रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

ई-पीक पाहणी प्रकल्पाची पथदर्शी तालुक्यात अंमलबजावणी करणे बाबत.

 

 

 

                                                                                          दिनांक – १६.डिसेंबर, २०२०

१. विभागीयआयुक्त, नाशिक, औरंगाबाद, पुणे, अमरावती, कोकण.

२. जिल्हाधिकारी, नाशिक, औरंगाबाद, पुणे, अमरावती, अहमदनगर, परभणी, पालघर,बीड.

३. उप जिल्हाधिकारी तथा डी.डी.ई. , नाशिक, औरंगाबाद, पुणे, अमरावती, अहमदनगर, परभणी, पालघर,बीड.

 

विषय – -पीक पाहणी प्रकल्पाची पथदर्शी तालुक्यात अंमलबजावणी करणे बाबत.

संदर्भ

          . महसूल व वन विभाग शासन निर्णय जा.क्र.जमीन२०१८/प्र.क्र.९२/-१अ दिनांक१० सप्टेंबर,२०१८

          . महसूल व वन विभाग शासन निर्णय जा.क्र.जमीन २०१८/प्र.क्र.९२/- १अ दिनांक ४ फेब्रुवारी, २०१९

          . महसूल व वन विभाग पत्र जा. क्र. जमीन २०१८/ प्र. क्र. ९२/ -१अ दिनांक २५ जून,२०१९

         . महसूल व वन विभाग शासन निर्णय जा.क्र.जमीन २०१८/प्र.क्र.९२/- १अ दिनांक ९मार्च, २०२०

 

                         संदर्भ मध्ये नमूद केलेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील निवडक (६) तालुक्यात रब्बी हंगाम २०१८ पासून व संदर्भ मधील शासन आदेशा नुसार तालुका सेलू, सिल्लोड आणि संगमनेर ह्या ३ तालुक्यांचा समावेश केला असून पथदर्शी स्वरूपात टाटा ट्रस्टसच्या सहकार्याने ई-पीक पाहणी प्रकल्प राबविण्यात येत आहे याची आपणास जाणीव आहे.  

                           रब्बी हंगाम २०२०-२१ मध्ये -पीक पाहणी प्रकल्पाची अंमलबजावणी सुरूच ठेवावयाची आहे. मागील खरीप हंगामात ज्या पद्धतीने प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात आलेली आहे त्याच प्रमाणे चालू रब्बी हंगामात प्रकल्पाची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.

ज्या पथदर्शी तालुक्यात उदा. वाडा जिल्हा पालघर,सेलू जिल्हा परभणी येथे अपेक्षेप्रमाणे -पीक पाहणीचे समाधानकारक काम झालेले नाही त्या ठिकाणी संबंधित उपविभागीय अधिकारी, तहसीलदार ह्यांनी समन्व्ययाने कार्यवाही करावी.

संदर्भ क्रमांक शासन निर्णयान्वये संबंधित जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा स्तरावर आणि संदर्भ क्रमांक निर्णयान्वये महसुली विभाग स्तरावर विभागीय आयुक्तयांच्या अध्यक्षते खाली समन्व्यय समित्यांचे गठन करण्यात आलेले आहे.   या समित्यांच्या बैठका वेळोवेळी आयोजित करून =पीक पाहणी प्रगतीचा आढावा घ्यावा कार्यवृत्तांतसह  प्रगती अहवाल दर सोमवारी रब्बी हंगाम पूर्ण होई पर्येंत शासनाकडे व इकडे पाठवावा.

विभागीय आयुक्त आणि संबंधित जिल्हाधिकारी ह्यांना विनंती करण्यात येते कि -पीक पाहणी बाबत वैयक्तिक लक्ष देऊन मागील खरीप हंगामात अचलपूर जिल्हा अमरावती प्रमाणे १०० % रब्बी क्षेत्राखालील -पीक पाहणी पूर्ण होण्याबाबत कार्यवाही करावी. 

संबंधित उप जिल्हाधिकारी तथा डी.डी.ई. यांनी ई पीक पाहणी प्रकल्प रब्बी २०२० हंगामात यशस्वी करण्यासाठी योग्य नियोजन करावे.   

आपला स्नेहांकित,

 

रामदास जगताप

उप जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष

ई पीक पाहणी प्रकल्प अंमल बजावणी उपसमिती

जमाबंदी आयुक्त कार्यालय , पुणे

Comments

Archive

Contact Form

Send