तहसिल कार्यालयासाठी दिलेल्या MPLS जोडण्याचा वापर सुरु ई फेरफार प्रकल्पाचे कामासाठी होत असल्याबाबत ची खात्री करणे बाबत
महाराष्ट्र शासन
महसूल व वन विभाग
जमाबंदी आयुक्त आणि
संचालक भूमी अभिलेख (म.राज्य ) , पुणे
दूसरा व तिसरा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, विधान भवन समोर, कॅम्प, पुणे- १.
--------------------------------------------------------------------------------------------------------
क्रमांक : क्र.रा.भू.अ.का./रा.स./मा.सू./१६३/२०२० दिनांक: २५.६.२०२०
प्रति,
उप जिल्हाधिकारी तथा डी.डी.ई.(सर्व).
विषय :- तहसिल कार्यालयासाठी दिलेल्या MPLS जोडण्याचा वापर
सुरु ई-फेरफार प्रकल्पाचे कामासाठी होत असल्याबाबत
संदर्भ – १. या कार्यालयाचे पत्र क्रमांक –कक्ष ४ /MPLS/२०१९ दिनांक १०.५.२०१९
२. या
कार्यालयाची मार्गदर्शक सूचना क्र.१११ दिनांक- ११.९.२०१९
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने या कार्यालयाचे
संदर्भीय दोन्ही पत्रांचे अवलोकन होण्यास विनंती आहे. ई फेरफार प्रकल्पाचे ऑनलाईन
कामकाज करण्यासाठी सध्या तलाठी व मंडळ अधिकारी यांना पुरविण्यात आलेल्या डेटाकार्ड
च्या मदतीने गाव व मंडळ स्थरावरून केले जाते. तथापि तालुका स्थरावर या कामासाठी कायम स्वरूपी स्वतंत्र व्यवस्था उपलब्ध असण्याची गरज
लक्षात घेवून राज्यातील सर्व तहसील कार्यालये MPLS जोडणी द्वारे जोण्याचा निर्णय
घेण्यात आला होता त्याप्रमाणे या कामकाजासाठी भारत संचार निगम (BSNL) च्या वतीने
DetaBit या कंपनीला काम देण्यात आले होते. या MPLS जोडणीमुळे तहसील स्थरावरून ई
फेरफार प्रणालीचे कामकाज करताना अन्य कोणतेही
FORTICLIENT VPN अथवा WEB VPN वापरण्याची गरज राहणार नाही.
DetaBit या कंपनीचे सर्विस
इन्जेनिअर्स यांनी आपल्या तहसील कार्यालयातील MPLS जोडणी पूर्ण करून त्याचा अहवाल
तेथील तहसीलदार किंवा नायब तहसीलदार यांचे स्वाक्षरीने इकडे सदर केला असून त्याची Installation Date सोबतच्या तक्त्यात ज्या त्या तहसील
कार्यालयासमोर नमूद केली आहे. तहसील कार्यालयाला हि जोडणी दुय्यम निबंधक कार्यालयातून उपलब्ध करून दिली जात
आहे. तहसील कार्यालयाचे अंतर दुय्यम निबंधक कार्यालयापासून किती आहे? त्यानुसार
LAN किंवा P2P कनेक्शन दिले जाणार होते. ज्याठिकाणी तहसील कार्यालय व दुय्यम निबंधक कार्यालय एकाच आवारात आणि १०० मीटर
पेक्षा कमी अंतरावर असेल त्याठिकाणी LAN कनेक्शन आणि ज्याठिकाणी तहसील कार्यालय
दुय्यम निबंधक कार्यालयापासून जास्त अंतरावर असेल त्याठिकाणी P2P म्हणजेच
telephone exchange मधून थेट जोडणी देण्याचे निश्चित केले होते
त्याप्रमाणे आपल्या जिल्ह्यातील कोणते तहसील कार्यालय कोणत्या यादीत आहे ते तपासून
अशी जोडणी झाली आहे का ? ह्याची खात्री तहसीलदार यांनी करावी.
