चूक दुरुस्ती खाता दुरुस्ती क्रॉस म्युटेशन (CDKDCM) नवीन दुरुस्ती सुविधा - मार्गदर्शक सूचना क्र. १७७ दिनांक २०.८.२०२०
महाराष्ट्र
शासन
महसूल व वन
विभाग
जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख, महाराष्ट्र राज्य
दूसरा व तिसरा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, विधान भवन समोर, कॅम्प, पुणे -०१
दूरध्वनी क्र. ०२०-२६१३७११० Email ID :statecordinatormahaferfar@gmail.com
Website : https://mahabhumi.gov.in
---------------------------------------------------------------------------------------------------------------
क्र.रा.भू.अ.आ.का.४/रा.स./मा.सु.१७७
/२०२० दिनांक
: २०.८.२०२०
प्रति ,
मा. उप जिल्हाधिकारी तथा डी.डी.ई.(सर्व)
विषय – चूक दुरुस्ती खाता दुरुस्ती क्रॉस म्युटेशन (CDKDCM) नवीन दुरुस्ती सुविधा
महोदय,
ई फेरफार प्रणाली मध्ये
संपूर्ण राज्यात आज दिनांक २०.८.२०२० पासून खालील चूक दुरुस्ती खाता दुरुस्ती क्रॉस म्युटेशन (CDKDCM) ही नवीन दुरुस्ती सुविधा सर्व तलाठी,
मंडळ अधिकारी व तहसीलदार यांना उपलब्ध करून दिली आहे.
चूक दुरुस्ती व खाता दुरुस्ती
फेरफार घेवून तो प्रमाणित होईपर्यंत अन्य कोणताही फेरफार घेवू नये अथवा प्रमाणित
करू नये असे अपेक्षित असताना सुरुवातीच्या काळात असे चूक दुरुस्ती व खाता दुरुस्ती
चे कामकाज सुरु असताना अन्य फेरफार घेवून प्रमाणित झाले असल्यास व त्यानंतर असे
चूक दुरुस्ती व खाता दुरुस्ती चे फेरफार प्रमाणित केल्यास दरम्यानचे काळात
घेतलेल्या व प्रमाणित केलेल्या फेरफारांचे अंमल ७/१२ वरून नष्ट होवू शकतात त्यालाच
आपण चूक दुरुस्ती खाता दुरुस्ती क्रॉस म्युटेशन (CDKDCM) म्हणतो.
१.
ज्या ७/१२ वर चूक दुरुस्ती खाता दुरुस्ती
क्रॉस म्युटेशन झाले आहेत त्या ७/१२ ची दुरुस्ती CDKDCM या दुरुस्ती सुविधेतून केल्याशिवाय अशा ७/१२ वर
कोणताही नवीन फेरफार घेता येणार नाही अथवा नवीन दस्त नोंदविता येणार नाही व
त्याबाबतचा स्पष्ट मेसेज / संदेश असा ७/१२ फेरफार साठी निवडताच दर्शविण्यात येईल.
२.
ई फेरफार प्रणालीत कोणतेही गाव निवडताच जर
त्या गावातील काही ७/१२ वर चूक दुरुस्ती खाता दुरुस्ती क्रॉस म्युटेशन झाले
असल्यास तेथे तसा स्पष्ट संदेश / मेसेज देवून चूक दुरुस्ती खाता दुरुस्ती क्रॉस
म्युटेशन (CDKDCM) ची दुरुस्ती प्रक्रिया https://mahaferfarnas.enlightcloud.com/cdkdcm/ या लिंकवरून
करावी असे दर्शविले जाईल तसेच तेथूनच या
बाबतचे user manual देखील डाऊनलोड करून घेता येईल व असे दुरुस्तीचे काम
केल्यानंतरच अशा ७/१२ वर अन्य फेरफार घेता येतील.
कोणत्याही गावात असे
क्रॉस म्युटेशन झाले असल्यास ई फेरफार मध्ये ते गाव निवडताच खालील प्रमाणेसुचना
तलाठी लॉगीन ला दिसेल.
महत्वाची सूचना-
सुरवातीच्या काळामध्ये जेव्हा खाता दुरुस्ती फेरफार व चूक दुरुस्ती फेरफार हा
प्रथम वेळेस सर्वांना देण्यात आला होता त्यावेळेस सदर दुरुस्ती पूर्ण झाल्याशिवाय
म्हणजेच तो फेरफार प्रमाणित झाल्याशिवाय इतर कोणताही फेरफार नोंदवणे अपेक्षित
नव्हते परंतु काही गावांमध्ये असे न करता खाता दुरुस्ती फेरफार अथवा चूक दुरुस्ती
फेरफार अपूर्ण ठेऊन दुसरे फेरफार नोंदवले गेले व दरम्यान इतर फेरफार प्रमाणित पण
केले गेले. तदनंतर सुरवातीस घेतलेला खाता दुरुस्ती फेरफार अथवा चूक दुरुस्ती फेरफार हा
तहसीलदार यांच्या मान्यतेने नोंदऊन मंडळ अधिकारी यांच्या द्वारे प्रमाणित झाला. त्यामुळे खाता दुरुस्ती फेरफार अथवा चूक दुरुस्ती फेरफार
नोंदऊन मंडळ अधिकारी यांच्या द्वारे प्रमाणित करण्याच्या कालावधी मध्ये जे अन्य
फेरफार प्रमाणित झाले होते त्यांचे नोंदी दिसेनास्या झाल्या व खाता दुरुस्ती
फेरफार अथवा चूक दुरुस्ती फेरफार नोंद प्रमाणित झाल्याची नोंद ७/१२ वर दिसू लागली. हि बाब जेव्हा आपल्या निदर्शनास आली तेव्हा ई-फेरफार प्रणाली मधे खाता दुरुस्ती फेरफार अथवा चूक दुरुस्ती फेरफार नोंदऊन
मंडळ अधिकारी यांच्या द्वारे प्रमाणित होई पर्यंत दुसरा कोणताही फेरफार प्रमाणित
होऊ न देण्यासाठी उपाय योजना केली गेली. परंतु दरम्यानच्या काळा मधे असे जे फेरफार प्रमाणित झाले व तदनंतर ज्यांचे नोंदी दिसेनास्या झालेल्या
अशा सर्वे क्रमांकावर त्या नोंदी पुनः प्रस्थापित करण्यासाठी चूक दुरुस्ती फेरफार
घेऊन सदर नोंदी पूर्ववत करता येतील.
अशा वेळेस खाता दुरुस्ती फेरफार अथवा चूक दुरुस्ती फेरफार जो इतर फेरफारानंतर प्रमाणित केला त्याची नोंद घ्यावयाची किंवा कसे याबाबत योग्य तो
निर्णय घ्यावा. दुरुस्ती फेरफार घेण्यासाठी
खाली नमूद साईट वापरावी.
https://mahaferfarnas.enlightcloud.com/cdkdcm/
या साठीचे मार्गदर्शिका सोबत जोडली आहे.
- User Manual Link
या सर्व सुविधांचे user manual सोबत
जोडले आहेत .
सदरची मार्गदर्शक सूचना सर्व
तलाठी मंडळ अधिकारी , नायब तहसीलदार ई फेरफार व तहसीलदार यांचे निदर्शनास आणावी.
ही विनंती
आपला स्नेहांकित,
(रामदास जगताप)
राज्य समन्वयक ई-फेरफार
प्रकल्प
जमाबंदी आयुक्त कार्यालय, पुणे
मा.
उप आयुक्त महसूल, विभागीय आयुक्त कार्यालय (सर्व)
यांना माहितीसाठी
Comments