक्कम भरणे करिता  साझानिहाय VAN क्रमांक निश्चित

 करून देण्यात आले आहेत. दि.  ३१..२०१९ च्य शासन निर्णयाप्रमाणे नक्कल फी म्हणून

मिळणाऱ्या १५ रुपयांपैकी ५ रुपये ई-महाभूमी प्रकल्प व्यवस्थापन संस्थेचा हिस्साची मार्च २०२० ते

 मार्च २०२१ या कालावधीची रक्कम  जमाबंदी आयुक्त कार्यालयाच्या  बँक ऑफ  बडोदा या बँकेच्या

VAN चलना मध्ये नमूद  खात्यावर नियमित जमा केली आहे का खात्री करावी.



        मार्च २०२० ते  मार्च २०२१ या आर्थिक वर्षातील तलाठी स्तरावरून वितरित झालेल्या नकलांचे

 नक्कल शुल्क काही साझा  चे एकही चलन भरले गेलेले नाही असे आढळून येत आहे. हे अत्यंत

 गंभीर आहे. या बाबत तपासणी करून योग्य कार्यवाहीतहसीलदार यांनी करावी. अशा बाबतीत

 तालुकास्तरावर जमा रकमेचा व शिल्लक रकमेचा ताळमेळ घेण्यासाठी नायब तहसीलदार

 -फेरफार (डीबीए)  यांच्या DDM  लॉगीन मध्ये  साझा च्या  VAN मधील जमा रक्कम व महिना

 निहाय चलनाची रक्कम बाबत ताळेबंद (RECONCILATION) यादी देण्यात आलेली आहे.  सदर

 ताळेबंद अहवाल प्रमाणे थकीत असलेल्या चलनाची रक्कम  मार्च २०२१ अखेर VAN चलना

 द्वारे बँक खात्यावर भरण्यात यावी पोस्टचेक करा चलनाची रक्कम भरणे करता बँक ऑफ बडोदा

 मध्ये VAN क्रमांक व IFSC कोड वापरून पैसे जमा करण्याचे दोन पर्याय आहेत.


1.      बँक ऑफ बडोदा, देना बँक व विजया बँकेच्या कोणत्याही शाखेत जावून रोख रक्कम काउंटर

 वर जावून VAN खात्यावर चलना प्रमाणे जमा करणे.

 2.    ऑनलाईन पेमेंट गेट वे  द्वारे (SBI व बँक ऑफ बडोदा)

लिंक https://digitalsatbara. mahabhumi. gov.in/ddmchalan/ 

या लिंकवर लॉगीन करून DDM चलन विनाशुल्क ऑनलाईन भरता येईल.

   
 काही साझाचे चलन भरलेले आहे. परंतु ताळेबंद अहवाल मध्ये प्रलंबित आहे

 असे आढळून येत असल्यास अशा विसंगती बाबत बँकेत जमा रकमेची तपासणी 

करून ताळेबंद दुरुस्त करून देता येईल.

https://forms.gle/L2iAu3YtMmxx9Nye6 या लिंक वर 


              जिल्हा-तालुका-सज्जा - VAN NO - सेवार्थआयडी  चलन काढलेले दिनांक- चलन रक्कम (

अंकात) - चलन भरलेली  रक्कम (अंकात) - चलन भरणा केल्याचा दिनांक - बँक नाव 

- बँकेत भरलेल्या चलनाची प्रत प्रमाणे माहिती भरावी.


ज्या साझाचे फेब्रुवारी २०२० पुर्वीची कोणतीही थकीत नक्कल फी जमा करणे बाकी असेल त्या

 करिता SBI चे चलन दिलेले आहे हे चलन केवळ स्टेट बँक ऑफ इंडिया च्या बँक खात्यावर DDM

मधील SBI च्या चलनाद्वारे जमा करणे आवश्यक आहे. VAN क्रमांक लागू करणे अगोदर चे नक्कल

 शुल्क खालील नमूद खात्यात SBI बँकेत जमा चलन पावती द्वारे जमा करावे.


Name - Settlement Commissioner and Director of Land Record

 (Maharashtra State) Pune

स्टेट बँक ऑफ इंडिया, ट्रेझरी शाखा, पुणे

Current Account No. 38306827364

IFSC.Code. No- SBIN0001904


           सदरची रक्कम शासन जमा होणार नसलेने ती GRAS द्वारे चलन करून भरू नये, सदरची

 रक्कम महाभूमी प्रकल्प व्यवस्थापन संस्था (जमाबंदी आयुक्त कार्यालय, पुणे)  च्या स्वीय प्रपंजी

 लेखा खात्यावर (PLA खाते) जमा करण्यासाठी उपरोक्त खात्यावर जमा करावी.


     सर्व  DDE यांनी सर्व तालुक्यात मार्च 2021 अखेर ताळमेळ व लेखापरीक्षण पूर्ण झाल्याची खात्री

 करून जिल्ह्याचा  एकत्रीत अहवाल जमाबंदी आयुक्त कार्यालयात 15 एप्रिल पूर्वी पाठवावा व त्याची

 एक प्रत उप आयुक्त महसूल, विभागीय आयुक्त कार्यालय यांना पाठवावी.या पूर्ण अभिलेखांचे Audit

होणार असल्याने हे  रेकॉर्ड आवश्यक आहे सबब ते ऑडिट होई पर्यंत जतन करून ठेवावे हि विनंती.


 
 
(रामदास जगताप)


उपजिल्हाधिकारी तथा

राज्य समन्वयक, - फेरफार

जमाबंदी आयुक्त कार्यालय ,पुणे.


प्रत- मा. उपआयुक्त (महसुल), विभागीय आयुक्त कार्यालये (सर्व)

Comments

Archive

Contact Form

Send