रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

तलाठी साजा पुनर्रचने नुसार तयार होणारे नविन महसुली गाव निर्मिती साठी वाडिविभाजनाचा फेरफार घेतांना घ्यावयाची दक्षता.


महाराष्ट्र शासन
महसूल व वन विभाग
जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख (.राज्य ) , पुणे
दूसरा व तिसरा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, विधान भवन समोर, कॅम्प, पुणे- १.
दूरध्वनी क्र. ०२०-२६१३७११०                  Email ID : statecordinatormahaferfar@gmail.com         
                                                                                     Web site:  https://mahabhumi.gov.in            
------------------------------------------------------------------------------------------------------------------
क्रमांक : क्र.रा.भू.अ.का./रा.स./मा.सू./१६२/२०२०                                              दिनांक:   ६.६.२०२०  


  प्रति,
           उप  जिल्हाधिकारी तथा डी.डी.ई.(सर्व).

                विषय :- तलाठी साजा पुनर्रचने नुसार तयार होणारे नविन महसुली गाव
                       निर्मिती साठी वाडिविभाजनाचा  फेरफार घेतांना घ्यावयाची दक्षता.


                           संदर्भ महसूल व वन विभागाचे पत्र क्रमांक. संकीर्ण २०१८/ प्र.क्र.५७ /म-१०
                        दिनांक- २६.०४.२०१८

                        उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने साजा पुनर्रचना करणेबाबत शासनाचे नवनिर्मित महसुली गाव निर्मितीची अधिसूचना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अंतिम झाली असल्यास नवीन साजा निर्मितीसाठी गाव विभाजन करणे आवश्यक असल्यास त्याची कार्यपद्धती काय असावी या बाबत खालील प्रमाणे कार्यवाही जिल्हा व तालुका स्थरावर होणे आवश्यक वाटते.
                               
