फळ पिकांचे ई-पिक पाहणी अंतर्गत ग्राऊंड ट्रुथिंग करणे बाबत .
विषय - फळ पिकांचे ई-पिक पाहणी अंतर्गत ग्राऊंड ट्रुथिंग करणे बाबत
ई पिक पाहणी प्रकल्पांतर्गत Horticulture mapping करिता Standard
Operating Procedure
शेतकऱ्यांनी
घेतलेल्या पिकांच्या क्षेत्राबाबतची माहिती स्वतः “ई पिक पाहणी” मोबाईल अॅप द्वारे नोंदविणेकरिता
राज्यात ई-पिक पाहणी हा प्रकल्प टाटा ट्रस्ट यांच्या
सहकार्याने प्रायोगिक तत्त्वावर राबविणेत येत आहे. सदर प्रकल्पाच्या अनुषंगाने मा.
आयुक्त, कृषि यांच्या अध्यक्षतेखाली बैठक दि.०८.०२.२०२१ रोजी दु.१२.०० वा. मा.
आयुक्त, कृषि यांचे दालन, मध्यवर्ती इमारत पुणे येथे पार पडली. उपग्रह प्रतिमा
आधारे केलेल्या orchard mapping मध्ये वापरलेल्या resolution नुसार विस्तारित
क्षेत्रावरील व अचूक coordinates असलेली माहिती मिळते तर ई पिक पाहणी मध्ये
मर्यादित क्षेत्रामधील व micro level वरील माहिती मिळते. यामध्ये सुसंगता
येणेसाठी ग्राउंड ट्रुथिंग करिता सदर
बैठकीत निश्चितकार्यपद्धतीनुसार फळबाग क्षेत्राचे मपिंग/Horticulture mapping बाबत
Standard Operating Procedure (SOP) खालीलप्रमाणे निश्चित करणेत येत आहे.
समाविष्ट तालुके व गावे -
अ.क्र. |
तालुके |
गावे |
१ |
अचलपूर |
वडूरा, तवलार,
सिंदी बु. |
२ |
फुलंब्री |
गानोरी,
धामणगाव, वरेगाव. |
3 |
सिल्लोड |
उंडणगाव,
कायगाव, सिल्लोड (MCI). |
४ |
सेलू |
राधे धामणगाव,
हादगाव खु., राधे धामणगाव. |
५ |
बारामती |
काटेवाडी,
कटफळ, पारवडी. |
६ |
दिंडोरी |
खेडगाव,
पालखेड बंधारा, आंबेवणी. |
७ |
संगमनेर |
वडगाव लांडगा,
पेमगिरी, अकालपूर. |
८ |
वाडा |
नाणे, खरीवली
त. कोहोज, गौरापूर. |
मार्गदर्शक
सुचना -
1. ई-पिक पाहणी ग्राउंड ट्रुथिंग चे सनियंत्रण तहसिलदार व तालुका कृषी
अधिकारी संयुक्तरीत्या करतील व त्यावर उप
विभागीय अधिकारी (मह्सुल ) आणि उप विभागीय कृषी अधिकारी नियंत्रण ठेवतील.
२. महाराष्ट्र
सुदूर संवेदन केंद्र (MRSAC) नागपूर यांचेकडील फळपिक यादी व ई पिक पाहणी
प्रकल्पांतर्गत उपलब्ध असलेली यादी टाटा ट्रस्ट यांचेकडून तालुका
कृषि अधिकारी यांचे माध्यमातून संबंधित मंडळ कृषि अधिकारी यांना उपलब्ध करून देणेत
येईल.तलाठी यांचेकडे ई फेरफार प्रणालीतील मिडलवेअर मधून उपलब्ध होत असलेली फळ पीक धारक शेतकरी खातेदार यादी तहसिलदार यांच्याकडून उपलब्ध करून देण्यात येईल.
३. यासंदर्भात समन्वयन तालुका स्थरावर
टाटा ट्रस्ट चे जिल्हा समन्वयक करतील.
४. टाटा ट्रस्ट मार्फत संबंधित तहसिलदार, तालुका कृषि अधिकारी, निवड गावांचे मंडळ
कृषि अधिकारी, तलाठी व कृषि सहाय्यक यांचे ग्राउंड ट्रुथिंग तसेच त्यापुढील
अनुषंगिक कार्यवाही बाबत सविस्तर प्रशिक्षण घेणेत येईल.
५.तलाठी व कृषि
सहाय्यक यांचेमार्फत फळबाग क्षेत्राचे संयुक्तपणे ग्राउंड ट्रुथिंग द्वारे पडताळणी
करणेत येईल. याबद्दलची तांत्रिक कार्यपद्धती टाटा ट्रस्ट ठरवून देईल.
६.ग्राउंड ट्रुथिंग
करिता ई-पिक पाहणी
मोबाईल अॅप ची सुविधा
वापरण्यात येईल. mrasac कडून प्राप्त यादी प्रमाणे व कृषी सहाय्यक
यांचे कडील माहिती प्रमाणे ज्या खातेद्रांनी अद्याप्या फळ पिकांची नोंदणी मोबाईल अॅप मधून केलेली नाही त्या फळ बनगामची
नोंदी ई पीक पाहणी मार्फत करण्यात येईल. त्यानंतर तलाठी या सर्व नवीन ई पीक
पाहणीला मिडल वेअर मधून मान्यता देतील व त्याच
पीक निहाय खातेदारांच्या याद्या तलाठी संबंधित कृषी सहाय्यकांना उपलब्ध
करून देतील.
७. ग्राउंड
ट्रुथिंग पूर्ण झाल्यावर ग्राम स्तरावर माहितीचे संकलन मंडळ कृषि अधिकारी,तलाठी व
कृषि सहाय्यक यांच्या मदतीने करतील. सदरची माहिती मंडळ कृषि अधिकारी हे तालुका
कृषि अधिकारी यांना सादर करतील.
८. तालुका कृषि अधिकारी झालेले काम योग्य झाले असल्याची खात्री
करून माहिती टाटा ट्रस्टचे जिल्हा समन्वयक यांचे मार्फत टाटा ट्रस्टला उपलब्ध करुन देतील.
९. या सर्व प्रक्रियेमध्ये सर्व फळ पिकांच्या नोंदी (
निर्भेळ किंवा मिश्र पिकांचे सह गुणवत्तापूर्वक पूर्ण होईल ह्याची दक्षता घ्यावी
रामदास जगताप
उप जिल्हाधिकारी तथा राज्य समन्वयक
ई फेरफार व ई पीक पाहणी प्रकल्प
जमाबंदी आयुक्त कार्यालय, पुणे
Comments