ई फेरफार प्रणाली ची यशस्वी अंमलबजावणी साठी मास्टर ट्रेनर्स साठी तीन दिवसाचे निवासी प्रशिक्षण देणे बाबत
महाराष्ट्र शासन
महसूल व वन विभाग
जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख, महाराष्ट्र राज्य
दूसरा व तिसरा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, विधान भवन समोर, कॅम्प, पुणे -०१
--------------------------------------------------------------------------------------------------------------------
दूरध्वनी क्र. ०२०-२६१३७११० Email ID : dlrmah.mah@nic.in
Web site : https://mahabhumi.gov.in
--------------------------------------------------------------------------------------------------------------------
क्र.रा.भू.अ.आ.का.४/ मास्टर ट्रेनर्स प्रशिक्षण /२०२१ दिनांक :१०.०३.२०२१
प्रति
,
मा. जिल्हाधिकारी (सर्व)
सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी
(सर्व)
विषय – ई फेरफार प्रणाली ची यशस्वी अंमलबजावणी साठी मास्टर
ट्रेनर्स साठी तीन दिवसाचे निवासी प्रशिक्षण देणे बाबत
केंद्र शासनाच्या डिजिटल इंडिया राष्ट्रीय भुमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमाच्या
अंतर्गत राज्यातील सर्व अधिकार अभिलेखाचे
संगणकीकरण ई-फेरफार प्रकल्पांतर्गत
करणेत आले असून सध्या राज्यातील सर्व गाव नमुना नं. ७/१२ , ८अ आणि फेरफार
नोंदवही (गाव नमुना नं. ६) संगणकीकृत करणेत आले आहेत आय सरिता व ई फेरफार प्रणाली
संलग्न करून सुमारे १५ लक्ष नोंदणीकृत दस्तांचे फेरफार ऑनलाईन पद्धतीने
नोंदविण्यात आले आहेत त्यासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग आणि महसूल विभागाचे
सर्व अधिकारी व कर्मचारी यांना नियमितपणे योग्य प्रशिक्षण देणे आवश्यक आहे.
त्यासाठी जमाबंदी आयुक्त कार्यालय व यशदा पुणे यांचे वतीने या दोन्ही विभागातील
मास्टर ट्रेनर्स ची प्रशिक्षण वर्ग आयोजित करणे आवश्यक आहे.
या प्रशिक्षण वर्गासाठी प्रत्येक
जिल्ह्यातून एक उप जिल्हाधिकारी (डी.डी.ई. किंवा उप विभागीय अधिकारी ) एक तहसीलदार,
एक नायब तहसीलदार (डी.बी.ए.) , एक मंडळ अधिकारी, एक तलाठी आणि मुद्रांक
जिल्हाधिकारी यांचा एक प्रतिनिधी अशा सहा जनांना ई-फेरफार मास्टर ट्रेनर्स म्हणून तीन दिवसाचे निवासी प्रशिक्षण वर्ग यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी
(यशदा ) पुणे येथे माहे एप्रिल २०२१ मध्ये घेतले जाणार आहे त्यासाठी आपल्या
जिल्ह्यातून निवडलेले मास्टर ट्रेनर्स यांना निमंत्रित केले जाणार आहे तरी आपल्या जिल्ह्यातून
निवडलेले मास्टर ट्रेनर्स ची खालील नमुन्यातील माहिती २०.३.२०२१ पूर्वी या
कार्यालयाकडे पाठवावी.
मास्टर
ट्रेनर्स ची माहिती – जिल्हा ------
अ.नं. |
अधिकारी / कर्मचारी यांचे नाव |
पदनाम |
मोबाईल नं. |
ई मेल आय डी |
१ |
|
उप जिल्हाधिकारी |
|
|
२ |
|
सह जिल्हा निबंधक |
|
|
३ |
|
तहसीलदार |
|
|
४. |
|
नायब तहसीलदार |
|
|
५. |
|
मंडळ अधिकारी /अ.का. |
|
|
६. |
|
तलाठी |
|
|
प्रत्येक जिल्ह्याने यापूर्वीचे ई फेरफार मास्टर ट्रेनर्स निवडलेले
असून शक्यतो मास्टर ट्रेनर्सची नावे बदलवू नयेत तथापी बदली, सेवा निवृत्ती,
पदोन्नती, निलंबन, आजारपण इत्यादी अपरिहार्य
कारणामुळे मास्टर ट्रेनर्स यांची नावे बदलावयाचे असल्यास त्यांची नावे निश्चित करून ती
सर्व नावे जमाबंदी आयुक्त कार्यालयातील राज्यसमन्वयक यांचे कडे पाठवावीत म्हणजे
प्रशिक्षण वर्गाचे नेमके नियोजन करणे शक्य होईल.
सदरच्या परिपत्रकातील सूचना सर्व उप जिल्हाधिकारी तथा डी डी ई यांचे निदर्शनास आणाव्यात. ही विनंती
(रामदास जगताप )
उप जिल्हाधिकारी तथा राज्य समन्वयक
जमाबंदी आयुक्त व संचालक
भूमी अभिलेख यांचे कार्यालय , पुणे.
प्रत ,
मा. अप्पर मुख्य सचिव , महसूल , नोंदणी व मुद्रांक शुल्क , महसूल व वन विभाग. यांना महितीसाठी
मा. विभागीय आयुक्त , (सर्व) यांना महितीसाठी
उप जिल्हाधिकारी तथा डी.डी.ई. (सर्व)
उप विभागीय अधिकारी (सर्व)
तहसीलदार (सर्व)
सह दुय्यम निबंधक / दुय्यम निबंधक (सर्व).
Comments