रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

ई फेरफार प्रणाली मध्ये दि.१८.१२.२०२० पासून दिलेल्या नवीन सुविधा व केलेल्या सुधारणा

 

ई फेरफार प्रणाली मध्ये दि.१८.१२.२०२० पासून दिलेल्या नवीन सुविधा व केलेल्या सुधारणा

 

Sr.No

ई फेरफार प्रणाली मध्ये दि.१८.१२.२०२० पासून दिलेल्या नवीन सुविधा व केलेल्या सुधारणा

1

या पूर्वीच निर्गत झालेले फेरफार डिजिटल स्वाक्षरीत करण्याची सुविधा DSD मध्ये देण्यात आली आहे .

2

 फेरफार निर्गत करतानाच ते गाव नमुना नं. ६ (फेरफार नोंदवही ) आपोआप डिजिटल स्वाक्षरीत करण्याची सुविधा ई-फेरफार प्रणालीत  देण्यात आली आहे .

3

पीक पाहणी च्या नोंदी अपडेट केल्या नंतर तो ७/१२ आपोआप डिजिटल स्वाक्षरीत होईल आशी सुविधा ई फेरफार प्रणालीत दिली आहे

4

DDM HO – तहसीलदार,  नायब तहसीलदार, उप विभागीय अधिकारी , डी डी ई यांना  DDM सुविधा उपलब्ध करून दिली आहे

5

आदेशाच्या फेरफार वर वरिष्ठ अधिकारी /न्यायालयाचे स्थगिती आदेश असल्यास तलाठी यांना त्या स्थगिती आदेशाची प्रत अपलोड करून स्थगिती नोंदविता येईल त्यानंतर अशा ७/१२ वर अन्य खात्यासह त्या खात्यावर देखील दुसरा फेरफार नोंदविता येईल व प्रमाणित देखील करता येईल मात्र स्थगितीचा फेरफार प्रलंबित असलेल्या खात्यावर अन्य फेरफार नोंदविताना तलाठी यांनी विशेष दक्षता घ्यावी. स्थगिती नमूद केलेला फेरफार फिफो मधून आपोआप स्किप होईल  

6

तलाठी यांनी मोठे (Big)क्षेत्राचे / अवास्ताव क्षेत्राचे  सर्व्हे नंबर ला मान्यता देण्याची विनंती केली असल्यास तहसिलदार यांना  मान्यता देता येत होती परंतु अमान्य केल्यावर काहीच action होत नाही असे होत होते आत्ता असे होणार नाही तहसीलदार यांना तलाठी यांची विनंती अमान्य करता येईल व  असे ७/१२ तलाठी यांना अन्य फेरफार साठी उपलाधा राहतील .

7

DDM talathi Chalan पेमेंट गेटवे द्वारे ऑनलाईन भरण्याची सुविधा महाभूमी पोर्टलवर देण्यात आली आहे. त्यामुळे आता अभिलेख वितरण प्रणालीचे चलन भरण्यासाठी बँकेत जाण्याची गरज राहणार नाही. LINK -  https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/ddmchalan

8

भाडेपट्टा फेरफार (नोंदणीकृत फेरफार )  दुय्यम निबंधक कार्यालयातील नोंदणीकृत भाडेपट्टा दस्त लिंकेज द्वारे फेरफार मध्ये येईल . री एन्ट्री ची सुविधा विकसित केली आहे.

9

भाडेपट्टा फेरफार (अनोंदणीकृत  फेरफार)– दुय्यम निबंधक कार्यालयातील नोंदणीकृत भाडेपट्टा दस्त तलाठी कार्यालयात ऑफ लाईन पद्धतीने खातेदाराकडून प्रत्यक्ष प्राप्त झाल्यास  अनोंदणीकृत म्हून तलाठी यांना फेरफार नोंदविता येईल . री एन्ट्री ची सुविधा विकसित केली आहे.

