फेब्रुवारी २०२० पूर्वीची ७/१२ ची नक्कल फी जमा पावती द्वारे जमाबंदी आयुक्त यांचे SBI खात्यावर जमा करून घेणे बाबत.
महाराष्ट्र शासन
महसूल व वन विभाग
जमाबंदी आयुक्त आणि
संचालक भूमी अभिलेख (म.राज्य) , पुणे
दूसरा व तिसरा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, विधान भवन समोर, कॅम्प, पुणे १.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
क्रमांक : क्र.रा.भू.अ.का./रा.स./मा.सू./१६१/२०२० दिनांक: २९.५.२०२०
प्रति,
शाखा अधिकारी .
स्टेट
बँक ऑफ इंडिया (सर्व)
विषय – फेब्रुवारी २०२० पूर्वीची ७/१२ ची नक्कल फी जमा पावती द्वारे
जमाबंदी आयुक्त यांचे SBI खात्यावर जमा करून घेणे बाबत.
जमाबंदी आयुक्त यांचे SBI खात्यावर जमा करून घेणे बाबत.
राज्यातील सर्व तलाठी कार्यायातून वितरीत केल्या जात असलेल्या अधिकार अभिलेखांची नक्कल फी अभिलेख वितरण प्रणालीतून (DDM) तयार होणाऱ्या चलनाद्वारे मागील वर्षभरापासून दरमहा जमाबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य ) पुणे यांचे खात्यावर भरली जात होती. माहे मार्च २०२० पासून ही नक्कल फी व्हर्चुअल अकौंट नंबर (VAN) द्वारे जमा करणेसाठी अभिलेख वितरण प्रणालीत बदल करणेत आला आहे त्यामुळे या प्रणालीतून फक्त मार्च २०२० नंतरचेच चलन VAN खाते नंबर नमूद करून चलन तयार होते. त्यामुळे माहे फेब्रुवारी २०२० पूर्वीची काही नक्कल फी कोणत्याही तलाठी यांनी जमा केली नसेल तर आता सदरची रक्कम बँकेचा जमा पावतीचे आधारे या खात्यावर जमा करून घ्यावी.
Bank Account Details
-
Current
Account No. 38306827364
IFSC Code
No- SBIN0001904
Name
- Settlement Commissioner and Director of Land Record (Maharashtra State) Pune
Bank
– State Bank of India,Treasury Branch, Pune -1.
तलाठी यांनी दरमहा वितरीत केलेल्या
नकालांची संख्या व जमा करावयाची रक्कम अभिलेख वितरण
प्रणालीतील तलाठी लॉगीनद्वारे अहवालामध्ये दर्शविण्यात आलेली आहे त्याचे
आधारे प्रत्येक तलाठी साजेची दरमहा किती रक्कम अद्याप भरावयाची शिल्लक आहे
त्याप्रमाणे प्रत्येक महिन्याच्या रकमा निश्चित करून त्या प्रमाणे बँकेच्या जमा
पावतीच्या आधारे तलाठी यांनी नक्कल फी उपरोक्त खात्यावर तात्काळ जमा करावी. ही जमा
पावती तयार करताना त्यावर तालाठी साजाचे नाव तलाठ्याचा सेवार्थ आय.डी., महिना वर्ष
व रक्कम स्पष्टपणे नमूद करावी. बँक
अधिकारी यांनी देखील माहे फेब्रुवारी २०२० पर्यंतचा तपशील नमूद असलेली रक्कम जमा
पावतीद्वारे उपरोक्त खातेवर जमा करून घ्यावी. खात्याबाबताचा अचूक तपशील जमा
पावतीवर नमूद केला असल्याची खात्री तलाठी यांनी रक्कम जमा करण्यापूर्वीच करावी. ही
विनंती.
बँकेत उपरोक्त खात्यावर रक्कम जमा करून घेण्यासाठी लेखी अनुमती देण्यासाठी
हे सूचनापत्र काढले आहे.
सदरच्या
मार्गदर्शक सूचना सर्व तलाठी, मंडल अधिकारी व नायब
तहसिलदार (ई-फेरफार) व स्टेट बँक ऑफ
इंडिया या बँकेच्या शाखा अधिकारी यांचे निदर्शनास आणाव्यात. ही विनंती.
आपला विश्वासू,
XXX स्वाक्षरीत
(रामदास जगताप)
राज्य समन्वयक, ई फेरफार प्रकल्प
जमाबंदी आयुक्त कार्यालय, पुणे.
प्रत, उप जिल्हाधिकारी तथा
डी.ई.ई.(सर्व)
प्रत, उप विभागीय अधिकारी (सर्व)
प्रत, तहसिलदार (सर्व) यांना महितीसाठी
सर्व तहसीलदार यांनी या पद्धतीने
माहे २०२० अखेरची सर्व नक्कल फी स्टेट बँक ऑफ इंडिया च्या खात्यावर भरली जाईल हयाची
खात्री करून त्याचा DDM अहवाला सोबत ताळमेळ घ्यावा व त्याचा अहवाल १५ जून २०२०
पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत इकडे पाठवावा.
Comments