ई फेरफार प्रकल्पाच्या सर्वर च्या अडचणी बाबत
ई फेरफार प्रकल्पाच्या सर्वर च्या अडचणी बाबत
नमस्कार मित्रांनो ,
महसूल
विभागाच्या ई फेरफार या सातबारा संगणकीकरणाच्या ऑनलाईन चे सर्व कामकाज क्लाऊडसर्वर
वर गाव पातळीवरून तलाठी व मंडळ अधिकारी यांचे मार्फत गाव पातळीवरून करण्यात येते
त्यासाठी सर्व तलाठी व मंडळ अधिकारी दिवस रात्र कामकाज करतात परंतु राज्यातील
परभणी, सातारा , अकोला , जळगाव , औरंगाबाद अशा निवडक जिल्ह्यांना ऑनलाईन कामकाज
करताना सर्वर स्लो असल्याच्या तक्रारी येत आहेत या बाबत खात्री केली असता
त्यामध्ये काही तांत्रिक स्वरूपाच्या अडचणी दूर करण्यासाठी जमाबंदी आयुक्त
कार्यालयाकडून एन. आय. सी. व क्लाऊड एजन्सी च्या मदतीने युद्ध पातळीवर कामकाज सुरु
असून सर्व कामकाज लवकरच सुरळीत सुरु होईल. तलाठी कार्यालयातून सातबारा व खाते
उतारे वितरीत करताना येणाऱ्या अडचणी लवकरच दूर करण्यात येतील तरी तांत्रिक अडचणी
येत असलेल्या जिल्ह्यातील खातेदार यांनी महाभूमी पोर्टल वरील डिजिटल स्वाक्षरीत
सातबारा व खाते उतारा या पर्यायाचा वापर करावा . आज सातारा जिल्ह्याची अडचण दूर
करण्यात आली आहे
आपला
रामदास जगताप
दि. ३.३.२०२१
Comments