10

यापुढे १.भूधारणा बदलणे, २. स.नं. बदलणे , ३. आदेशाने स.न. बंद करणे, ४. आदेशाने बंद स.नं. पुन्हा सुरु करणे  आणि ५. बिनशेती आदेशाचे फेरफार घेताना तलाठी यांनी आदेशाची प्रत अपलोड करून तहसीलदार यांची अनुमती घेणे बंधनकारक/ आवश्यक  असेल.

11

आत्ता एकाच गटावर अनेक वारस नोंदी चे अर्ज प्राप्त झाल्यावर एकाच खात्यावर अथवा अन्य खात्यावर  सर्व अर्जाचे फेरफार घेता येतील.  

12

आता आदेशाने बंद ७/१२ सुरु करताना अनेक ७/१२ एकाच फेरफाराने सुरु करता येतील.

13

अ.पा.क. नाव कमी करणे या फेरफारच नोटीस कालावधी शून्य केला आहे त्यामुळे आता अ.पा.क. नाव कमी करणे  तात्काळ मंजूर/ निर्गत  करता येईल.

14

आता सर्व दस्त करून देणार आणि दस्त कडून घेणार यांची नावे नमुना ९ च्या नोटीस मध्ये आपोआप येतील अन्य हित्साम्बंधीतांची नावे तलाठी यांना नोटीस तयार करताना समाविष्ट करता येतील.

15

 कोणताही ७/१२ odc अहवाल 1,2,4,5,7,8,10,11,12,13,15,16,18,19,20,21,22,24,25,26,27,28,30,31,33,35,37,41,43,   3-A मध्ये असे पर्यंत तसा शेरा DDM मधील ७/१२ वर दर्शविण्यात येईल.

16

गहाणखत बोजा आणि घोषणापत्र बोजा असे दोन प्रकार बोजा फेरफार मध्ये देण्यात आले आहेत . गहाणखत बोजा साठी दस्त क्र. आवश्यक असेल आणि घोषणापत्र बोजा फेरफार साठी बँकेचे पत्र क्र. व दिनांक आवश्यक असेल.  

17

वाडी विभाजन नंतर नविन गावातील ७/१२ वर असणारे जुन्या गावातील  स.नं. काय होता तो  नविन गावात आलेले सर्व्हे नंबर च्या समोर जुन्या गावाचे नाव व जुना स.नं. काय होता हे दर्शविण्यात येईल.  

18

ई-फेरफार प्रणालीच्या दैनंदिन कामाची प्रगती दर्शविणारा दर दोन तासाने अद्यावत होणारा DILRMP कामकाजाचा प्रगती अहवाल (work status) mis मध्ये सर्व वापरकर्ते यांना उपलब्ध करून दिला आहे त्यावरून दैनंदिन कामकाजाचा आढावा घेता येईल.

19

सामाईक किंवा संयुक्त खात्यातील एक / काही खातेदार यांची नावे  मयत किंवा विक्री द्वारे कंस होवून एकाच नाव live असल्यास त्याचा वैयक्तिक खाता प्रकार निवडता येत नव्हता  अशा जुन्या केसेस फेरफाराने  खाता विभाजन मध्ये उपलब्ध होतील आणि या पुध्ये वारस , अपाक शेरा कमी करणे, राज्पात्राने नावात बदल, मयताचे नाव कमी करणे  निर्गत / प्रमाणित करतानाच त्याचे आपोआप खाता विभाजन होईल व live नावांचे नविन खाते तयार होईल अशी सुविधा देण्यात आली आहे.

20

आता कलम १५५ च्या आदेशाने कोणताही फेरफार घेताना तहसीलदार यांनी आदेशाची प्रत अपलोड करून त्यास मान्यता देणे आवश्यक असेल.

21

SRO  कडून ऑनलाईन येणाऱ्या सर्व फेरफार साठी (नोंदणीकृत फेरफार) अशी नोंद फेरफार प्रकार मध्ये फेरफार नोंदवहीत आपोआप दर्शविण्यात येईल त्यावरून हे फेरफार लिंकेज द्वारे नोंदविले असल्याचे तात्काळ समजून येईल.

