रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

ई फेरफार प्रणालीतील अपूर्ण काम अचूकरीत्या पूर्ण करून घेणे बाबत- औरंगाबाद विभाग

                           विषय – ई फेरफार प्रणालीतील अपूर्ण काम अचूकरीत्या पूर्ण करून घेणे बाबत

 

 औरंगाबाद विभागातील सर्व उपजिल्हाधिकारी तथा डी.डी.ई. यांना सस्नेह विनंती 

           

 

                         अधिकार अभिलेखांचे संगणकीकरण करण्याच्या ई फेरफार प्रकल्पाचे कामकाज आत्ता अंतिम टप्प्यात आले असून या अत्यंत किचकट व कठीण कामासाठी आपणासह जिल्ह्यातील सर्व महसूल अधिकारी, कर्मचारी, तलाठी व मंडळ अधिकारी यांनी खूप कष्ट घेवून अनेक अडचणीवर मात करून हे काम पूर्णत्वाकडे आणलेआहे त्यासाठी मी आपणासह सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन करतो.

 

                          फेरफार प्रणाली मधील संगणकीकृत ७/१२ ची अचूकता निश्चित करण्यासाठी राज्यभरात महसूल विभागाच्या वतीने चावडी वाचनासह एडीट मोडुल, री-एडीट मोडुलद्वारे ७/१२ मधील दुरुस्तीची कार्यवाही केलेली आहे. असे असूनही अजून देखील संगणकीकृत ७/१२ मध्ये अनेक चुका / त्रुटी असल्याबाबत तक्रारी नागरिक करत असल्याचे दिसून येतात. नागरिकांनी हस्तलिखित अधिकारअभिलेख व संगणकीकृत अधिकार अभीलेखामध्ये काही तफावती असल्यास त्या दूर करण्यासाठी ई हक्क प्रणालीतून ऑनलाईन अर्ज तलाठ्याकडे करण्याची सुविधा दिली आहे परंतु अशा ऑनलाईन  प्राप्त अर्जांची निर्गती गुणवत्तापूर्वक केली जात नाही अशा देखील तक्रारी येत आहेत. सातबारा संगणकीकरणाचे हे काम अचूकरित्या व गुणवत्तापूर्वक पूर्ण केल्यास भविष्यातील असंख्य तक्रारी, महसुली, दिवाणी व फौजदारी स्वरूपाचे दावे कमी होण्यास मदत होईल ह्यात शंका नाही.

 

                         सध्या कोणत्याही अधिकार अभिलेखामध्ये काहीही दुरुस्ती करावयाची असल्यास ती फक्त  महारष्ट्र जमीन महसूल अधिनियामांतर्गत कलम १५५ अन्वये च्या तहसीलदार यांचे आदेशाने करता येते. संगणकीकृत ७/१२ च्या डेटाबेस मधील गाव नमुना नं.१ (आकारबंद), गाव नमुना नं.७/१२, गाव नमुना नं.८अ मधील विसंगती निश्चित करण्यासाठी ODC मोडुल मध्ये १ ते ४३ अहवाल देवून त्यात महत्वाच्या अहवालातील विसंगत ७/१२ ची संख्या MIS स्वरूपात सर्व वापरकर्ते यांना उपलब्ध करून दिली आहे. अशा १ ते ४३ अहवालामध्ये काय त्रुटी किंवा विसंगती आहे ? तसेच त्यासाठी  दुरुस्तीच्या सुविधा या बाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना  दिनांक १२.१२.२०१९ रोजी निर्गमित केल्या आहेत. त्यांचे अवलोकन होऊन त्याप्रमाणे दुरुस्त्यांचा कालबद्ध कार्यक्रम राबविण्यात यावा.

