माहे मार्च, एप्रिल व मे २०२० चे चलन तयार करून VAN द्वारे नक्कल फी जमा करणे बाबत.
महाराष्ट्र शासन
महसूल व वन विभाग
जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख, महाराष्ट्र राज्य,
दूसरा व तिसरा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, विधान भवन समोर, कॅम्प, पुणे -०१
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
क्र.रा.भू.अ.आ.का.४/रा.स./ VAN चलन /२०२० दिनांक : २३.०७.२०२०
प्रति ,
उप जिल्हाधिकारी तथा डी.डी.ई.
जिल्हाधिकारी कार्यालय (सर्व)
विषय- माहे मार्च, एप्रिल व मे २०२० चे चलन तयार करून VAN द्वारे
नक्कल फी जमा करणे बाबत.
महोदय ,
माहे मार्च २०२०
मध्ये अभिलेख वितरण प्रणालीतून (DDM) वितरीत केलेल्या नकलांची माहे एप्रिल मध्ये शासन
जमा करावयाची नक्कल फी VAN द्वारे (बँक ऑफ बडोदा) जमा करणे बाबत दि.
२७/५/२०२० रोजी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनेचे अवलोकन होण्यास विनंती आहे.
१. ज्या तलाठी साजाची माहे
मार्च, एप्रिल व मे २०२० चे चलन तयार करून नक्कल फी बँक ऑफ बडोदा मध्ये जमा केली आहे ते साजे वगळून अन्य तलाठी
साजे चे मागील महिन्याचे चलन तयार करण्याची सुविधा अभिलेख वितरण प्रणालीत (DDM)
उपलब्ध करून दिली आहे .
२.
माहे मार्च , एप्रिल व मे २०२० या तीन महिन्यापैकी ज्या महिन्याचे चलन
तयार करून यापूर्वी जमा केलेले नाही त्या महिन्यांचे सजा निहाय चलन एकत्र तयार
होईल व सदरची सर्व रक्कम एकत्रच भरणे आवश्यक आहे.
३.
माहे मे - जून २०२० मध्ये संपूर्ण राज्यात तलाठी साजा व महसूल मंडळ
पुनर्रचनेप्रमाणे तलाठी साजे नायब तहसीलदार (ई फेरफार) यांनी तयार करून तसे
प्रमाणपत्र दिले आहे . त्याप्रमाणेच हे चलन तयार होणार आहे परंतु कदाचित या नवीन
साजा चा पदभार मार्च व एप्रिल मध्ये अन्य तलाठी यांचेकडे असेल व आत्ता चलन सध्याचा
पदभार असलेल्या तलाठी यांचे नावे तयार होईल तरी या बाबत स्पष्ट करण्यात येते कि
ज्या ज्या महिन्यात ज्या ज्या तलाठी यांचे कडे ज्या ज्या गावच पदभार होता त
ज्यांनी प्रत्यक्ष DDM मधून नकलांचे वितरण केलेलं आहे त्यांनी गाव निहाय बिलिंग
अहवाल पाहून ती ती नक्कल फी सध्याच्या तलाठी यांचे कडे जमा करावी व चालू चलनाप्रमाणे
ही नक्कल फी सध्याच्या तलाठी यांनी VAN
द्वारे जमा करावी.
४. बँक ऑफ बडोदा मध्ये VAN क्रमांक व IFSC कोड वापरून पैसे जमा
करण्याचे दोन पर्याय आहेत एक म्हणजे बँक ऑफ बडोदा, देना बँक व विजया
बँकेच्या कोणत्याही शाखेत जावून रोख रक्कम काऊटर वर जावून जमा करणे व दुसरा पर्याय
म्हणजे ऑनलाईन पेमेंट करणे.
१अ) बँक काउंटर वरुन भरणा- बँक ऑफ बडोदा या बँकेच्या
कोणत्याही शाखेच्या काउंटरवरुन थेट रोख रक्कम या
खात्यावर जमा करता येईल. त्याच बरोबरच देना बँक व विजया बँकेत देखील रोख रक्कम जमा
करता येईल. तथापी देना बँक व विजया बँक या शाखामधून ही रोख रक्कम NEFT द्वारे बँक कर्मचारी यांचे
कडून व्हर्चुअल अकौंट नंबर (VAN) जमा करणेत येईल. त्यासाठी आपले चलन
दाखवूनच भरणा करावा. सदरची रक्कम जमा करण्यासाठी तलाठी यांचे कडून बँक कोणेही अधिकचे शुल्क
आकारले जाणार नाही
१ब) बँक ऑफ बडोदा खात्यातून
ऑनलाईन भरणा - कोणत्याही तलाठी यांना कोणत्याही बँक खात्यावरून इंटरनेट बँकिंग
सुविधा वापरुन ऑनलाईन भरणा करता येईल. त्यासाठी देखील कोणतेही
अधिकचे शुल्क आकारले जाणार नाही. इंटरनेट बँकिंग सुविधा वापरुन ऑनलाईन भरणा करताना बँक ऑफ बडोदा मधील खात्यातून
पेमेंट करताना payment / transfer पर्यायातून payment using VAN हा पर्याय वापरावा व
त्यासाठी आपल्या चलनावर प्रिंट झालेला त्या साजाचा VAN व IFSC CODE - BARB0STAPOO (IFSC CODE मधील पाचवे अक्षर शून्य आहे) हा वापरावा. अशा पेमेंट ची स्लीप
तलाठी यांनी जपून ठेवावी.