22

तलाठी लॉगीन ला अभिलेख वितरण प्रणालीतून(DDM) ७/१२ नक्कल वितारणा साठी  १. एक वर्षाची पीक पाहणी  २. तीन वर्षाची पीक पाहणी आणि ३. सर्व वर्षाची पीक पाहणी असे तीन पर्याय उपलब्ध असतील.

23

ई फेरफार प्रणाली  मध्ये तलाठी लॉगीन ला प्रत्येक गावातील एडीट आणि री एडीट मोडूल मधून घेण्यात आलेल्या फेरफारांचा अहवाल उपलब्ध करून देण्यात आला आहे.

24

ई फेरफार प्रणाली  मध्ये तलाठी लॉगीन ला प्रत्येक गावातील SRO कडून प्राप्त फेर्फारचे बाबतीत दस्त करून देणारे, दस्त करुन  घेणारे यांची नावे , मोबाईल नंबर , ई मेल आयडी, दुय्यम निबंधकाचे नाव, दस्त नं. स.नं. आणि दस्तातील क्षेत्र दर्शविणारा स्वतंत्र अहवाल उपलब्ध करून देण्यात आला आहे.

25

प्रत्येक वापरकर्त्याच्या लॉगीन ला तसेच नायब तहसीलदार – ई फेरफार यांचे लॉगीन ला Digital Signature Expiry Alert उपलब्ध करून दिला आहे त्यामुळे नवीन DSC घेणे किंवा DSC  नूतनीकरणाची कार्यवाही पुरेशी आगोदरच करून घेता येईल.

26

दुय्यम निबंधक यांचे कडुन आलेले दस्त हे फेरफार घेणेसाठी तलाठी लॉगिन ला येतात परंतु सदर दस्ताची सुची क्र. 2  दस्त  उपलब्ध होत नाहीत ही अडचण दूर केले असून असे असल्यास तात्काळ help desk ची मदत घ्यावी.

27

मंडळ अधिकारी यांनी प्रमाणित केलेले फेरफार दिनांकानिहाय महिनानिहायफेरफार क्रमांकानुसार मंडळ अधिकारी यांना  पाहता येतील उदा.1 जानेवारी ते 31 जानेवारी ह्या महिण्यामध्ये किती फेरफार घेतले  त्यापैकी किती मंजुर झालेह्याचा पुर्ण गोषवारा फेरफार निहाय उपलब्ध करून दिला आहे.

28

नोंदवही/१२८अ etc. या ठिकाणी सर्व आज्ञावली  मधील  रिपोर्ट मध्ये  “तलाठी साझा” असे नमूद केले आहे.

29

SRO कडुन चुकीची माहिती आलेली नष्ट केलेल्या दस्ताचा फेरफार घेताना allot केलेल्या फेरफार क्रमांकाचा फेरफार प्रकार बदलता येणार नाही. असे फेरफार येत असल्यास हेप देस ची मदत घ्यावी.

30

अविभाज्य हिस्स्याचे खरेदीपत्र या प्रकारातील फेरफार प्रलंबित असल्यावर त्या  गटावर  इतर  फेरफार  होत  नाहीत व  इतर  दस्ताचे  देखील  फेरफार  मध्ये  रुपांतर  करता  येत  नाही. ही अडचण दूर केले असून त्या स.नं. मधील अन्य खात्यावर फेरफार घेवून निर्गत करता येईल मात्र त्याच खात्यावर अन्य फेरफार घेता येणार नाही.   

31

तलाठी यांनी आदेशाने बिनशेती (NA), आदेशाने जुना /१२ बंद नविन पोट हिस्सा तयर करणे फेरफार घेताना पुर्वावलोकन मध्ये एकक हे.आरमध्ये दिसते  साठवा  केल्यावर डैशबोर्ड वरुन बरोबर दिसत होती त्यामध्ये दुरुस्ती केले आहे आता योग्य एकक दिसेल .

