रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

लॉकडाऊन च्या 42 दिवसाच्या कालावधीतील वर्क फ्रॉम होम च्या कामकाजाचा आढावा



लॉकडाऊन  च्या 42   दिवसाच्या कालावधीतील वर्क फ्रॉम होम च्या कामकाजाचा आढावा 

                 
कोरोना विषाणू संसर्गजन्य आजारच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊन मुळे आज 42  दिवसानंतर  ई फेरफार प्रकल्पाचा आढावा
 
                             
ई महाभूमी चे ई फेरफार , ई पीक पाहणी , ई चावडी , आपला ७/१२ , आपली चावडी , महाभूनकाशा , ई हक्क , बँकिंग चे वेब पोर्टल , ई मोजणी , ई मिळकत पत्रिका या तांत्रिक प्रकल्पांचे सर्व कामकाज वर्क फ्रोम होम ( घरूनच कामकाज ) च्या मार्गदर्शक तत्वानुसार सुरु आहे . त्यासाठी राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राचे सर्व तंत्रज्ञ व तांत्रिक मनुष्यबळ , आमचा हेल्प डेस्क व राज्यसमन्वयक  स्वता १००% घरून कामकाज ( वर्क फ्रॉम होम )  करत असून त्यासाठी skype व्हिडीओ कॉन्फरन्स , any desk , ई मेल , whats app , call  कॉन्फरन्स सारख्या तंत्रज्ञाचा वापर सर्वांकडून केला जात आहे .

             
                                 
राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राचे सर्व तंत्रज्ञ  यांनी लॉकडाऊन कालावधीतील प्रत्येक टीम च्या कामाचा आढावा मा. जमाबंदी आयुक्त यांना सादर केलां व  कररार पद्धतीने कार्यरत असलेल्या तांत्रिक मनुष्यबळाला वर्क फ्रोम होम साठी काही अडचणी आहेत का ? ह्याचाही आढावा घेनेत आला. पुण्याची सध्याची स्थिती अजून काही दिवसतरी सुधारण्याची चिन्ह दिसून येत नाहीत त्यामुळे सर्व तांत्रिक प्रकल्प  लॉकडाऊन च्या काळात सुरळीत सुरु राहण्यासाठी मी देखील राज्य समन्वयक म्हणून रात्रीचा दिवस करून कामकाज करत आहेत व ई फेरफार , ई पीक पाहणी , आपला ७/१२, आपली चावडी, महाभूनकाशा, ई हक्कई मोजणी, ई मिळकत पत्रिका, बँकिंग पोर्टल, महाभूमी पोर्टल, भूलेख वरील विना स्वाक्षरीत ७/१२ , अभिलेख वितरण प्रणाली, बँक लिंकेज या सर्व टीम चे  लॉकडाऊन काळातील कामकाज पाहून मा. जमाबंदी आयुक्त यांनी देखील समाधान व्यक्त केले तसेच या पुढील कालावधीत करावायाचे कामकाजाचे टार्गेट देण्यात आले आहे. लॉकडाऊन च्या कालवधीत देखील काही जिल्हामधील सुमारे चार ते साडेचार हजार तलाठी  व मंडळ अधिकारी वेळेत वेळ काढून ई फेरफार मध्ये कामकाज करत आहेत. त्यांच्या अडचणी सोडविण्याचे  काम हेल्प डेस्क व सपोर्ट इंजिनिअर करत आहेत ..


