UC मध्ये तलाठी साजे व महसूल मंडळे तयार करून प्रमाणपत्र देण्यासाठी नविन सुविधा वापरणे बाबत.
महाराष्ट्र शासन
महसूल व वन विभाग
जमाबंदी आयुक्त आणि
संचालक भूमी अभिलेख (म.राज्य ), पुणे
दूसरा व तिसरा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, विधान भवन समोर, कॅम्प, पुणे. 1
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
क्रमांक : क्र.रा.भू अ.का./मा.सू./1५७/२०२० दिनांक: १८/0५/2020
प्रति,
उप जिल्हाधिकारी तथा डी.डी.ई.(सर्व).
विषय – UC मध्ये तलाठी साजे व
महसूल मंडळे तयार करून प्रमाणपत्र देण्यासाठी
नविन सुविधा वापरणे बाबत.
ई फेरफार प्रणाली मध्ये युझर क्रिएशन (UC) मध्ये तत्कालीन DBA तथा सध्याचे नायब तहसीलदार (ई फेरफार) यांनी आपल्या तालुक्यातील सर्व अधिसूचित तलाठी साजा व महसूल मंडळे जिल्ह्याधिकारी यांचे अंतिम अधिसूचने प्रमाणे व सध्या अस्तित्वात असले प्रमाणे तयार करणे अपेक्षित आहे तथापि मंजूर तलाठी साजा पुनर्रचने प्रमाणे काही ठिकाणी नवीन साजे तयार करणेत आले आहेत व काही ठिकाणी तसे झालेले नाही या बाबत ची संभ्रमवस्ता घालविण्यासाठी सर्व निवाशी उप जिल्हाधिकारी यांनी या बाबत शासनाचे निर्देश विचारात घेवून उचित कार्यवाही चे निर्देश नायब तहसिलदार (ई-फेरफार) यांना द्यावेत. या पूर्वी साजे व मंडळे तयार करताना काही नोंदी चुकीच्या झाल्याचे आढळून येत आहे. साझाचे किंवा मंडळाचे नाव हे त्यातील समाविष्ट गावा व्यतिरिक्त इतर नाव देता येत नव्हते वा मंडळाचे नाव बदलता येत नव्हते, तसेच अनावधानाने काही साजे किंवा मंडळे चुकून तयार झाली असतील तर त्यात दुरुस्ती अथवा नष्ट करता येत नव्हती परंतु या सर्व अडचणी दूर करून USER CREATION मधून नायब तहसीलदार यांना सर्व साजे व मंडळे दुरुस्त करता येतील अशी सुधारणा करणेत आली आहे.
१. कोणताही साजा / मंडळ नष्ट करता येईल.
२. कोणत्याची साजाचे / मंडळाचे नाव बदलता येईल.
३. कोणत्याही साजात / मंडळात नवीन गाव समाविष्ट करता अथवा वगळता येईल.
४. कोत्याही साजा / मंडळाचे नाव नव्याने दुरुस्त करता येईल.
या बाबत चे USER MANUAL सोबत जोडलेले आहे. त्याप्रमाणे सर्व नायब तहसीलदार (ई फेरफार) यांना विनंती करणेत येते कि, आपल्या तालुक्यातील सर्व साजे व मंडळ दुरुस्ती करून ते योग्य असल्याचे नायब तहसीलदार यांनी प्रमाणपत्र द्यावयाचे आहे हे काम पूर्ण झाल्या शिवाय तालुक्यातील कोणत्याही गावाचे DDM आज्ञावली मध्ये चलन काढता येणार नाही. हे प्रमाणपत्र ऑनलाईन मध्ये देताच DDM मधे चलन तयार करता येइल.

सर्व नायब तहसिलदार (ई फेरफार ) यांना
विनंती आहे की त्यांनी आपल्या तालुक्यातील साजे व महसूल मंडळे दुरूस्ती चे काम आज
पूर्ण करून ऑनलाइन प्रमाणपत्र द्यावे. सर्व तालुक्यातील डुप्लीकेट साजे व मंडळे तसेच
ब्लॅंक साजे व मंडळे नष्ट करनेट आली आहेत आता आपले लॉगिन ला फक्त अचूक साजे व मंडळे
दिसतील ह्याची नोंद घ्यावी.
ज्या साजा चे VAN तयार झालेले नाहित तेथे SBI चे चलन तयार होइल. महिना पुर्ण झाल्या शिवाय त्या महिन्याचे चलन तयार होणार नाही ह्याची नोंद घ्यावी.

सदरच्या मार्गदर्शक सूचना सर्व तलाठी , मंडल अधिकारी व नायब तहसिलदार (ई-फेरफार)
यांचे निदर्शनास आणाव्यात. ही विनंती.
आपला विश्वासू,
(रामदास जगताप)
राज्य समन्वयक, ई फेरफार प्रकल्प,
जमाबंदी
आयुक्त कार्यालय, पुणे.
प्रत, उप
विभागीय अधिकारी (सर्व)
प्रत,
तहसिलदार (सर्व) यांना महितीसाठी
Comments