 

                          दि..४.७.२०१९ च्या शासन परिपत्रकान्वये सर्व वापरकर्ते यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करून दिल्या आहेत. त्या प्रमाणे सर्व विसंगती दूर करून घोषणापत्र ४ करण्याची जबाबदारी उप विभागीय अधिकारी यांना दिली आहे त्या बाबत सर्व संबंधित वापरकर्ते यांचे अचूक ७/१२ साठी आपल्या विभागात गुणवत्तापुर्वक कडून काम करून घेण्यासाठी समन्वयकाची जबाबदारी  उप विभागीय अधिकारी यांनी पार पाडणे अपेक्षित आहे. सद्या कोणतीही दुरुस्ती करावयाची झाल्यास ती फक्त आदेशानेच करता येते त्यामुळे या सर्व कामाची अचूकता व प्रगती सध्या करण्यासाठी तहसीलदार व उप विभागीय अधिकारी यांचे मार्गदर्शन व स्पष्ट आदेश अत्यंत आवश्यक आहेत त्यामुळे अधिकारी स्थरावरील प्रलंबित कामाचा आढावा घेणे अत्यंत आवश्यक आहे.

 

              जिल्ह्यातील अचूक संगणकीकृत अधिकार अभिलेख जनतेला ऑनलाईन उपलब्ध होण्यासाठी खालील बाबींवर लक्ष केंद्रित करावे.

१.     ODC अहवालातील विसंगत ७/१२ ची दुरुस्ती प्राधान्याने करणे.

२.     फेरफार पश्च्यात व पीक पाहणी पश्च्यात तसेच एकदाही डिजिटल स्वाक्षरीत न झालेले ७/१२ डिजिटल स्वाक्षरीत करणे.

३.     ई हक्क प्रणालीतून प्राप्त ऑनलाईन अर्ज तलाठी मंडळ अधिकारी यांनी वेळेत व योग्यरीत्या निर्गत करणे.

४.     ई फेरफार मधील प्रलंबित फेरफारांचा नियमित आढावा घेवून दि.४.७.२०१९ च्या परिपत्रकान्वये कार्यवाही करणे.

५.     DDM प्रणालीतील अहवाला प्रमाणे नक्कल फी मधील जमाबंदी आयुक्त कार्यालयाचा हिस्सा फेब्रुवारी २०२० अखेरची रक्कम स्टेत बँक ऑफ इंडिया व मार्च २०२० पासून पुढील रक्कम बँक ऑफ बडोदा मधील VAN खात्यावर जमा केल्याची खात्री करावी.

६.     सोबतच्या तक्त्यातील आपल्या जिल्ह्याचे प्रलंबित कामकाज गुणवत्तापूर्वक पूर्ण करणे.

            

                        

                       सदरचे कामकाज वेळेत व गुणवत्तापूर्वक पूर्ण केल्यास अचूक संगणकीकृत अधिकारअभिलेख जनतेसह सर्व शासकीय विभागांना उपलब्ध करून देण्याचे शासनाचे उद्दिष्ट  निश्चित पूर्ण होईल ह्याची मला खात्री वाटते.  महाराजस्व अभिअयन २०२० मध्ये हे कामकाज पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो .

 

  आपला स्नेहांकित 


रामदास जगताप 

राज्य समन्वयक , ई फेरफार प्रकल्प 

दिनांक - ८.८.२०२० 

 


औरंगाबाद विभाग

अचूक संगणकीकृत अभिलेख जनतेला ऑनलाईन उपलब्ध करून देण्यासाठी अजून­­­­

आपल्या विभागातील ई-फेरफार प्रणालीतील शिल्लक कामकाज.

अ.क्र. 

अहवाल / जिल्हा

औरंगाबाद

 नांदेड

 हिंगोली

 परभणी

 जालना

 बीड

 लातूर

 उस्मानाबाद

 औरंगाबाद विभाग

1

एकूण सर्व्हे क्रमांक

294214

458834

180869

222234

243824

455190

281490

292123

2428778

2

एकूण विसंगती  सर्व्हे  क्रमांक

13613

11468

5376

2083

11277

27917

3557

11270

86561

3

एकूण विसंगती  सर्व्हे  क्रमांक %

4.63

2.50

2.97

0.94

4.63

6.13

1.26

3.86

3.56

4

अहवाल १- गाव नमुना ७ वरील एकुण क्षेत्र व ७/१२ वरील खात्यांच्या एकुण क्षेत्र यांचा मेळ बसत नसलेल्या ७/१२ ची संख्या 

