डिजिटल स्वाक्षरीत फेरफार रजिस्टर अहवाल - MIS
नमस्कार मित्रांनो
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सह
विषय - आज पासून उपलब्ध होत आहे - महाभूमी पोर्टल वरून सामान्य जनतेला रक्कम रुपये १५ फक्त पेमेंट गेटवे चा वापर करून डिजिटल स्वाक्षरीत सातबारा आणि खाते उतारा उपलब्ध करून दिल्यानंतर DILRMP प्रकल्पांच मुख्य घटक असलेल्या ई फेरफार किंवा ऑनलाईन फेरफार डिजिटल स्वाक्षरीने सामान्य नागरीकांना उपलब्ध करून देण्यासाठी मागील दीड दोन महिण्यापूर्वी DSD मोडूल मध्ये ई फेरफार प्रणालीतून ऑनलाईन घेतलेले व निर्गत केलेले फेरफार डिजिटल स्वाक्षरीत करण्याची सुविधा विकसित करून सर्व तलाठी यांना उपलब्ध करून दिली आहे तसेच मागील १०/१२ दिवसापासून ओटो DSD फेरफार सुविधा ९ फेरफार प्रमाणित करतानाच डिजिटल स्वाक्षरीत करण्याची सुविधा देखील सर्वांना उपलब्ध करून दिली आहे. परतू या प्रणालीमध्ये तलाठी मंडळ अधिकारी यांनी किती फेरफार डिजिटल स्वाक्षरीत केले आहेत व किती फेरफार शिल्लक / प्रलंबित आहेत हे समजण्यासाठी mis मध्ये उपलब्ध करून दिला आहे
कृपया आज दिनांक १.१.२०२१ रोजी खालील प्रमाणे प्रलंबित dsd फेरफार तालुका निहाय व गाव अहवाला मध्ये उपलब्ध करून दिले आहेत त्याचे अवलोकन करावे आणि हे सर्व कामकाज जाने २०२१ अखेर पूर्ण होईल असे पहावे.
Comments