१०० पेक्षा जास्त खातेदार असलेले सातबारा ची ODC अहवाल १ मधील दुरुस्ती करणे बाबत
प्रति,
उप
जिल्हाधिकारी तथा डी.डी.ई. (सर्व)
विषय : १०० पेक्षा जास्त खातेदार असलेले सातबारा ची ODC
अहवाल १ मधील दुरुस्ती करणे
बाबत
महोदय ,
ई फेरफार प्रणालीतील संगणकीकृत अधिकार अभिलेख १०० % अचूक व अद्यावत असण्यासाठी आपण अनेक दिवसापासून कामकाज करत अजून आज अखेर राज्यस्थरावर या प्रकल्पाने ९८% पेक्षा जास्त अचूकता प्राप्त केली आहे. सदरचे थोडेशे अपूर्ण कामकाज पूर्ण करण्यासाठी सध्या तालुका अथवा मंडळ स्थरावर कॅम्प घेवून कामकाज केले जात आहे परंतु राज्यातील अनेक ठिकाणी बिनशेती आदेशां प्रमाणे मंजूर रेखांकन आदेशाचे कमी जास्त पत्रक (KJP) तयार करून त्याप्रमाणे बिनशेती क्षेत्राचे स्वतंत्र सातबारा तयार नं झाल्याने राज्यात खालील प्रमाणे अमरावती विभाग
वगळता अन्य पाच विभागात १०० पेक्षा जास्त खातेदार असलेले १२ हजार पेक्षा जास्त गाव नमूना नं. ७/१२ असल्याचे दिसून येतात.
Sr.no |
Division |
Total no of surveys with more than 100 khatedars |
1 |
Nagpur |
118 |
2 |
Nashik |
540 |
3 |
Aurangabad |
2890 |
4 |
Kokan |
3356 |
5 |
Pune |
5305 |
असे सातबारा वरील खातेदारांचे क्षेत्राची बेरीज जर त्या सातबारा वरील एकूण क्षेत्रापेक्षा जास्त किंवा कमी असल्यास असे सातबारा ODC अहवाल १ मध्ये दर्शविले जातात असे साधारणता ७०हजार सातबारा विसंगती मध्ये आहेत. असे विसंगत क्षेत्राचे सातबारा वर जर १०० पेक्षा जास्त काहेदार असतील तर असे सातबारा वरील दुरुस्ती करणे अवघड जाते म्हणूनच काही तलाठी यांनी केलेल्या मागणी प्रमाणे खालील दोन सुविधा तलाठी स्थरावर उपलब्ध करून दिल्या आहेत.
अ)
१०० किंवा १०० पेक्षा जास्त खातेदार असलेल्या स.नं.ची यादी – ई फेरफार प्रणाली मध्ये तलाठी लॉगीन ला अहवाल मध्ये महत्वाचे अहवाल –१०० किंवा १०० पेक्षा जास्त खातेदार असलेल्या स.नं. ची यादी हा अहवाल उपलब्ध करून दिला आहे. या अहवालात निवडलेल्या गावातील १०० किंवा १०० पेक्षा जास्त खातेदार असेल्या स.नं. ची यादी मिळते त्यात स.नं. एकूण खातेदारांची संख्या , क्षेत्र , पोट खराब क्षेत्र आणि एकक अशी सर्व माहिती दर्शविली जाते व सदरचा अहवाल एक्सेल मध्ये रुपांतरीत करून डाऊनलोड करता येतो. अशा पद्धतीने रुपांतरीत केलेला माहिती वापरून कोणत्या स.नं. ची विभागणी करता येणे शक्य आहे त्याची
खात्री करून पुढील कार्यवाही करता येईल. स.नं. पोट हिस्सा मोजणी किंवा मंजूर बिनशेती
रेखांकाना प्रमाणे कमी जास्त पत्रक किंवा पोट हिसा किंवा आकारफोड पत्रक करू भूमी
अभिलेख विभागाचे आदेशां प्रमाणे पोट हिस्सा तयार करता येईल. या बाबत जमाबंदी आयुक्त
कार्यालयाचे दिनांक १०.२.२०२१ चे परिपत्रका प्रमाणे कार्यवाही करावी.
ब)
सर्वे क्रमांक निहाय खातेदारांची माहिती – ई फेरफार प्रणाली मध्ये तलाठी लॉगीन ला अहवाल मध्ये महत्वाचे अहवाल –खातेदारांसंबंधीचे अहवाल मध्ये सर्वे क्रमांक निहाय खातेदारांची माहिती हा अहवाल उपलब्ध करून दिला आहे. या अहवालात कोणत्याही निवडलेल्या स.नं. / गट नं. च्या सातबारा मध्ये भोगवटादार सदरी असलेल्या खातेद्रांची नावे त्यांचे नावचे क्षेत्र , पोट खराब क्षेत्र , आकार आणि फेरफार नंबर अशी सर्व माहिती दर्शविली जाते व सदरचा अहवाल एक्सेल मध्ये रुपांतरीत करून डाऊनलोड करता येतो. अशा पद्धतीने रुपांतरीत केलेला अहवाल वापरून खातेद्रांची नावे sort करणे किंवा क्षेत्राची अचूक बेरीज करणे सहज शक्य होणार आहे त्याचा उपयोग अहवाल १ च्या दुरुस्ती साठी चांगल्या पद्धतीने करता येईल असा विश्वास वाटतो.
विसंगत सातबारा दुरुस्त करण्यासाठी तहसीलदार यांचे कलम १५५ च्या आदेशाने दुरुस्ती सुविधा वापरताना ह्या अहवालांचा निश्चित उपयोग होईल त्यासाठी या सूचना सर्व वापरकर्ते यांच्या निदर्शनास आणाव्यात ही विनंती
आपला विश्वासू
(रामदास जगताप)
राज्य समन्वयक,
ई-फेरफार प्रकल्प,
जमाबंदी आयुक्त
यांचे कार्यालय, पुणे.
प्रत
मा. उप आयुक्त महसूल , विभागीय आयुक्त कार्यालये (सर्व) यांना माहिते साठी
Comments