रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

दि.२०.८.२०२० पासून ई फेरफार प्रणालीत दिलेल्या नवीन सुविधा

 

महाराष्ट्र शासन

महसूल व वन विभाग

जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख, महाराष्ट्र राज्य

दूसरा व तिसरा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, विधान भवन समोर, कॅम्प, पुणे -०१

दूरध्वनी क्र. ०२०-२६१३७११०                            Email ID :statecordinatormahaferfar@gmail.com

                                                                       Websitehttps://mahabhumi.gov.in

---------------------------------------------------------------------------------------------------------------

क्र.रा.भू.अ.आ.का.४/रा.स./मा.सु.१७६/२०२०                                              दिनांक : २०.८.२०२०

 

प्रति ,

       मा. उप जिल्हाधिकारी तथा डी.डी.ई.(सर्व)


                                    विषय – दि.२०.८.२०२० पासून दिलेल्या नवीन सुविधा

महोदय,

                  ई फेरफार प्रणाली मध्ये संपूर्ण राज्यात आज दिनांक २०.८.२०२० पासून खालील  नवीन सुविधा तलाठी, मंडळ अधिकारी व तहसीलदार यांना उपलब्ध करून दिल्या आहेत.

१.     आदेश व दस्तऐवज या फेरफार प्रकारामध्ये आदेशाने ७/१२ बंद करणे व आदेशाने स.नं. बदलणे या दोन सुविधा आदेशाची प्रत अपलोड करणे,काम संपल्याची घोषणा व फेरफार तपशिलासह उपलब्ध करून दिल्या आहेत. इतर फेरफार मधून आत्ता या सुविधा वापरता येणार नाहीत. त्याचे user manual चे अवलोकन व्हावे त्या प्रमाण काम करावे.

२.     आदेशाने बंद ७/१२ पुन्हा चालू करणे, अकृषक आदेश आणि आदेशाने भूधारणा बदलणे हे स्वतंत्र फेरफार प्रकार आदेशाची प्रत अपलोड करणे,काम संपल्याची घोषणा व फेरफार तपशिलासह उपलब्ध करून दिले आहेत त्याचे user manual चे अवलोकन व्हावे व त्याप्रमाणे काम करावे.

३.     ई फेरफार प्रणाली मध्ये भोगवटादार वर्ग१, भोगवटादार वर्ग२, सरकार आणि सरकारी पट्टेदार अशा चार योग्य भूधारणा पद्धती / प्रकार आहेत त्याशिवाय अन्य भूधारणा अयोग्य भूधारणा समजल्या जातात. अशा अयोग्य भूधारणा दुरुस्त करण्याची सुविधा फक्त कलम १५५ च्या आदेशाने चुकीची भूधारणा दुरुस्त करणे या पर्यायात उपलब्ध आहे. आता अशी भूधारणा सामान्य फेरफारातून दुरुस्त करता येणार नाहीत.

४.     आदेशाने बंद ७/१२ चालू करणे, आदेशाने स.नं. बदलणे आणि आदेशाने भूधारणा बदलणे हे फेरफार प्रमाणित करण्यापूर्वी तहसीलदार यांनी User creation मधून मान्यता देण्याची सुविधा सर्व तहसीलदार यांना उपलब्ध करून दिली आहे.

५.     चूक दुरुस्ती खाता दुरुस्ती क्रॉस म्युटेशन (CDKDCM) – ही नवीन सुविधा सर्वासाठी उपलब्ध करून दिली त्याची मार्गदर्शक सूचना क्र.१७७ चे अवलोकन व्हावे.

६.     ज्या ७/१२ वर चूक दुरुस्ती खाता दुरुस्ती क्रॉस म्युटेशन झाले आहेत त्या ७/१२ ची दुरुस्ती CDKDCM दुरुस्ती सुविधेतून केल्याशिवाय अशा ७/१२ वर कोणताही नवीन फेरफार घेता येणार नाही अथवा नवीन दस्त नोंदविता येणार नाही व त्याबाबतचा स्पष्ट मेसेज / संदेश असा ७/१२ फेरफार साठी निवडताच दर्शविण्यात येईल.

७.     ई फेरफार प्रणालीत कोणतेही गाव निवडताच जर त्या गावातील काही ७/१२ वर चूक दुरुस्ती खाता दुरुस्ती क्रॉस म्युटेशन  झाले असल्यास तेथे तसा स्पष्ट संदेश / मेसेज देवून चूक दुरुस्ती खाता दुरुस्ती क्रॉस म्युटेशन (CDKDCM) ची दुरुस्ती प्रक्रिया   या लिंकवरून करावी असे दर्शविले जाईल तसेच तेथूनच  या बाबतचे user manual देखील डाऊनलोड करून घेता येईल व असे दुरुस्तीचे काम केल्यानंतरच अशा ७/१२ वर अन्य फेरफार घेता येतील.

८.     मंडळ अधिकारी री एन्ट्री पर्याय वापरल्याने या फेरफार वर भरलेल्या हरकतीचा तपशील नाहीसा होत होता तो आता होणार नाही अशी सुधारणा केली आहे.

९.     वाडी विभाजन केल्या नंतर ज्या स.नं. मध्ये बदल झाला असेल असे स.नं. डेटा साईनिंग साठी उपलब्ध होत नव्हते ते आता डेटा साईनिंग साठी उपलब्ध होतील.

१०.फेरफार मंजुरी नंतर आपोआप होणारे ७/१२ डिजिटल स्वाक्षरीत करण्याचे काम जर असे ७/१२  अहवाल १( खातेदार यांचे क्षेत्राची बेरीज व नमुना ७ चे एकूण क्षेत्र मधील तफावत ) , ३१( मोठ्या/अवास्तव  क्षेत्राचे ७/१२ ) व ३३( फेरफाराने होणारे खाता विभाजन)  मध्ये असतील तर ते होणार नाही व त्याचे कारण दर्शविणारा संदेश / मेसेज तेथे दाखविण्यात आला आहे.  

११.अकृषक ७/१२ वरील हेक्टर क्षेत्राचे आर मध्ये रुपांतर करण्याची सुविधा अनावश्यक असल्याने बंद करणेत आली आहे.


                  या सर्व सुविधांचे user manual सोबत जोडले आहेत .

                  सदरची मार्गदर्शक सूचना सर्व तलाठी मंडळ अधिकारी , नायब तहसीलदार ई फेरफार व तहसीलदार यांचे निदर्शनास आणावी. ही विनंती
 


 

                                                                                                     आपला स्नेहांकित,

 

 

                                                                                                    (रामदास जगताप)

                                                                                           राज्य समन्वयक ई फेरफार प्रकल्प

                                                                                              जमाबंदी आयुक्त कार्यालय, पुणे

 

  मा. उप आयुक्त महसूल, विभागीय आयुक्त कार्यालय (सर्व)

          यांना माहितीसाठी

 

 

Comments

Archive

Contact Form

Send