तात्काळ सातबारा व खाते उतारा उपलब्ध होण्या साठी अभिलेख वितरण प्रणाल(DDM ) मध्ये केले बदल
नमस्कार मित्रांनो ,
गेल्या आठवड्यात सातबारा व खाते उतारे वितरणासाठी तात्काळ उपलब्ध होत नाहीत अशा तक्रारी काही जिल्ह्यांनी केल्या होत्या त्यासाठी DDM मध्ये काही सुधारणा करून खाली नमूद २१ जिल्ह्यांना नवीन लिंक वर DDM उपलब्ध करून दिले आहे.
औरंगाबाद , अहमदनगर , जालना , जळगाव, धुळे , नंदुरबार , गोंदिया , पालघर , लातूर , परभणी , सातारा , कोल्हापूर , हिंगोली ,ठाणे , सिंधुदुर्ग , नांदेड , सांगली , भंडारा . गडचिरोली, वर्धा आणि रायगड
या जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे DDM प्रणालीचे कामकाज सुरळीत झाले असून सातबारा फेरफार व खाते उतारा तात्काळ उपलब्ध होईल त्यासाठी https://mahaferfarnas.enlightcloud.com/dsp_ddm/ ही लिंक वापरावी व feedback द्यावा.
या सर्व जिल्ह्यातील तलाठी यांनी ही लिंक trusted साईट मध्ये समाविष्ट करून घ्यावी आणि अन्य सुविधा / module साठी आपल्या जिल्ह्याची जुनी लिंक वापरावी . लवकरच अन्य जिल्ह्यांना हीसुद्धा सुविधा देण्यात येईल . यामुळे आपले ई फेरफार मधील काम देखील गतीने होईल . आपल्या अडचणी आम्हाला ज्ञात आहेत त्यावर मार्ग काढणे चालू आहे सर्व सर्व तलाठी यांचे निदर्शनास आणावे व योग्य feedback द्यावा
आपला
रामदास जगताप
रविवार ,दि ७.३.२०२१
Comments