संगणकीकृत सातबारा मधील चुका दुरुस्त करण्यासाठी कॅम्प घेणे बाबत.
महाराष्ट्र शासन
महसूल व वन विभाग
जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख , म.राज्य , पुणे
दूसरा व तिसरा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, विधान भवन समोर, कॅम्प, पुणे
---------------------------------------------------------------------------------------------------
दूरध्वनी- 020-26137110
Email ID :dlrmah.mah@gov.in Web site: https://mahabhumi.gov.in
क्रमांक : क्र.रा.भू.4/र.स./ मा.सू. 189 /2021 दिनांक : 15/01/2021
प्रति,
निवासी उपजिल्हाधिकारी तथा
डिस्ट्रीक डोमेन एक्स्पर्ट (डी.डी.ई)......(सर्व)
विषय- संगणकीकृत सातबारा मधील चुका दुरुस्त करण्यासाठी कॅम्प घेणे बाबत.
महोदय,
ई- फेरफार प्रणालीमध्ये राज्यातील 100% अधिकार अभिलेखाचे संगणकीकरण झाले असून या संगणकीकृत गाव न.नं. 7/12 चे आधारे दस्त नोंदणी केली जाते यामध्ये अचूकता येण्यासाठी आपण आटोकाट प्रयत्न करत आहात तथापि अजून देखील संगणकीकृत ७/१२ मध्ये चुका किंवा त्रुटी असल्याची निवेदने अथवा तक्रारी शासनाकडे, जमाबंदी आयुक्त कार्यालयाकडे आणि जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त होत आहेत तसेच अनेक खातेदार ई-मेल द्वारे किंवा दूरध्वनीद्वारे अडचणी मांडतात काही खातेदार ई-हक्क प्रणालीद्वारे ७/१२ मधील दुरुस्तीसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करतात तरीही त्यात दुरुस्ती होत नाही अश्या असंख्य तक्रारी इकडे प्राप्त होत आहेत. आत्ता हा प्रकल्प अंतिम टप्प्यात असताना १०० % अचूकता सध्या करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे.
संगणकीकृत ७/१२ मधील अचूकता सध्या करण्यासाठी आपण चावडी वाचन, एडीट, री एडीट सह कलम १५५ च्या आदेशाने दुरुस्ती च्या सुविधा उपलब्ध करून दिल्या त्यांचा वापर करून अचूक ७/१२ चे उद्दिष्ट आपण ९८% सध्या केले आहे त्यासाठी आपले सर्वांचे अभिनंदन.
तरीही ही अचूकता १०० % सध्या करण्यासाठी तसेच ई-फेरफार प्रणालीत निदर्शनास न येणाऱ्या काही त्रुटी/चुका खातेदार निदर्शनास आणून देत असतील तर त्यासाठी चूक दुरुस्तीचे अर्ज स्वीकारणे आणि त्याप्रमाणे तहसीलदार यांचे कलम १५५ खालील आदेश कडून ७/१२ दुरुस्त करण्यासाठी तालुका किंवा मंडळ स्थरावर कॅम्प घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे . त्यासाठी खालील प्रमाणे कार्यवाही करावी.
संगणकीकृत ७/१२ मधील चुका दुरुस्तीसाठी प्रत्येक तालुक्यात तालुका स्थरावर किंवा मंडळ स्थरावर आठवड्यातून एक दिवस कॅम्प आयोजनासाठी निश्चित करावा व त्याची व्यापक प्रसिद्धी देण्यात यावी.
१.
या कॅंप च्या ठिकाणी ७/१२ दुरुस्ती साठी नवीन अर्ज स्वीकारणे, जुन्या हस्तलिखित अभिलेखांवरून खात्री करणे, तलाठी यांनी कलम १५५ चे ऑनलाईन प्रस्ताव दाखल करणे, तहसीलदार यांनी ऑनलाईन प्रस्तावांना खात्री करून मान्यता देणे, परिशिष्ट क मधील आदेश तहसीलदार यांनी स्वाक्षरी करणे आणि मंडळ अधिकारी यांनी
तहसीलदार यांचे स्वाक्षरीत आदेश पाहून फेरफार नोंदी प्रमाणित करणे ईत्यादी कामे करण्यात येतील.
२.
संगणकीकृत ७/१२ मधील एकाही चूक दुरुस्ती आता तहसीलदार यांचे आदेशाशिवाय होवू शकत नसल्याने या कॅम्प साठी तहसीलदार व नायब तहसीलदार (ई-फेरफार) यांची उपस्थिती बंधनकारक राहील.
३.
ई-हक्क प्रणालीतून आलेले सर्व ऑनलाईन अर्ज या कॅम्पमध्ये निर्गत केले जातील.
४.
सदरचे सर्व कॅम्प उप विभागीय अधिकारी यांचे पर्यवेक्षणाखाली पार पडतील.
५.
या कॅम्प मध्ये ODC अहवालातील विसंगत ७/१२ ची दुरुस्ती देखील करण्यात येईल तसेच शासनाच्या दिनांक ११.१.२०२१ च्या निर्देशांप्रमाणे गाव नमुना नं.१ (क) मधील नोंदी देखील अद्यावत करणेत येतील.
६.
हे कॅम्प दर आठवड्यात एका ठराविक दिवसी २० जानेवारी ते २० मार्च २०२१ या कालावधीत प्रत्येक तालुक्यात आयोजित करण्यात येतील आणि या कॅम्पच्या पर्यवेक्षना साठी जिल्हा स्थरावरून व विभागीय स्थरावरून वरिष्ठ महसूल अधिकारी यांची नियुक्ती करावी.
७.
या कॅम्प ची फलनिष्पत्ती खालील नमुन्यात संकलित करून शासनाला आणि जमाबंदी आयुक्त कार्यालयाला पाठवावी.
संगणकीकृत ७/१२ मधील चुका दुरुस्तीसाठी आयोजित कॅम्प चा अहवाल – जिल्हा
-----
अ.नं. |
कॅम्पचा दिनांक |
कॅम्पचे ठिकाण |
दुरुस्ती साठी प्राप्त नवीन अर्ज |
कलम १५५ चे आदेश व फेरफार मंजुरी सह सर्व कार्यवाही पूर्ण अर्ज |
कारवाही अपूर्ण असलेले अर्ज संख्या |
दुरुस्त केलेल्या ७/१२ ची संख्या |
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
सदरच्या सूचना सर्व महसूल कर्मचारी आणि अधिकारी यांच्या निदर्शनास आणाव्यात आणि कॅम्प आयोजनाला व्यापक प्रसिद्धी देण्यात यावी.
आपला विश्वासू
(रामदास जगताप)
राज्य समन्वयक, ई-फेरफार
जमाबंदी आयुक्त कार्यालय, पुणे.
प्रत,
मा. उप आयुक्त महसूल , विभागीय आयुक्त कार्यालय (सर्व ) यांना महितीसाठी
Nice
ReplyDelete🖕👍👍
ReplyDeleteई हक्क प्रणाली मधुन प्राप्त अर्ज तलाठी सिरियस घेत नाही व काहीही कारण दाखवुन रद्द करतात.
ReplyDeleteOffline अर्ज करुन सुद्धा ७/१२ मधिल क्षेत्रफळाची चुक दुरुस्ती करत नाहीत
ReplyDelete