1)      ई फेरफार प्रणाली मध्ये कोणतेही नवीन महसूल गाव निर्माण करण्यासाठी फक्त जमाबंदी आयुक्त कार्यालयाने पुरविलेला सेन्सस कोड वापरावा. त्यापूर्वी महारष्ट्र जमीन महसूल अधिनियमा अंतर्गत नवीन महसूल गाव निर्मितीची अधिसूचना जिल्हाधिकारी / अप्पर जिल्हाधिकारी यांनी काढली असल्याची खात्री करावी.
2)      नवीन महसूल गाव निर्मितीच्या अधिसूचने प्रमाणे तालुक्याच्या उप अधीक्षक भूमी अभिलेख यांनी नवीन व जुन्या गावचे नवीन गाव नमुना न.(आकारबंद) तयार तयार करून कार्यवाहीसाठी तहसीलदार यांना सादर केले असल्याची खात्री करावी.
3)      नवीन महसूल गाव निर्मिती बाबत जनगणना संचालनालयाचे काही निर्बंध नाहीत ना ? ह्याची खात्री आपण आपलेस्थरावर करावी.
4)       नायब तहसीलदार – ई फेरफार (DBA ) ल़ॉगिन ने User creation मधुन गाव साजा मंडळ गटवारी नोंदणी ही सुविधा निवडुन नविन गाव तयार करा हा पर्याय निवडुन नविन गाव तयार करुन घ्यावे.
5)      नविन गाव तयार करतांना सेन्सस कोड, गावाचे नाव , फेरफार नंबर, एकत्रीकरण योजना लागु झाली आहे का ? जि.. दर, ग्रा.पं. दर ही माहीती भरुन घेउन साठवा करावी.
6)      सेन्सस कोड हा मा. जमाबंदी आयुक्त कार्यालयामार्फत देण्यात आलेला सेन्सस कोड येथे वापरावा. व जुन्या गावातील चालु शेवटचा फेरफार क्र येथे वापरावा. चुकुनही फेरफार क्रमांक १ टाकू नये. एका गावातून नवीन दोन गावे तयार होत असतील तरीही दोन्ही नवीन महसुली गावांना तोच क्रमांक नमूद करावा.
7)      वाडिविभाजन फेरफार घेणेकामी आपल्या जिल्ह्याची नेहमीच्या कामकाजाची साईट वापरावी व त्यातील वाडीविभाज हा स्वतंत्र पर्याय वापरावा.
8)      वाडी विभाजनाचा फेरफार घेण्यापूर्वी त्या गावातील सर्व फेरफार निर्गत झालेले असावेत. तसेच गरज वाटल्यास काही दिवस दुय्यम निबंधक कार्यालयातील ऑनलाईन दस्त नोंदणी स्किप करून करणे बाबत व त्या सर्व नोंदणीकृत दस्तांच्या सूची ची प्रत  SRO यांनी तहसीलदार कार्यालयाला द्यावी असे लेखी आदेश तहसीलदार दुय्यम निबंधक यांना देवू शकतील.कारण वाडी विभाजना फेरफार घेण्यास सुरुवात केल्या नंतर तो मंजूर होई पर्यंत त्या गावात कोणताही अन्य फेरफार घेता येत नाही अथवा निर्गत करता येत नाही.
9)      वाडिविभाजन फेरफार घेणेपुर्वी पुढिल प्रमाणे तयार होणारे अहवालांचे काळजीपुर्वक अवलोकन करावे.
अ)    जुन्या गावातील बदललेल्या सर्व्हे क्र ची यादी
आ)  नवीन गावातील बदललेल्या सर्व्हे क्र ची यादी
इ)      जुन्या गावातील न बदललेल्या सर्व्हे क्र ची यादी
ई)      नविन गावातील न बदललेल्या सर्व्हे क्र ची यादी
उ)     जुन्या गावात शिल्लक राहिलेल्या सर्व्हे क्र ची यादी  या अह्वाची प्रिंट काढून त्यातील प्रत्येक स.नं. तपासून योग्य असल्याची खात्री करावी. कोणत्याही गट नं. चे काही पोट हिस्से एका गावात व काही पोट हिस्से दुसरऱ्या गावात जात नाहीत ना ? ह्याची खात्री तलाठी व मंडळ अधिकारी यांनी करावी. हे सर्व अहवाल तलाठी व मंडळ अधिकारी यांनी योग्य असल्याची खात्री केल्या नंतरच फेरफार मंजूर करावा. एकदा वाडी विभाजनाचा फेरफार मंजूर केल्या नंतर त्यात कोणताही बदल करता येणार नाही ह्याची नोंद घ्या.
10)  नविन गावात जाणा-या सर्व्हे क्र वर काही फेरफार प्रलंबीत असतील तर वाडिविभाजनाचा फेरफार घेणेपुर्वी सदर फेरफार मंजुर करुन घ्यावीत. अन्यथा सदर फेरफार नंतर मंजुर होणार नाहीत ह्याची नोंद ह्यावी.
11)   सोबत वाडिविभाजन फेरफार घेण्याचे User Manual जोडले आहे, त्याप्रमाणे कार्यवाही करावी.
12)   वाडी विभाजनाचा फेरफार आदेशाचा फेरफार असल्याने तो तात्काळ मंजूर करता येईल.
13)   वाडीविभाजनाचा फेरफार मंजूर झाल्यानंतर मूळ महसुली गावाचे नाव दुरुस्त करावयाचे असल्यास नायब तहसीलदार (ई फेरफार) यांनी UC मधून गावाचे नाव दुरुस्त करावे. जसे देवळाली  चे देवळाली-1 करावे.
14)   अशा पद्धतीने निर्माण झालेल्या नवीन महसुली गावांना जिल्हा व तालुकास्थरावरून सामान्य जनतेच्या माहितीसाठी व्यापक प्रसिद्धी द्यावी. तसेच नाव निर्मित गावाची साजा व महसूल मंडळाची माहिती तालुका , उप विभाग व जिल्हा स्थरावरील अन्य विभागाच्या कार्यालयांना माहितीसाठी पाठवावी.
                सदरच्या मार्गदर्शक सूचना सर्व तलाठी , मंडळ अधिकारी व तहसीलदार यांचे निदर्शनास आणाव्यात ही विनंती
सोबत – वाडी विभाजन कार्यपद्धतीचे user manual असे.

                                                                    आपला विश्वासू,               
                                     






(रामदास जगताप)
राज्य समन्वयक, ई फेरफार प्रकल्प
    जमाबंदी आयुक्त कार्यालय, पुणे.
प्रत, उप विभागीय अधिकारी (सर्व)
प्रत, तहसिलदार (सर्व) यांना महितीसाठी

Comments

  1. नमस्कार मा साहेब , मी ता जि उस्मानाबाद येथील राहिवासी असून हस्तलिखित ७ /१२ व डिजिटल ७/१२ मधील विसंगती बाबत इ हक्क प्रणालीचा वापर करून ऑनलाईन अर्ज केला केला आहे .प्रणाली हि खूप उत्तम आहे . माझा प्रश्न हा आहे कि ? ऑनलाईन अर्ज केल्यानंतर तलाठी यांनी किती दिवसात अर्ज तपासून अभिप्राय देणे अपेक्षित आहे ? आणि वेळेपेक्षा जास्त कालावधी घेत असतील तर कोणाकडे अर्ज करायचा ? अर्ज जर चुकला असेल तर चुकला म्हणून तरी कळविणे अपेक्षित आहे म्हणजे दुरुस्त करून परत देता येईल. जवळपास महिना होऊन देखील तलाठी यांच्याकडून अर्जास काही उत्तर नाही . ह्या बाबतीत मदत करावी

    ReplyDelete
  2. नवीन महसूल गावसाठी किमान किती क्षेत्रफळ असावे लागते क्की

    ReplyDelete

Archive

Contact Form

Send