१. या कालावधीत देखील ई फेरफार प्रकल्पाचे कामकाज सुरळीत सुरु आहे  .
२. जमाबंदी आयुक्त स्वतः झूम मीटिंग च्या माध्यमातून वरिष्ठ स्थरावर मीटिंग घेवून महत्वाचे निर्णय घेत आहेत.
२. राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राची (NIC) संपूर्ण टीम चे देखील कामकाज वर्क फ्रॉम होम द्वारे सुरु आहे.
३. जमाबंदी आयुक्त कार्यालयातील व NIC तील हेल्प डेस्क राज्यातील सर्व तलाठी मंडळ अधिकारी यांना येणाऱ्या अडचणी ऑनलाईन पद्धतीने सोडवत आहेत.
४. राज्यातील ९८.५० %  म्हणजेच २ कोटी ४९ लक्ष  गाव नमुना नं. ७/१२ डिजिटल स्वाक्षरीत झाले असल्याने ते सामान्य जनतेला  महाभूमी  पोर्टल च्या  https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in/DSLR या लिंकवर   ऑनलाईन उपलब्ध होत आहे .  लॉकडाऊन च्या कालावधीत सुमारे १,६०,००० सातबारा  नव्याने डिजिटल स्वाक्षरीत करणेत आले आहेत.
५. या कालावधीत देखील दररोज  सुमारे चार ते साडेचार  हजार डिजिटल  स्वाक्षरीत ७/१२ खातेदारांकडून रक्कम रुपये १५/- चा  ऑनलाईन भरणा करून उपलब्ध करून घेत आहेत.
६. ई हक्क प्रणालीचा वापर करून महाभूमी पोर्टल च्या https://pdeigr.maharashtra.gov.in/frmLogin.aspx  या लिंक चा वापर करून   खातेदार  अथवा बँक / वित्तीय संस्था यांना  फेरफार घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करता येत आहे . या ४२ दिवसाच्या कालावधीत सुमारे चार हजार ऑनलाईन अर्ज तलाठी यांना प्राप्त झाले असून त्यावर प्रक्रिया सुरु आहे. ह्याचा सर्वाधिक  फायदा बँकांना झाल्याचे  दिसून येते.
७. महाभूमी च्या पोर्टल वरून भूलेख https://bhulekh.mahabhumi.gov.in/ या लिंक वरून सुमारे १ ते १.५  लक्ष खातेदार आपला विनास्वाक्षरीत ७/१२ व खाते उतारा दररोज प्राप्त करून घेत आहेत.
८. ३७  दिवसांच्या या कालावधीत तलाठी मंडळ अधिकारी यांनी सुमारे ८०,००० पेक्षा जास्त फेरफार घेवून निर्गत करण्याचे काम केले आहे.
८. तसेच संगणकीकृत ७/१२ मधील त्रुटी दूर करण्यासाठी कलम १५५ प्रमाणे दुरुस्ती चे कामकाज देखील ज्या ठिकाणी अजून फारसा विषाणू संसर्ग झालेला नाही त्या ठिकाणी चालू आहे.
९. राज्य समन्वयक स्थरावरून शासन , NIC, जमाबंदी आयुक्त कार्यालय, शासनाचा माहिती व तंत्रज्ञान विभाग व अन्य विविध विभाग, बँकामहसूल अधिकारी, तलाठी मंडळ अधिकारी  व सामान्य वापरकर्ते यांच्यात समन्वय राखुण सर्व ऑनलाईन कामकाज सुरळीत सुरु ठेवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
१०. या कालावधीत देखील दररोज  सुमारे चार ते साडेचार हजार तलाठी व मंडळ अधिकारी ई फेरफार प्रणाली मध्ये ऑनलाईन कामकाज करत आहेत. 
११. झूम मिटिंग द्वारे ई चावडी प्रणाली विकसित करताना क्षेत्रीय स्थरावर चालणारे कामकाज व कायदेशीर तरतुदींचा अभ्यास करण्यासाठी डोमेन टीम च्या ऑनलाईन बैठका सुरु आहेत .
१२. ३५ जिल्ह्यांपैकी ३४ जिल्ह्यातील सुमारे ११ ,५०० तलाठी  साजा साठी व्हार्चुंअल अकौंट (VAN) तयार करून त्याचे अभिलेख  वितरण प्रणालीत (DDM) मापिंग पूर्ण करण्यात आले असून एप्रिल २०२० पासून ची नक्कल फी बँक ऑफ बडोदा या बँकेत  ऑफलाईन व ऑनलाईन भरण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. १ एप्रिल ते ५ मे, २०२० या कालावधीत सुमारे १० लक्ष रुपये VAN द्वारे जमा देखील करणेत आले आहेत .
१३. मार्च २०२० मध्ये विकसित केलेल्या सुमारे २५/३० नविन सुविधा वापरण्यासाठी उप्लाध करून दिल्या आहेत.
४. भारत नेट अंतर्गत ५११५ ग्राम पंचायतीना जोडणी दिलेल्या इंटरनेट कनेक्शन चा वापर तलाठी मंडळ अधिकारी यांना करता येईल का? ह्याची देखील खात्री केली जात आहे. त्याची यादी सर्व जिल्हाधिकारी यांना पाठवली आहे व नाशिक जिल्ह्यात पायलट प्रकल्प राबविला जात आहे .

             ई महाभूमी प्रकल्पामुळे मात्र महसूल विभागात ऑनलाईन कामकाजाची एक नवीन संस्कृती रुळत आहे व तीच पुढच्या काळात सर्वांना आत्मसात करावी लागेल तरच सामान्य जनतेला आपण खऱ्या अर्थाने न्याय देवू शकू असे मला वाटते . म्हणून तर या लॉकडाऊन च्या काळात देखील दररोज  चार ते पाच हजार डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ सामान्य जनता ऑनलाईन उपलब्ध करून घेत आहेत. त्यापोटी या कालावधीत सुमारे ९० हजार डिजिटल स्वाक्षरीत सातबारा डाऊनलोड करण्यात आले असून त्यापोटी ५ लाख रुपयांचा महसूल शासनाला जमा झाला आहे. तसेच अनेक बँक देखील ऑनलाईन ७/१२ ची सुविधा वापरात आहेत, सध्या कोणत्याही कामासाठी डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ जनतेला स्वतःला मोबाईलवर किंवा सेतू केंद्र , महा ई सेवा केंद्र व संग्राम केंद्र येथून उपलब्ध होत आहे.


आपला
रामदास जगताप
दि ६.५.२०२०

23/03/2020
646
24/03/2020
313
25/03/2020
153
26/03/2020
133
27/03/2020
280
28/03/2020
207
29/03/2020
180
30/03/2020
622
31/03/2020
894
01/04/2020
866
02/04/2020
733
03/04/2020
1205
04/04/2020
1387
05/04/2020
967
06/04/2020
1352
07/04/2020
2019
08/04/2020
1435
09/04/2020
1433
10/04/2020
931
11/04/2020
874
12/04/2020
802
13/04/2020
1916
14/04/2020
1175
15/04/2020
2235
16/04/2020
2564
17/04/2020
2321
18/04/2020
2069
19/04/2020
977
20/04/2020
3056
21/04/2020
2956
22/04/2020
3166
23/04/2020
3684
24/04/2020
3459
25/04/2020
1949
26/04/2020
1162
27/04/2020
3540
28/04/2020
3752
29/04/2020
3664
30/04/2020
3706
1/05/2020
1935
02/05/2020
2940
03/05/2020
1275
04/05/2020
4874
05/05/2020
4551
06/05/2020
4292


Comments

Archive

Contact Form

Send