अचूक डिजिटल सातबारा मध्ये नाशिक विभाग राज्यात अग्रेसर - रामदास जगताप
अचूक डिजिटल सातबारा मध्ये नाशिक विभाग राज्यात अग्रेसर - रामदास जगताप
सन २०१५-१६ पासून सुरु झालेल्या ई फेरफार प्रकल्पामध्ये आज अखेर संपूर्ण राज्यात सुमारे १ कोटी १४ लक्ष 68 हजार ऑनलाईन फेरफार नोंदविण्यात आले असून त्यापैकी १ कोटी १० लक्ष १० हजार फेरफार निर्गत झाले आहेत. महसूल विभागातील सर्व तलाठी , मंडळ अधिकारी यांचे सह सर्व महसूल अधिकारी डिजिटल सातबाराच्या अचूकते बद्दल अहोरात्र कष्ट करून संगणकीकृत सातबारा मध्ये ९८.५० % अचूकता साध्य केली आहे . या मध्ये नाशिक विभागाने ९९.७५ % च्या अचूकते सह प्रथम क्रमांक पटकावला असून अमरावती विभाग ९९.३९ % सह द्वितीय स्थानी असून नागपूर विभाग ( ९९.०१ % ) तृतीय स्थानी आहेत. पुणे विभाग (९८.३२ %) चौथ्या क्रमांकावर तर औरंगाबाद विभाग (९७.६१ %) पाचव्या क्रमांकावर आणि कोंकण विभाग ९७.35 % अचूकते सह शेवटच्या क्रमांकावर आहे.
ई फेरफार प्रकल्प अंतर्गत सगनाकीकृत केलेला सातबारा अचूक तयार होण्यासाठी महसूल विभागाने गेल्या चार वर्षात मोठ्या प्रमाणात कष्ट घेतले असून त्यासाठी आज्ञावली मध्ये अनेक सुधारणा करून व नाव नवीन सुविधा देवून सातबारा डेटाबेस मधील विसंगती दूर करण्यासाठी अनेक अहवाल उपलब्ध करून देवून ते अहवाल निरंक करण्यासाठी तलाठी मंडळ अधिकारी यांनी जुने अभिलेख तपासून व तहसीलदार यांनी महारष्ट्र जमीन महसूल कायद्याच्या कलम १५५ अन्वये प्राप्त अधिकारात तांत्रिक तसेच लेखन प्रमादाच्या चुका दुरुस्त केल्या असून चावडी वाचनासह एडीट व री एडीट मोडूल वापरून सातबारा तील त्रुटी दुरुस्त केल्या आहेत. त्यामुळे गेल्या शंभर सव्वाशे वर्षात हस्तलिखित सातबारा मध्ये झालेल्या चुका डिजिटल सातबारा मध्ये दुरुस्त करण्यात येत आहेत . असे अहवाल निरंक करायचे काम अंतिम टप्प्यात आले असून राज्यात डिजिटल सातबारा मध्ये ९८.५०% अचूकता साध्य करण्यात महसूल विभागाला यश आले आहे. शिल्लक कामकाज अत्यंत किचकट स्वरूपाचे असल्याने या कामासाठी थोडा जास्त वेळ लागत आहे. जमाबंदी आयुक्त कार्यालयाच्या स्थरावरून या कामाचा नियमित आढावा घेतला जात असून प्रत्येक जिल्ह्याने सातबारा ची अचूकता सध्या करण्यात मिळवलेल्या यशाच्या आधारे प्रत्येक जिल्ह्याचे व विभगाचे गुणांकन करून विभाग व जिल्ह्यांचे रांकिंग केले आहे . राज्यात नंदुरबार जिल्ह्याने ९९.९६% अचूकते सह प्रथम क्रमांक पटकावला असून नाशिक जिल्हा ९९.८१ % सह द्वितीय आणि जळगाव जिल्हा ९९.७४ % सह तृतीय स्थानी असून नाशिक जिल्ह्यातील पाच ही जिल्ह्ये पहिल्या सहा मध्ये असून नाशिक विभागात हे काम गुणवत्तापूर्वक पूर्ण झाले असल्याचे दिसून येते.
नाशिक जिल्ह्यात १२.५० लक्ष एव्हडे सातबारा असून देखील फक्त २३८२ सातबारा वगळता अन्य सर्व सातबारा अचूक असल्याचे दिसून येतात त्यासाठी नाशिक जिल्ह्यातील सर्व तलाठी मंडळ अधिकारी आणि सर्व महसूल अधिकारी यांचे मनपूर्वक अभिनंदन 🚩🚩🎂🚩💐💐 🙏🏻
९८.५० % अचूकता सध्या करण्यात महसूल विभागाला यश आले असून उर्वरित कामकाज देखील गुणवत्ता पूर्वक पूर्ण करण्यासाठी सर्व तलाठी , मंडळ अधिकारी आणि तहसीलदार यांचे सह सर्व महसूल अधिकारी कठोर परिश्रम घेत आहेत,
सर्वर व नेटवर्क मधील अनंत अडचणीवर मात करून हे अत्यंत मोठे काम अंतिम टप्प्यात आणल्या बरोबर राज्यातील सर्व तलाठी व मंडळ अधिकारी यांचे हार्दिक अभिनंदन
नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त , उप आयुक्त महसूल , सर्व जिल्हाधिकारी , उप जिल्हाधिकारी तथा डी.डी.ई., प्रांत अधिकारी , तहसीलदार , नायब तहसीलदार व सर्व तलाठी मंडळ अधिकारी यांचे मनपूर्वक अभिनंदन
आपला स्नेहांकित
रामदास जगताप
उप जिल्हाधिकारी तथा समन्वयक ई-फेरफार प्रकल्प
दिनांक २ मार्च, २०२१
सर आपले मार्गदर्शनाखाली आणि प्रयत्नरत हे
ReplyDeleteशक्य झाले आहे यात तिळमात्रही शंका नाही परंतु सर्वर व नेटवर्क मुळे जास्त वेळ निष्कारण लागतो यावर उपाय निघाल्यावर बरं होईल तसेच जिल्हा वर प्रत्येकी NIC व्हावी आणि मार्ग दर्शक मिळावा ही नम्र विनंती