32

UC मॉड्युलमध्ये तहसीलदार लॉगिन मध्ये गांव नमुना 1 ची दुरुस्ती यामध्ये पहिल्या पानावरील दुरुस्तीना मान्यता दिल्यावर ते पेज तेथुन Refresh होउन कमी झाले पाहीजे पण तसे होत नाहीआता दुसरे गांव निवडुन पुन्हा तेच गाव निवडल्यावर सबंधीत पान कमी होतेतरी त्या ठिकाणी असलेल्या दुरुस्त्यांना मंजुरी दिल्यावर पान लगेच Refresh होउन कमी झाले पाहीजे अशी अडचण होती आत्ता त्यात सुधारणा करून स.नं. निहाय काम करता येईल व अहवाल जुळल्यास तो स.नं. तेथून निघून जाईल अशी सुधारणा केले आहे.

33

कलम १५५च्या आदेशाने फेरफार रजिस्टर दुरुस्ती बाबत काम संपल्याची घोषणा होत नाही.(अश्या वेळी एक शक्यता अशी असते कि तलाठी यांनी सदर फेरफार रजिस्टर दुरुस्तीला अगोदरच निवडलेला असतो   कुठल्या तरी स्टेपला काम प्रलंबित असतेअश्यावेळी योग्य तो प्रलंबित कामांचा मेसेज दिला जाईल .

34

कलम १५५ च्या आदेशाने अहवाल  ची दुरुस्ती१५५ च्या आदेशाने  दुरुस्ती /१२ वरील क्षेत्र दुरुस्ती फेरफार तयार करताना दिनांक चे drop down date  निवडले  नंतर  logout  होते  व्यवस्थित  काम  करत  नाही  दिनांक  टाईप  केल्या  नंतर  फेरफार  save होतो अशी अडचण होती ती दूर केली आहे .

35

तलाठी यांनी निवडलेले  खाता दुरुस्तीचूक दुरुस्ती केलेले सर्व गट  तहसीलदार  यांना मंजुरी  करण्यास दिसत  नाहीत    त्या  मुळे  तलाठी लॉगीन ने फेरफार तयार होत नव्हते ती अडचण दूर केली आहे.

36

एखाद्या /१२ वरील पोट खराब चे क्षेत्र खातेदार च्या नावा समोर नमूद नसते परंतु तो अहवाल  मध्ये दाखविला जात नाही – अशा गटांचा odc मध्ये अहवाल देनेत आला आहे.

37

भुधारणा पद्दती वर्ग  चा उपप्रकार असल्यास यांचा अहवाल दिला आहे तसेच काल्म ६३  मध्ये  खरेदीचा  दिनांक  सुद्धा  नमुद  करण्याची  सोय देण्यात आली आहे .

36

सर्व खाते प्रकार  त्याचे लॉजिक चा विचार करून गावनिहाय सर्व खाते प्रकार मधील खात्यांची संख्या दर्शविणारी यादी अहवाल स्वरूपात देण्यात आली आहे

39

DDM मधील /१२ खाते उतारा  फेरफार नक्कल च्या खाली  तलाठी यांचे नावाचे मध्ये सही साठी पुरेशी स्पेस देण्यात आली आहे.

40

आदेशाने खाता दुरुस्ती मध्ये existing (bracketed)  खाते  पुन्हा  live  करता येईल अशी सुविधा आहे.

41

नोंदणीकृत फेरफार रि-एन्ट्री  मध्ये  जसा  दस्त  क्रमांक  bind  केला  आहे  त्याच  प्रमाणे  इतर  सर्व  माहिती  दस्ताचा  इतर  तपशील,  दिनांकदुय्यम निबंधक इत्यादी ची माहिती स्वतंत्र अहवालात दिली आहे.  

