“ई-चावडी” प्रणाली विकसीत करण्यासाठी विषयतज्ञ गट नियुक्त करणे बाबत.
नमस्कार मित्रांनो
विषय :- “ई-चावडी” प्रणाली विकसीत करण्यासाठी विषयतज्ञ गट नियुक्त करणे बाबत.
राज्यशासनाने 7/12 संगणकीकरणासाठी ई-फेरफार प्रणाली सध्या राज्यभर कार्यान्वित केली आहे. तलाठी दप्तराचे संपुर्ण संगणकीकृत करणारी ई-चावडीप्रणाली NIC, Pune यांचे कडून विकसीत करून घेण्यासाठी सर्व कायदेशीर तरतूदी कार्यपध्दती (SRS/FRS) निश्चितकरणे, टेस्टींग करून वापरकर्ते स्विकृत्ती चाचणी (UAT) देणे बाबत खालील विषयतज्ञांची समिती स्थापन करण्यात येत आहे. या डोमेन एक्सपर्ट टीम मध्ये खालील सदस्य काम पाहतील.
श्री. विका सगजरे, उपजिल्हाधिकारी मुंबईउपनगर
श्री.राजेंद्र खंदारे, उपजिल्हाधिकारी तथा डी.डी.ई,
उस्मानाबाद
श्री.अभिजित भांडे उप विभागीय अधिकारी कल्याण जि.ठाणे
श्री.विजय तळेकर, तहसिलदार पनवेल,
श्री. विशाल दौंडकर, तहसिलदार, रायगड
श्रीआनंद देऊळगावकर, तहसिलदार, उमरखेड
श्री. शाम जोशी, मंडळअ धिकारी, वाशीम
श्री. हेमंत नायकवडी, मंडळ अधिकारी, पुणे
श्री. जे.डी.बंगाळे, मंडळ अधिकारी, जळगाव
श्री. सचिन जगताप, मंडळ अधिकारी, जळगाव
श्री. प्रशांत कांबळे, मंडळअधिकारी, श्रीगोंदा जि. अहमदनगर
श्री. बाळासाहेब गाढवे, मंडळ अधिकारी, जि.यवतमाळ
श्री. संजय अनव्हाणे, मंडळ अधिकारी, कामठी जि.नागपूर
श्री. सचिन वाघ, मंडळ अधिकारी, रायगड
श्री.शशिकांत सानप, तलाठी, उरण रायगड
श्री. विपीन उगलमुगले, तलाठी, करवीर जि. कोल्हापूर
श्री. अमोल रामशेट्टी, तलाठी, लातूर
श्री. शिवानंद वाकदकर, तलाठी, सिंदखेड राजा जि.बुलडाणा
श्री.कामराज चौधरी, तलाठी, पुसद जि.यवतमाळ
श्री.पंडीत चव्हाण, तलाठी, सांगली
श्री. संदीप आवळेकर तलाठी ता.कळमेश्वर जि.नागपूर
श्री.विशाल काटोले ता.मुर्तीजापूर जि. अकोला
वरील सर्व समिती सदस्यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 खंड 4 आणि महाराष्ट्र जमीन महसूल अधिकारअभिलेख नोंदवहया (तयार करणे व अद्यावत ठेवणे ) नियम १९७१ मधील तरतूदी अन्वये संपूर्ण तलाठी दप्तरातील संलग्नता विचारात घेऊन व ई-फेरफारप्रणालीतील उपलब्ध संगणकीकृत डेटाबेस विचारात घेऊन वापरण्यास सुरळीत व सुलभ जाईल अशी “ई-चावडी” प्रणाली विकसीत करण्यासाठी कार्यपध्दती (SRS) व आवश्यक तरतूदी ( FRS) निश्चित करून NIC, Pune च्या पथकाशी चर्चा करून प्रणाली विकसन मार्गदर्शक करणे. विकसीत प्रणालीचे वापरकर्ते स्विकृत्ती चाचणी (UAT) करून घेणे ही जबाबदारी असेल, हे सर्व कामकाज त्यांनी आपले मुळपदावरील कामकाज संभाळून जिल्हाधिकारी किंवा त्यांचे कार्यालय प्रमुखयांचे अनुमतीने करायचे आहे.
(रामदास जगताप)
उपजिल्हाधिकारी तथा
राज्य समन्वयक, ई-फेरफार
जमाबंदी आयुक्त कार्यालय, पुणे
दिनांक ६,१.२०२१
मा. रामदास जगताप सर,
ReplyDeleteविषय : “ई-चावडी” प्रणाली विकसीत करण्यासाठी विषयतज्ञ गट नियुक्त करणे बाबत.
महोदय,
वरील विषयान्वये ई-चावडी” प्रणाली विकसीत करण्यासाठी विषयतज्ञ गट नियुक्त करणे बाबत विषय तज्ज्ञाची समिती स्थापन करण्याबाबत उचललेल्या पावलंबाबत अभिनंदन सदर समितीमध्य उप जिल्हाधिकारी पासुन तलाठी यानां समाविष्ट केल्याबद्दल समाधानी आहे.
सदर समितीमध्य सातबारा धारक व मिळकतपत्रिका धारक तज्ज्ञ अंतिम शेवटचा लाभार्थी यांचा समावेश केल्यास त्यांना येणाऱ्या समस्यांचा सदर समिती मध्ये विचार केल्यास ई-चावडी” प्रणाली विकसीत करण्यास मदत होऊन पारदर्शकता ई-चावडी” प्रणाली विकसीत होण्यास मदत होईल असे माझे वयक्तिक मत आहे.
आपला
किरण निवृत्ती मालुंजकर
९८२२६६८०२३