ई फेरफार प्रणालीत user creation आज्ञावालीद्वारे वापरकर्त्यांची नोंदणी करणे बाबत
क्र.रा.भू.अ.आ.का.४/रा.स. / मा.सु./१९१ /२०२० दिनांक : ०४/०२/२०२१
प्रति,
उप आयुक्त (महसूल)(सर्व),
उप जिल्हाधिकारी तथा डी.डी.ई. (सर्व)
विषय- ई फेरफार प्रणालीत user creation आज्ञावालीद्वारे
वापरकर्त्यांची
नोंदणी करणे बाबत ....
महोदय,
ई-महाभूमी प्रकल्प अंतर्गत कार्यान्वित असलेल्या ई-फेरफार प्रणालीच्या अंमलबजावणीमध्ये नोंदणी केलेल्या उप आयुक्त (महसूल), उपजिल्हाधिकारी तथा डी.डी.ई., उप विभागीय अधिकारी, तहसिलदार, नायब तहसिलदार, व मंडळ अधिकारी, तलाठी यांची नोंदणी User creation Module मधुन केली जाते. तथापि त्यामध्ये यापुर्वी नोंदणी केलेल्या अधिकारी, कर्मचारी यांची माहिती व स्टेटस योग्य रित्या अद्यावत नसलेने,बहुतांश उप आयुक्त (महसूल) हे नव्याने रुजू
झालेले आहेत व त्यांचे ई-फेरफार प्रणालीत नोंदणी नसल्याने उपजिल्हाधिकारी तथा डी.डी.ई. यांची नोंदणी
प्रलंबित दिसत आहे त्यामुळे क्रमश: त्यांच्यावर अवलंबून असलेल्या अन्य अधिनस्त वापरकर्त्यांची नोंदणी प्रलंबित
दिसत आहे त्यासाठी खालीलप्रमाणे सुचना देण्यात येत आहेत. त्याप्रमाणे कार्यवाही करावी.
१.सर्व नवनियुक्त उप आयुक्त (महसूल) यांची राज्य समन्वयक ई-फेरफार प्रकल्प यांच्या मार्फत ई-फेरफार प्रणालीत User creation Module मधुन नोंदणी झाली असल्याची खात्री करावी.
२. सर्व नवनियुक्त उपजिल्हाधिकारी तथा डी.डी.ई. यांची उप आयुक्त (महसूल) यांच्या मार्फत ई-फेरफार प्रणालीत User creation Module मधुन नोंदणी झाली असल्याची खात्री करावी.
३. ई-फेरफार प्रणालीमध्ये उप विभागीय अधिकारी यांना घोषणापत्र ४
देण्यासंदर्भात जबाबदारी देण्यात आलेली आहे याकरिता सर्व नियुक्त उप विभागीय
अधिकारी यांची उपजिल्हाधिकारी तथा डी.डी.ई. यांच्या मार्फत ई-फेरफार प्रणालीत User creation Module मधुन नोंदणी झाली असल्याची खात्री करावी.
३.सर्व नवनियुक्त तहसीलदार यांची उपजिल्हाधिकारी तथा डी.डी.ई. यांच्या मार्फत ई-फेरफार प्रणालीत User creation Module मधुन नोंदणी झाली असल्याची खात्री करावी.
४.सर्व नवनियुक्त नायब तहसीलदार तथा डेटाबेस आडमिनिस्ट्रेटर (DBA) यांची उपजिल्हाधिकारी तथा डी.डी.ई. यांच्या मार्फत ई-फेरफार प्रणालीत User creation Module मधुन नोंदणी झाली असल्याची खात्री करावी.
५. ई-फेरफार प्रणालीत कार्यरत सर्व तलाठी व मंडळ अधिकारी यांची
नायब तहसीलदार तथा डेटाबेस आडमिनिस्ट्रेटर (DBA) यांच्या मार्फत User creation Module मधुन नोंदणी झाली असल्याची खात्री करावी.
६. ई-फेरफार प्रणालीत डेटाबेस आडमिनिस्ट्रेटर (DBA) यांची महत्वाची भूमिका असून आपल्या प्रणालीमध्ये कोणतीही अयोग्य व्यक्ती (सेवानिवृत्त/निलंबित/ऑपरेटर ) काम करीत नाही ते पाहणे हे प्राथमिक कर्तव्य आहे. त्याचप्रमाणे पदभार हस्तांतरीत करतांना गावांचे वाटप करताना (Assign) किंवा सेवानिवृत्ती /बदली यांच्या नोंदी घेताना सक्षम अधिकारी यांचे लेखी आदेश असल्याशिवाय वापरकर्त्यांच्या जबाबदारीत ऑनलाईन बदल ( User Creation) मधुन करु नये. आपल्या तालुक्यातील सर्व तलाठी /मंडळ अधिकारी यांचे बदली / सेवानिवृत्तीची आदेश संचिका व नोंदवही तालुका स्तरावर अद्यावत ठेवण्याची जबाबदारी डी.बी.ए. यांची आहे याची नोंद घ्यावी.
७. ज्या तलाठी व मंडळ अधिकारी यांना गांवे वाटप (Assign) केलेली नाहीत त्यांना पदोन्नती/बदली/अर्जित रजा/ निलंबित/सेवानिवृत्त यापैकी एक योग्य स्टेटस देण्यात यावे व सर्व तलाठी यांचे सेवार्थ आय.डी. पगार पत्रकाप्रमाणे तसेच मोबाईल नंबर योग्य असल्याची खात्री करावी.
उपरोक्त मार्गदर्शक सूचना सर्व
वापरकर्ते यांचे निदर्शनास आणाव्यात ही विंनती .
आपला विश्वासू
(रामदास जगताप )
उप जिल्हाधिकारी तथा राज्य समन्वयक
ई-फेरफार प्रकल्प, जमाबंदी आयुक्त कार्यालय, पुणे.
Comments