रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

शेतकऱ्यांना अद्यावत पीक पाहणीचा डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ उपलब्ध होण्याबाबत.


महाराष्ट्र शासन
महसूल व वन विभाग
जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख (.राज्य ) , पुणे
दूसरा व तिसरा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, विधान भवन समोर, कॅम्प, पुणे १ .
दूरध्वनी क्र. ०२०-२६१३७११०                  Email ID : statecordinatormahaferfar@gmail.com         
                                                                                     Web site:  https://mahabhumi.gov.in            
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
क्रमांक : क्र.रा.भू.अ.का./रा.स./मा.सू./१५/२०२०                                              दिनांक:   २२.५.२०२०


  प्रति,
          उप  जिल्हाधिकारी तथा डी.डी.ई.(सर्व).

         विषय   शेतकऱ्यांना अद्यावत पीक पाहणीचा डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ उपलब्ध होण्याबाबत.  

महोदय ,

                  राज्यातील सर्व शेतकरी, बॅंक, विविध कार्य.से.स.सो., पतसंस्‍था, शासनाची विविध महामंडळे व शासनाचे  विविध विभाग यांना चालु हंगामाचे पिक पेरा भरलेला डिजीटल स्‍वाक्षरीत ७/१२  उपलब्‍ध करून देणेसाठी सर्व तलाठी यांनी खालीलप्रमाणे कार्यवाही करणे आवश्‍यक आहे.

       प्रथम सर्व तलाठी यांनी त्‍यांचे  कडील सर्व गावांचे खरीप, रब्‍बी,उन्हाळी व संपूर्ण वर्षासाठी चे सन २०१९-२० चे पेरेपत्रक भरणे आवश्‍यक आहे. त्‍यानंतर OCU आज्ञावलीमध्‍ये गाव निवडुन सर्व्‍हे क्रमांक Declaration” या पर्यायाचा वापर करून हंगाम / वर्ष निवडून ज्‍या सर्व्‍हे क्रमांकाचे पीक पाहणी अद्यावत करण्याचे काम पूर्ण झाले आहे अशा सर्व्‍हे क्रमांकांना निवडून निवडलेल्‍या सर्व्‍हे क्रमांकाचे काम संपल्‍याची घोषणा करणे आवश्‍यक आहे.  त्‍यानंतर OCU आज्ञावलीतील काम संपल्‍याची घोषणा केलेले सर्व्‍हे क्रमांक DSD आज्ञावलीत पिक पाहणी पश्‍चात ७/१२ अभिलेख डिजीटल स्‍वाक्षरीत  करण्‍यास पात्र सर्व्‍हे क्रमांकाचा डॅशबोर्डमध्‍ये जाऊन त्‍याठिकाणी उपलब्‍ध सर्व ७/१२ वरील पीक पाहणी कायम करून अस सर्व ७/१२ डिजिटल स्वाक्षरीत करणे आवश्‍यक आहे.


उक्‍त कार्यवाही केल्‍यानंतरच सर्व शेतकरी, बॅंक, विविध कार्य.से.स.सो., पतसंस्‍था, शासनाची विविध महामंडळे व शासनाचे  विविध विभाग यांना चालु हंगामाचे पिक पेरा भरलेला डिजीटल स्‍वाक्षरीत ७/१२ महाभूमी पोर्टलवरून (https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in/DSLR ) उपलब्‍ध होऊ शकेल याची सर्वानी नोंद घ्‍यावी.

 
        OCU मधील चालु हंगामापर्यंत पिकपहाणी भरून त्‍याची घोषणा करण्याचे किती का दिनांक ५ मे,२०२० अखेर शिल्लक होते त्याचा तालुका निहाय गोषवारा खालील प्रमाणे आहे. सदरची माहिती तलाठी लॉगीन ला OCU गाव निहाय उपलब्ध आहे.  

अ.नं
तालुका
रब्बी
खरीप
उन्हाळी
संपर्ण वर्ष
कोल्हापूर

5
करवीर
0
1644
0
0

12
भोर
176
1609
0
261


औरंगाबाद
1
कन्नड
1
2740

106



5
औरंगाबाद

3287

388




3
औंढा नागनाथ
208
1777

84

4
कळमनुरी
10
1964



5
वसमत

12744

72

नांदेड





3
कोपरगाव
1083
1204

618





7
शेवगाव
8
1404

27






15
जामनेर
10
1088











यवतमाळ

3
कळंब
23
1013
2
0





7
बार्शीटाकळी
17
1969
0
0


एकूण
1093
17925
11
1

वाशिम


3
कारंजा(लाड)
329
1284
0
0




7
चामोर्शी
79
1118
0
0



वर्धा
1
आष्टी
2
11492
0
1


11
हिंगणा
52
1236
0
1



               ज्या तालुक्यात १००० पेक्षा जास्त सर्वे नंबर आहेत अशा उपरोक्त तालुक्यातील हे काम अत्यंत तातडीने पूर्ण करावे असे निर्देश सर्व तलाठी यांना देण्यात यावेत ही विनंती

                                                            आपला विश्वासू,          
                                     

(रामदास जगताप)
राज्य समन्वयक, ई फेरफार प्रकल्प
    जमाबंदी आयुक्त कार्यालय, पुणे.
प्रत, उप विभागीय अधिकारी (सर्व)
प्रत, तहसिलदार (सर्व) यांना महितीसाठी

Comments

Archive

Contact Form

Send