प्रलंबित हरकतीचे फेरफार (तक्रार नोंदी) संबंधी MIS उपलब्ध करून दिल्या बाबत
नमस्कार मित्रांनो,
विषय – प्रलंबित हरकतीचे फेरफार (तक्रार नोंदी) संबंधी MIS उपलब्ध
करून दिल्या बाबत
आपल्या सर्वांचे विनंती प्रमाणे आणि तालुका स्थरावर सर्व हरकतीचे
फेरफार(विवादग्रस्त प्रकरणे) यांचा आढावा
घेण्यासाठी आवश्यक असलेला प्रलंबित हरकतीचे फेरफार (तक्रार नोंदी) संबंधी MIS उपलब्ध आज पासून ई
फेरफार प्रणालीच्या सर्व वापरकर्ते यांना उपलब्ध करून दिला आहे. शासनाचे दिनांक
४.७.२०१९ च्या शासन परिपत्रकान्वये कोणतीही तक्रार नोंद/ विवादग्रस्त फेरफार तीन
महिन्याचे आत निर्गत करणे आवश्यक असल्याने त्याचा नियमित आढावा तहसीलदार व उप
विभागीय अधिकारी यांनी घेणे अपेक्षित आहे
त्यासाठी आवश्यक असलेला अद्ययावत ऑनलाईन mis ई फेरफार प्रणीत उपलब्ध करून दिला आहे. यासोबतच गाव निःयं मुदत निहाय हरकत नोंदींचे ( नोंदणीकृत
व अनोंदणीकृत ) अहवाल देखील देण्या आले असलेने त्यातून गाव निहाय व कालावधी निहाय
प्रलंबित हरकत फेरफार संबंधी माहिती वरिष्ठ अधिकारी यांना उपलब्ध होईल.
आता ह्याचे आधारे आढावा घेवून आपल्याकाडीl प्रलंबित फेरफार वेळेत निर्गत करण्यासाठी सर्व महसूल अधिकारी प्रयत्न करतील अशी अपेक्षा आहे
आपला
रामदास जगताप
दिनांक २५.१२.२०२०
Sir vegavegale badal updeat tar pahijet pan payabhut suvidha mhanje sever speed babat kahitari upay yojana karavi hi 👏👏
ReplyDeleteसर एकाच व्यक्तीचे सातबारा वरील नाव व आधार कार्ड किंवा इतर कागदपत्रांवरील नाव वेगवेगळी असल्यास काय कार्यवाही करावी.
ReplyDeleteप्रत्येक व्यक्ती राजपत्र घेऊन येत नाही अशावेळी काय कार्यवाही करावी कृपया मार्गदर्शन करावे