5310

2536

2469

647

3751

11372

1883

2680

30648

5

अहवाल ३ - गाव नमुना नं. १ (आकारबंद) व गा.न.नं. ७ मधील क्षेत्र जुळत नसलेल्या ७/१२ ची संख्या

20029

27523

3620

19477

10381

38642

24620

3373

147665

6

अहवाल क्र. ४- गाव नमुना ७ वरील एकुण क्षेत्र व जिरायत, बागायत,इत्यादी क्षेत्र यांचा मेळ न बसलेले सर्व्हे क्र

760

815

227

209

256

1756

1121

254

5398

7

अहवाल ६- चुकीच्या पद्धतीने भरलेली खातेदारांची नावे असलेल्या ७/१२ ची संख्या

6933

2971

1537

1329

2738

2929

562

5981

24980

8

अहवाल ७- खाता रजिस्टर मध्ये चुकीचे निवडलेले खाता प्रकार असलेल्या ७/१२ ची संख्या

786

1427

304

320

537

2115

60

907

6456

9

अहवाल ८- फेरफार क्र. नसलेल्या कब्जेदारांची नावे असलेल्या ७/१२ ची संख्या

811

503

134

52

589

1725

49

550

4413

10

अहवाल ९- चुकीच्या पद्धतीने भरलेले सर्व्हे क्रमांक

4

3

0

8

1

9

2

0

27

11

अहवाल १३ - भुधारणा पद्धतीसाठी प्रकार निवडलेला नाही अशा ७/१२ ची संख्या

0

1

2

1

1

6

4

5

20

अ.क्र. 

अहवाल / जिल्हा

औरंगाबाद

 नांदेड

 हिंगोली

 परभणी

 जालना

 बीड

 लातूर

 उस्मानाबाद

 औरंगाबाद विभाग

12

अहवाल २१ - ७/१२ वरील एकूण क्षेत्र व क्षेत्राचे एकक या मध्ये तफावत असलेल्या ७/१२ ची संख्या

2

0

2

0

0

0

0

3

7

13

अहवाल २२ - शून्य क्षेत्र असलेले ७/१२ वरील चालू खाता क्रमांक असलेल्या ७/१२ ची संख्या

1836

2597

939

303

3228

2245

867

2168

14183

14

अहवाल २६ - भोगवटदार-२ असलेले परंतु  गा.न.नं. १(क) मध्ये नसलेल्या ७/१२ ची संख्या

321

55

21

46

36

68

22

95

664

15

अहवाल २८ - समान नावांची एका पेक्षा जास्त खाती असलेल्या ७/१२ ची संख्या

654

1061

162

160

606

1159

156

325

4283

16

अहवाल ३१- शेती ७/१२ वरील क्षेत्र २० हे.आर.पेक्षा जास्त किंवा बिनशेती ७/१२ वरील क्षेत्र 99 आर.चौ.मी. पेक्षा जास्त असलेले ७/१२ ची संख्या

1524

1068

568

377

570

1203

242

786

6338

17

अहवाल ३३ - फेरफाराने खाता विभागणीसाठी पात्र असलेले खाता क्रमांक दर्शविणाऱ्या ७/१२ ची संख्या

2066

1398

705

249

1209

3582

245

2370

11824

18

अहवाल ४० - खाता मास्टर मध्ये अतिरिक्त नावे असलेल्या खात्यांच्या ७/१२ ची संख्या

328

339

149

68

210

428

66

220

1808

19

अहवाल ४१ - अहवाल ५- अतिरिक्त मध्ये असलेल्या ७/१२ ची संख्या

1150

1321

368

153

741

4235

149

1175

9292

20

फेरफार पश्चात डिजिटल स्वाक्षरीत न केलेल्या ७/१२ ची संख्या

25555

21273

4778

23974

14886

37814

23042

18748

170070

21

एकदाही डिजिटल स्वाक्षरीत न केलेल्या ७/१२ ची संख्या

6235

5249

3034

1014

3449

14447

2757

1904

38089

22

ई-हक्क प्रणाली मधील प्रलंबित अर्जाची संख्या

738

250

260

204

39

73

191

310

2065

 


Comments

Archive

Contact Form

Send