१क) SBI या बँकेतील खात्यातून ऑनलाईन भरणा – स्टेट बँक ऑफ इंडिया च्या खात्यातून पेमेंट करण्यासाठी payment using VAN हा पर्याय वापरू नये त्याऐवजी अन्य बँकाचे खाते नं. (Other bank beneficiary) हा पर्याय वापरून त्यात VAN नं. Beneficiary मध्ये समाविष्ट करावे त्यानंतर दुसऱ्या दिवशी ऑनलाईन पेमेंट करता येईल.
१क) SBI या बँकेतील खात्यातून ऑनलाईन भरणा – स्टेट बँक ऑफ इंडिया च्या खात्यातून पेमेंट करण्यासाठी payment using VAN हा पर्याय वापरू नये त्याऐवजी अन्य बँकाचे खाते नं. (Other bank beneficiary) हा पर्याय वापरून त्यात VAN नं. Beneficiary मध्ये समाविष्ट करावे त्यानंतर दुसऱ्या दिवशी ऑनलाईन पेमेंट करता येईल.
DDM चलनाप्रमाणे नक्कल फी जमा करताना कोणीही आपल्या साजा चा अचूक VAN क्रमांक वापरल्याशिवाय नक्कल फी जमा करू नये तसेच
चलनात नमूद केली असेल ती संपूर्ण रक्कम एकदाच जमा करावी नक्कल फी अंशाता /अपूर्ण
किंवा चुकीची जमा करू नये तसेच एका तलाठी याचेकडे अन्य साजा चा अतिरिक्त कार्यभार
असलातरी एकाच VAN क्रमांकावर रक्कम जमा करू नये.
तसेच ऑनलाईन पेमेंट भरताना देखील चलनावर छापलेला VAN क्रमांक व IFSC कोड
अचूक नमूद केला आहे ह्याची खात्री करावी. चुकीचा VAN क्रमांक भरून केलेले पेमेंट विचारात घेतले जाणार
नाही. ही रक्कम तलाठी यांना पुन्हा भरावी लागेल ह्याची नोंद घ्यावी.
DDM अहवाल प्रमाणे सन २०१९-२० च्या जमा नक्कल
फी चे लेखापरीक्षण करणे -
माहे फेब्रुवारी २०२०
अखेरची सन २०१९-२० या वित्तीय वर्षात तलाठी यांनी जमा करावयाची नक्कल फी व
स्टेट बँकेत जमा केलेली नक्कल फी चा ताळमेळ घेवून सर्व डी.डी.ई. यांनी आपल्या
जिल्ह्याचा अहवाल तातडीने जिल्ह्याधिकारी यांचे मान्यतेने इकडे सदर करावा. MIS अहवाला प्रमाणे तालुका
निहाय सदरची संपूर्ण रक्कम खात्यावर जमा झाल्याचे प्रमाणपत्र तहसीलदार यांनी
जिल्हाधिकारी यांना सादर करणे आवश्यक आहे.
कोणत्याही
तालुक्यात कोणत्याही तलाठी साजा किंवा महसूल गावची नक्कलफी जमा केली नसल्यास सदरची
सर्व नक्कल फी तात्काळ जमा करून माहे फेब्रुवारी २०१९ ते फेब्रुवारी २०२० या १३
महिन्याची संपूर्ण नक्कल फी स्टेट बँक ऑफ इंडिया, ट्रेजरी
शाखा, पुणे येतील खालील खात्यावर जमा झाली असल्याचे
लेखा परीक्षण पूर्ण करून त्याचा अहवाल जमाबंदी आयुक्त कार्यालयाला सादर करावा.
Bank
Details -
Current
Account No. 38306827364
IFSC.Code.
No- SBIN0001904
Name -
Settlement Commissioner and Director of Land Record
(Maharashtra
State) Pune
Bank –
State Bank of India, Treasury Branch, Pune-1.
महत्वाची सूचना – माहे जून
महिन्याचे चलन स्वतंत्र तयार होणार असून माहे जुलै चे चलन पेमेंट गेटवे च्या
सुविधेद्वारे जमा करता येईल असा प्रयत्न राहील .
सदरच्या सर्व सूचना सर्व
तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार व तहसीलदार
यांचे निदर्शनास आणून द्याव्यात ही विनंती.
आपला
स्नेहांकित,
(रामदास जगताप)
राज्य समन्वयक , ई फेरफार प्रकल्प
जमाबंदी आयुक्त कार्यालय , पुणे
प्रत ,
मा. उप आयुक्त महसूल , विभागीय आयुक्त
कार्यालय (सर्व)
उप विभागीय अधिकारी(सर्व)
तहसीलदार (सर्व ) यांना माहितीसाठी व योग्य
त्या कार्यवाहीसाठी.
अभिलेख वितरण प्रणालीतून (DDM) मधून नकला वितरीत करताना ह्या नकला विना फी च्या सुद्धा काढता येतात. त्यामुळे अभिलेख वितरण प्रणालीत त्याची फी तयार होत नाही.
ReplyDeleteहे कसे करायचे
ReplyDeletesir , माहे मार्च , एप्रिल , मे चा भरणा करून हि ताळेबंद मध्ये एप्रिल मे ची रक्कम फरकात दाखवत आहे . तसेच माहे जून ची रक्कम पण फरकात दाखवत आहे .
ReplyDelete7/12 वितरण प्रणालीतून (ddm) मधून फ्री मध्ये सुद्धा उतारे काढता येतात.5 प्रमाणे फी तयार होत नाही.
ReplyDeleteमार्च २०२० ते जून २०२० महिन्या पर्यंतच्या ७/१२ फी ची रक्कम बँक मध्ये जमा करून हि शिल्लक दाखवत आहे . अस का ?
ReplyDelete