आज अखेर ३५८ तहसील
कार्यालयापैकी P2P जोडणी द्वारे ११२ आणि LAN जोडणीद्वारे १७५ अशी २८७ तहसील
कार्यालयांची जोडणी पूर्ण झाली आल्याचे अहवाल इकडे प्राप्त झाले आहेत. त्याचे
टेस्टिंग करून दाखवल्यानंतरच installation report तहसीलदार यांनी स्वाक्षरीत करून
देणे अपेक्षित होते. या दोन्ही जोडणी मध्ये तहसील कार्यालयातील पूर्वीच्या फेरफार
कक्षाच्या ठिकाणी तहसीलदार यांनी स्वतंत्र पाच संगणक संचाची व्यवस्ता करून ठेवणे
अपेक्षित होते. प्रत्येक तालुक्यात DetaBit या कंपनीचे सर्विस इन्जेनिअर्स यांनी
LAN चे वायरिंग करून प्रत्येकी पाच कनेक्शन काढून ठेवले असतील त्याठिकाणी उपलब्ध
करून दिलेल्या संगणक संचाची जोडणी ई फेरफार प्रणाली शी होण्यासाठी त्यासंगणकावर
काही IP सेटिंग्ज करणे आवश्यक होते त्याची ip range व त्या बाबतचे user manual या
पूर्वीचा आपणास पाठविले आहे तथापि या प्रमाणे कार्यवाही अनेक ठिकाणी झालेली नाही व
या MPLS जोडणीचा वापर सुरु झाला नसल्याचे दिसून आल्याने पुन्हा या मार्गदर्शक
सूचना निर्गमित करणेत येत आहेत.
या
मार्गदर्शक सूचना सोबत जोडलेल्या P2P आणि LAN extension च्या यादीत excel sheet मध्ये खालील प्रमाणे माहिती नमूद
केलेली आहे. त्यातील IP कश्या पद्धतीने
वापरून सेटिंग करायचे आहे त्याचे user manual देखील सोबत जोडले आहे.
Sr. no
|
District
|
Type of Office
|
Name of
Office
|
Installation Date
|
Gateway
|
IP For Pc From
|
To
|
Subnet MasK IP
|
DNS Server
|
या प्रमाणे settings करून देखील आपल्या जिल्ह्याची ई फेरफार लिंक
open होण्यास काही अडचण असल्यास आपले विभागीय समन्वयक/ हेल्प डेस्क तसेच DetaBit
या कंपनीचे समन्वयक श्रीमती सोनम आल्हाट (Mob. No. 8600003596/8600003597) यांचेशी संपर्क करावा. सर्व नायब तहसीलदार ई-फेरफार यांना विनंती करणेत येते
कि आपल्या तालुक्यातील MPLS जोडणीचा वापर सुरु करून त्याचा लेखी अहवाल आपले
जिल्ह्याचे डी.डी.ई.व विभागीय समन्वयक यांना आठ दिवसात ई मेल द्वारे पाठवावा.
या MPLS जोडणीद्वारे फक्त ई- फेरफार
प्रणालीचे कामकाज करता येईल. या वरून अन्य कोणत्याही साईट उपलब्ध होणार नाहीत
ह्याची नोंद घ्यावी. सदरची सुविधा सुरु झाल्याबाबत तसे सर्व तलाठी व मंडळ अधिकारी
यांचे निदर्शनास आणावे ही विनंती.
सोबत – IP configuration कार्यपद्धतीचे user manual असे.
MPLS CONNECTIVITY Tahsil_IP यादी जोडली असे.
आपला विश्वासू,
(रामदास जगताप)
राज्य समन्वयक, ई फेरफार प्रकल्प
जमाबंदी आयुक्त कार्यालय, पुणे.
प्रत, उप
विभागीय अधिकारी (सर्व)
प्रत,
तहसिलदार (सर्व) यांना महितीसाठी
======================================================================
MPLS जोडणी व वापर सुरु
अहवाल
मी
श्री. / श्रीमती.--------------------------------------- नायब तहसीलदार ई-
फेरफार तहसील कार्यालय --------- जिल्हा ------------- प्रमाणित करतो कि, BSNL
च्या सेवा पुरवठादार यांनी या तहसील कार्यालयात ------------ (P2P / LAN) CONNECTIVITY
चे काम पूर्ण केले असून त्यासाठी संगणकावर आवश्यक ते IP CONFIGURATION करून जोडणी
यशस्वीरीत्या पूर्ण झाली असून त्याचा नियमित वापर सुरु केला आहे.
स्थळ –
दिनांक - (श्री. /
श्रीमती.--------------------------------------)
नायब
तहसीलदार, ई-फेरफार तहसील कार्यालय ---------
=======================================================================
Comments