विषय – ई फेरफार प्रणालीच्या USER CREATION मध्ये तालुक्यातील सर्व साजे व मंडळ तयार करून नायब तहसीलदार यांनी प्रमाणपत्र दिल्याशिवाय DDM चे चलन न तयार करणे बाबत
नमस्कार मित्रांनो ,
विषय – ई फेरफार प्रणालीच्या USER CREATION मध्ये
तालुक्यातील सर्व साजे व मंडळ तयार करून नायब तहसीलदार यांनी प्रमाणपत्र दिल्याशिवाय
DDM चे चलन न तयार करणे बाबत
ई फेरफार प्रणाली मध्ये ऊजर क्रिएशन (UC)
मध्ये तत्कालीन BDA तथा सध्याचे नायब तहसीलदार ( ई फेरफार ) यांनी आपल्या तालुक्यातील
सर्व अधिसूचित तलाठी साजा व महसूल मंडळे जिल्ह्याधिकारी यांचे अधिसूचने प्रमाणे
तयार करणे अपेक्षित होते तथापि असे परिपूर्ण कामकाज कोणत्याही तालुक्यात झालेले
नाही त्यासाठी काही अडचणी प्रणाली मध्ये देखील होत्या त्यामुळे नायब तहसीलदार
यांना साजाचे किंवा मंडळाचे नाव बदलता येत नव्हते तसेच कोणत्याही महसूल गावाचे नाव
नसलेले नाव साजा किंवा मंडळ यांना देता येत नव्हते तसेच अनावधानाने काही साजे
किंवा मंडळे चुकून तयार झाली असतील तर त्यात दुरुस्ती करता येत नव्हती परंतु या
सर्व अडचणी दूर करून USER CREATION मधून नायब तहसीलदार यांना सर्व साजे व मंडळे दुरुस्त करता येतील अशी
सुधारणा करणेत आली आहे.
१.
कोणताही
साजा / मंडळ नष्ट करता येईल
२.
कोणत्याची
साजाचे / मंडळाचे नाव बदलता येईल
३.
कोणत्याही
साजात / मंडळात नवीन गाव समाविष्ट करता
अथवा वगळता येईल .
४.
कोत्याही
साजा / मंडळाचे नाव नव्याने दुरुस्त करता येईल.
५.
त्या
बाबत चे USER MANUAL देखील आपल्याला मेल वर पाठविले आहे . त्याप्रमाणे सर्व नायब
तहसीलदार (ई फेरफार) यांना विनंती करणेत येते कि , आपल्या तालुक्यातील सर्व साजे
व मंडळ तयार करून नायब तहसीलदार यांनी प्रमाणपत्र दिल्याशिवाय कोणत्याही तलाठी
यांनी DDM चे चलन तयार करू नये अथवा नक्कल
फी बँकेत अथवा ऑनलाईन बहरू नये तसेच सर्व नायब तहसीलदार (ई फेरफार) यांनी आपले
साजे व मंडळे तयार करावयाचे कामकाज दिनांक १२ मे, २०२० पर्यंत पूर्ण करून खालील
नमुन्यातील प्रमाणपत्र ऑनलाईन तयार करावे
व त्याची एक एक प्रत डी. डी. ई. व विभागीय
समन्वयक (हेल्प डेस्क) यांना १२ मे पूर्वी
पाठवावी व त्यानंतरच मार्च व एप्रिल २०२० ची नक्कल फी जमा करावी.
६.
सर्व
नायब तहसीलदार (ई फेरफार ) यांचा निर्देश देण्यात येतात कि कोणत्याही साजा चा
अतिरिक्त कार्यभार अन्य तलाठी यांचेकडे हस्तांतरित करताना गावे विभागून दिली असली
तरी त्याप्रमाणे स्वतंत्र साजे तयार करू नयेत .
तालुक्यातील
सर्व साजे व मंडळ तयार केले बाबत
नायब तहसीलदार यांनी द्यावयाचे प्रमाणपत्र
अ.न.
|
साजा कोड व नाव
|
साजा मध्ये समाविष्ट गावे व सेन्सस कोड
|
शेरा
|
||
१.
|
साजा -१
|
गाव न.१ (272510911111922100)
गाव न.२ (272510911111922101)
गाव न.३ (272510911111922102)
|
|||
२.
|
साजा -२
|
गाव न.१ (272510911111922200)
गाव न.२ (272510911111922201)
गाव न.३ (272510911111922202)
|
मी. श्री./ श्रीमती
--------------------------------------------- नायब तहसीलदार ( ई-फेरफार)
प्रमाणित करतो कि ------------तालुका ----------------जिल्ह्यात एकूण
---------महसुली गावे असून त्याचे ---- इतके तलाठी साजे व --- इतके महसूल मंडळे अधिसूचित व कार्यरत आहेत तसेच
त्याप्रमाणे सर्व सालातही साजा व महसूल मंडळे युजर क्रिएशन मध्ये तयार करणेत आले
आहेत. या मध्ये सर्व साजे व महसूल मंडळे म.ज.म.अधिनियम १९६६ अन्वये अधिसूचित
झालेली व सध्या कार्यरत आहेत ह्याची मी स्वतः खात्री केली आहे.
दिनांक
--/--/---- (श्री./श्रीमती
------------)
नायब तहसीलदार (ई फेरफार)
तालुका
---- जिल्हा ----
खूप छान सुधारणा सर...
ReplyDeleteआवश्यकता होती सुविधेची