१५ एप्रिल, २०२० पासून अधिकार अभिलेख्यांची नक्कल फी बँक ऑफ बडोदा च्या व्हर्चुअल अकौंट नंबर (VAN) द्वारे ऑनलाईन जमा करणे बाबत.
विषय – १५ एप्रिल, २०२० पासून अधिकार अभिलेख्यांची नक्कल फी बँक ऑफ बडोदा च्या व्हर्चुअल अकौंट नंबर (VAN) द्वारे ऑनलाईन जमा करणे बाबत.
संदर्भ – या कार्यालयाचे दिनांक ३/४/२०२० ची मार्गदर्शक सूचना क्र. १३६
कृपया संदर्भीय मार्गदर्शक सूचना चे अवलोकन व्हावे.
२ सर्व तलाठी यांना अधिकार अभिलेख्यांची नक्कल फी VAN चा वापर करून जमा करण्यासाठी बँककाउंटर वरुन व ऑनलाईन असे दोन पर्याय असतील.
१) बँक काउंटर वरुन भरणा- बँक ऑफ बडोदा या बँकेच्या कोणत्याही शाखेच्या काउंटरवरुन थेट रोख रक्कम या खात्यावर जमा करता येईल. त्याच बरोबरच देना बँक व विजया बँकेत देखील रोख रक्कम जमा करता येईल. तथापी या शाखामधून ही रोख रक्कम NEFT द्वारे बँक कर्मचारी यांचे कडून व्हर्चुअल अकौंट नंबर (VAN) जमा करणेत येईल. त्यासाठी या जमा पावतीवर (चलन) प्रिंट झालेला त्या साजेचा व्हर्चुअल अकौंट नंबर (VAN) व IFSC CODE - BARB0STAPOO नमूद करावा. (IFSC CODE मधील पाचवे अक्षर शून्य आहे) सदरची रक्कम जमा करण्यासाठी तलाठी यांचे कडून बँक कोणेही अधिकचे शुल्क आकारणार नाही.
२) ऑनलाईन भरणा - कोणत्याही तलाठी यांना कोणत्याही बँक खात्यावरून इंटरनेट बँकिंग सुविधा वापरुन ऑनलाईन भरणा करता येईल. त्यासाठी देखील कोणतेही अधिकचे शुल्क आकारले जाणार नाही. इंटरनेट बँकिंग सुविधा वापरुन ऑनलाईन भरणा करताना payment / transfer पर्यायातून payment using VAN हा पर्याय वापरावा व त्यासाठी आपल्या चलनावर प्रिंट झालेला त्या साजाचा VAN व IFSC CODE - BARB0STAPOO (IFSC CODE मधील पाचवे अक्षर शून्य आहे) हा वापरावा. तथापि स्टेट बँक ऑफ इंडिया मधील खात्यावरून पेमेंट करताना VAN नुसार net banking द्वारे चलान भरणा करताना VAN fund Transfer या पर्यायातून गेल्यास अगोदर VAN Beneficiary account add करा असे सुचवत आहे. आणि VAN Beneficiary account add करताना Short VAN does not exist असा error येत आहे....या बाबत सूचित करणेत येत आहे कि VAN fund Transfer हा पर्याय न वापरता नियमित खाते न. पर्यायामध्ये VAN टाकून पेमेंट करावे अशा पेमेंट ची स्लीप तलाठी यांनी जपून ठेवावी. आज समाविष्ट VAN नं. वर दुसऱ्या दिवशी ऑनलाईन पेमेंट करता येईल ह्याची नोंद घ्यावी.
५ ज्या तलाठी साजे DDM मध्ये तयार झाले आहेत तेथे तलाठी स्थरावरून अभिलेख वितरण प्रणालीतून (DDM) माहे मार्च २०२० या महिन्यात वितरीत केलेल्या अभिलेखांची एप्रिल २०२० मध्ये जमा करावयाची नक्कल फी स्टेट बँकेत न जमा करता बँक ऑफ बडोदा मधील या व्हर्चुअल अकौंट नंबर (VAN) चा वापर करून जमा करावी. माहे फेब्रुवारी २०२० पर्यंतची ची काही रक्कम जमा करावयाची राहिली असल्यास ती रक्कम व ज्या साजे यांचे VAN तयार झाले नाहीत तेथे नक्कल फी स्टेट बँकेतच जमा करावी.
६.
सदरच्या सर्व सूचना सर्व तलाठी , मंडळ अधिकारी , नायब तहसीलदार व तहसीलदार यांचे निदर्शनास आणून द्याव्यात ही विनंती.
स्वाक्षरीत
मा. जमाबंदी आयुक्त सो यांचे मान्यतेने. (रामदास जगताप)
राज्य समन्वयक , ई फेरफार प्रकल्प
Sir.. BOB kalamb branch dist. Yavatmal madhe aaj rakkam bharana karnas nakar dila.. Bank employees mhnant ki tynna kontyahi prakarchya suchana nahit..
ReplyDeleteplease show him the circular issued by bank of Baroda for the same which was sent dde on mail and whats app group
Delete