42

खरेदी बक्षीसपत्र फेरफार मध्ये क्षेत्राचे एकक हे.आर./चौ.मी असे चुकीचे येत होते ते दुरुस्त करून आत्ता त्या ऐवजी शेती चा ७/१२ असल्यास हे.आर.चौ.मी.आणि ७/१२ बिनशेतीचा असल्यास आर.चौ. मी असेच एकक दर्शविण्यात येईल.

43

8 मध्ये एकुण किती सर्व्हे नंबर आहेत (total count of pin) दाखवायला सुरुवात केली आहे.

44

बिनशेती ८अ OPEN होत नाही शेती ८अ चे by default selected असलेने – योग्य मेसेज देण्यात आला आहे.    

45

वारस फ्लो मधील फेरफार घेताना टोपण नाव मध्ये लिहिलेली माहिती फेरफार च्या तपशील मध्ये येत नाही तलाठी यांना ते लगेच लक्षात येत नाही. त्या साठी १५५ ने फेरफार रजिस्टर दुरुस्ती करावी लागते..(इतर flow बाबत देखील खात्री करावी) वारस नोंद घेताना अपाक चे नाव टोपण नावात घेतल्यास फेरफार तपशील मध्ये अपाक चे नाव येत नाही तर ७/१२ मात्र योग्य पद्धतीने नाव दिसते . त्यात योग्य ती सुधारणा केली आहे.           

46

फेरफार मध्ये हितसंबंधित यांना नोटीस बजावल्याचा दिनांक –  येईल मात्र आदेशाचे फेरफार साठी ते बंधनकारक नसेल.

47

फेरफार प्रमाणन अधिकारी यांचा शेरा व नाव या मध्ये जास्त स्पेस दिसून येते  होता तो कमी करणेत आला आहे. तसेच मंडळ अधिकारी यांचे नावाच्या आगोदरच्या लाईन वर फेरफार प्रमाणित केलानंतर xxx स्वाक्षरीत xxx असे दर्शविण्यात येत आहे.

48

हक्कसोडपत्राचा फेरफार मध्ये हक्क घेणारच्या नावासमोर चालु हक्कसोडपत्राचा फेरफार क्र. येत नाही.  परंतु देणारच्या नावासमोर येतो. व हक्कसोडपत्राच्या फेरफार मध्ये खाते निहाय हक्क देणारची माहीती बटन काम करत नव्हते ती अडचण दूर करणेत आली आहे.  

49

बोजा दाखल किवा इकरार च्या नोंदी घेताना ‘सर्व सर्व्हे क्र निवडा बटन’ देण्यात आले आहे.

50

वाडी विभाजनानंतरचे फेरफार DDM दर्शविण्यात येत आहेत  

51

SRO कडुन आलेला फेरफार जर नष्ट केला असल्यास त्याला फेरफार क्रमांक assign झालेला असतो परंतु जर त्याच दस्ताचा फेरफार पुन्हा घेण्यासाठी अर्ज आल्यानंतरच फेरफार घेतला जातोत्यामुळे खुप जास्त मागील फेरफार क्रमांक असु शकतोत्यासाठी प्रत्येक  वेळेस alert चा मेसेज द्यावा या साठी नवीन अहवाल उपलब्ध करून दिला आहे.

52

गावातील चालू फेरफार क्रमांकापेक्षा मोठ्या फेरफार क्रमांकाचे खाते ते ७/१२ वर दिसत नाही त्यासाठी Imaginary Mutation Numbers बदलून योग्य फेरफार क्रमांक नमूद करावा. हे फार महत्वाचे आहे.

53

मंडळ  अधिकारी लॉगिनने  फेरफार  योग्यरीत्या  प्रमाणित  झाला  / नाही  टिक  करताना  untitled page  ओपन होत होते त्यासाठी योग्य मेसेज देण्यात आला आहे.

