सर्व्हे क्रमांक दुरुस्तीसाठी राखीव ठेवणे (मार्क करणे) बाबत
महाराष्ट्र शासन
महसूल व वन विभाग
जमाबंदी आयुक्त आणि
संचालक भूमी अभिलेख (म.राज्य ) , पुणे
दूसरा व तिसरा मजला , नवीन प्रशासकीय इमारत , विधान भवन समोर , कॅम्प , पुणे 1
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
क्रमांक : क्र.रा.भू.4/ मा.सु. १४१ / २०२० दिनांक : १७/०४/२०२०
प्रति,
उप जिल्हाधिकारी तथा डी.डी.ई.(सर्व).
विषय – सर्व्हे क्रमांक दुरुस्तीसाठी
राखीव ठेवणे (मार्क करणे) बाबत
महोदय,
ई फेरफार प्रणालीत काम करताना विसंगत ७/१२ मधील
दुरुस्त्या करण्यासाठी कलम १५५ अन्वये दुरुस्तीच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या
आहेत व त्याद्वारे तसेच अन्य दुरुस्ती सुविधा वापरून ODC चे अहवाल १ ते ४७ दुरुस्त
केले जात आहेत तथापि या दुरुस्त्या सुरु असताना अन्य फेरफार घेतल्यामुळे अथवा
त्याच स.न. व नोंदणीकृत दस्त झाल्यामुळे आणखी विसंगती तयार होऊ नयेत म्हणून
दुरुस्ती साठी सर्व्हे क्रमांक राखीव ठेवणे ( मार्क करणे) ही एक नवीन सुविधा
तहसीलदार स्थरावर USER CREATION मध्ये उपलब्ध करून दिली जात आहे.
ODC अहवाल निरंक करताना काही ७/१२ वरील
आवश्यक असलेली खातेदारांची नावे देखील वगळली गेली असल्यास अथवा कंस झाली असल्यास
किंवा काही खातेदारांचे समोर चुकीचे क्षेत्र नमूद केले गेले असल्यास वाशी बाब
तलाठी /मंडळ अधिकारी / तहसीलदार यांचे
निदर्शनास आल्यास अथवा हितसंबंधित व्यक्तीने तशी लेखी/ तोंडी तक्रार केल्यासव
कागदपत्रावरून तसे झाले असल्यासे दिसून आल्यास असे स.न.दुरुस्तीसाठी राखीव
ठेवण्याची ( मार्क करण्याची ) तहसीलदार यांना UC मध्ये उपलब्ध करून दिली आहे.
१.
User Creation application मध्ये तहसीलदार यांचे
लॉगीन ला “सर्व्हे क्रमांक दुरुस्ती साठी राखीव ठेवणे (मार्क करणे)” हा एक नवीन पर्याय दिला आहे .
२.
गाव निवडून स.न. शोधल्या नंतर जो स.न. दुरुस्ती साठी राखीव ठेवायचा आहे त्याचे समोर चे निवडा बटन क्लिक
करावे
३.
या ७/१२ मध्ये काय दुरुस्ती करणे अपेक्षित आहे त्याचा शेरा
नमूद करण्यासाठी तहसीलदार यांनी पडताळणी बटन क्लिक करावे . त्यानंतर स्वयस्पष्ट
शेरा नमूद केल्या नंतर ती माहिते साठवा केल्या नंतर हा स.न. खाता दुरुस्ती व
चूक दुरुस्ती हे दोन फेरफार वगळता अन्य सर्व फेरफार साठी व दस्त नोंदणीसाठी प्रतिबंधित होईल.
४.
त्यानंतर अश्या स.न. वर तलाठी यांना फक्त कलम १५५ च्या
दुरुस्ती सुविधा पैकी फक्त खाता दुरुस्ती व चूक दुरुस्ती हे दोनच फेरफार घेता
येतील.
५.
या फेरफार प्रमाणे दुरुस्ती साठी तहसीलदार
यांनी मान्यता देवून परिशिष्ट क स्वाक्षरीत करून दिल्यास व मंडळ अधिकारी यांनी
फेरफार मंजूर केल्यास असे प्रतिबंधित केलेले अथवा दुरुस्तीसाठी राखीव ठेवलेले स,न.
आपोआप बंधमुक्त होतील व त्यावर अन्य सर्व फेरफार घेता येतील तसेच दस्त देखील
नोंदविता येतील.
६.
तहसीलदार यांनी या प्रमाणे राखीव
ठेवलेल्या स.न. चा अहवाल USER CREATION मध्ये तहसीलदार लॉगीन द्वारे “तहसीलदारांनी दुरुस्तीसाठी राखीव ठेवलेल्या ( मार्क केलेल्या
) सर्व्हे क्रमांकांची यादी” अन्वये देण्यात आलेली
आहे.
७.
तहसीलदार यांनी या प्रमाणे राखीव ठेवलेल्या
स.न. चा अहवाल ई फेरफार मध्ये तलाठी व
मंडळ अधिकारी लॉगीन द्वारे अतिरिक्त अहवाल
१ मध्ये “तहसीलदारांनी दुरुस्तीसाठी राखीव ठेवलेल्या ( मार्क केलेल्या ) सर्व्हे क्रमांकांची यादी” अन्वये देण्यात आलेली आहे.
८.
आपण आणखी एक गोष्ट लक्षात घ्यावी कि , तलाठी यांनी
कोणत्याही स.नं. वर खाता दुरुस्ती अथवा चूक दुरुस्ती मधून फेरफार घेतल्यास तो
फेरफार प्रमाणित होई पर्यंत या स.न. वर कोणताही अन्य फेरफार घेता येणार नाही अथवा
दस्त नोंदणी करता येणार नाही ह्याची नोंद घ्यावी.
सोबत या बाबत चे USER MANUAL जोडले
आहे .
सदरच्या सर्व सूचना सर्व तलाठी , मंडळ अधिकारी , नायब तहसीलदार व तहसीलदार
यांचे निदर्शनास आणून द्याव्यात ही विनंती.
आपला स्नेहांकित,
XX स्वाक्षरीत XX
(रामदास जगताप)
राज्य समन्वयक , ई फेरफार प्रकल्प
प्रत
,
उप विभागीय अधिकारी (सर्व)
तहसीलदार (सर्व) यांना महिती साठी व उचित
कार्यवाही साठी.
Comments