54

तलाठी लॉगीन मधील मंडळ अधिकारी सुचना बटण disable  दिसतेरि-एन्ट्री ला  पाठविलेल्या  फेरफार  बाबत  compulsory  असावे  जेणे  करून  तलाठी  याना  काय  दुरुस्ती  करायची  आहे  ते  कळावे या साठी आता मंडळ अधिकारी शेरा भरल्या शिवाय री एन्ट्री बटन वापरता येणारच नाही अशी सोय दिली आहे , कारण नसताना / चुकीचे कारण नमूद करून  मंडळ अधिकारी यांनी री एन्ट्री साठी फेरफार पाठवू नये.

55

एडीट आणि री एडीट मोडूल मधील सर्व फेरफार DDM मध्ये उपलब्ध करून दिले आहेत मात्र परिपूर्ण फेरफार असल्याची योग्यती खात्री करूनच  नक्कल वितरीत करावी.

56

ODC मधील अत्यंत महत्वाचे २६ अहवाल निरंक असल्याशिवाय असे ७/१२ DSD होणार नाहीत त्यामुळे सर्व महत्वाचे अहवाल निरंक झाल्या शिवाय ( उप विभागीय अधिकारी यांचे घोषणापत्र ४) DSD चे काम १०० % होणार नाही.

57

आता मंडळ  अधिकारी  लॉगीन च्या  प्रलंबित फेरफार  MIS हा  फेरफार प्रमाणित करण्यास पात्र झाल्या तारखे पासून  म्हणजेच नोटीस बजावल्याच्या शेवटच्या तारखे पासून १५ दिवस विचारात घेवून  तयार केला आहे .

58

खातेदार यांना वाटप न केलेले  पोट खराब क्षेत्र खातेदारांना विभागून द्यायचे असल्यास कलम १५५ च्या आदेशाने क्षेत्र दुरुस्ती पर्यायातून करता येईल.

59

bhulekh संकेतस्थळावरून दिसणारा विनास्वक्षारीत ७/१२ आता pdf स्वरूपात दाखविण्यात येत आहे त्यामुळे त्याचा गैरवापर बंद होईल. कोणत्याही तलाठ्याने विनास्वाक्षरीत / मोफत ७/१२ वर स्वाक्षरी करून देवू नये.

60

कोणत्याही खात्याची विभागणी आवश्यक असल्यास किंवा खाते प्रकार चुकीचा असल्यास तसा मेसेज खाते उताऱ्यावर देण्यास सुरुवात केली आहे.

 61

SRO कडुन आलेला फेरफार जर नष्ट केला असल्यास त्यालाफेरफार क्रमांक assign झालेला असतो परंतु जर त्याच दस्ताचा  फेरफार  पुन्हा  घेण्यासाठी  अर्ज आल्यानंतरच  फेरफार घेतला जातत्यामुळे खुप जास्त मागील  फेरफार  क्रमांक  असु  शकतोत्यासाठी दस्त क्रमांक ची री एन्ट्री करताच फेरफार क्रमांक तयार झाल्याचा दिनांक दर्शविण्यात येईल.

62

आता दुय्यम निबंधक यांचे करून विक्रीप्रमाणपत्रविकसन करारनामा,  भाडेपट्टा हे नवीन नोंदणीकृत दस्त ऑनलाईन प्राप्त होतील.

63

 ई हक्क प्रणालीतून प्राप्त अर्जा बाबत अर्जदाराचा मोबाईल नंबर, ई मेल आयडी आणि पत्ता इत्यादी माहिती ई फेरफार मधील PDE IMPORT Dashboard  दाखवायला सुरुवात केली आहे त्याचा वापर करून तलाठी यांना हे ई हक्क मधून ऑनलाईन प्राप्त अर्ज निर्गत करणे अधिक सोपे होईल अशी अपेक्षा आहे.

64

वाडी विभाजन करून तयार होणार्या नवीन महसुली गावात पिकांची माहिती देखील अचूकरीत्या स्थलांतरित होईल.

Comments

Archive

Contact Form

Send