ई- हक्क प्रणालीतील बोजा ई करार चे नोंदी साठी प्राप्त अर्ज निर्गतीबाबत
महाराष्ट्र शासन
महसूल व वन विभाग
जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी
अभिलेख (म.राज्य ), पुणे
जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी
अभिलेख (म.राज्य ), पुणे
दूसरा व तिसरा मजला , नवीन प्रशासकीय इमारत, विधान भवन समोर, कॅम्प, पुणे 1
--------------------------------------------------------------------------------------------------------------------
क्रमांक : क्र.रा.भू.4/ मा.सु. १५२ / २०२० दिनांक : २४/०४/२०२०
प्रति,
उप जिल्हाधिकारी तथा डी.डी.ई.(सर्व).
विषय –ई- हक्क प्रणालीतील बोजा ई करार चे नोंदी साठी प्राप्त अर्ज निर्गतीबाबत
महोदय,
ई फेरफार प्रणालीत काम करताना सर्व फेरफार
घेण्याचे व निर्गातीचे कामकाज ऑनलाईन पद्धतीने केले जात आहे. ई फेरफार प्रणालीत
घेतेले जाणारे अनोंदणीकृत फेरफार नोंदविण्यासाठी आवश्यक असणारे अर्ज खातेदार /
बँका / वित्तीय संस्था व विविध सहकारी सोसायट्या यांना तलाठी यांचेकडे ऑनलाईन दाखल
करता यावेत यासाठी दि.१ ऑगस्ट, २०१९ पासुन शासनाकडून ई हक्क प्रणाली विकसित करून
क्षेत्रीयस्थरावर वापरण्यासाठी उपलब्ध करून दिली आहे.
ई-हक्क प्रणली द्वारे (https://pdeigr.maharashtra.gov.in/frmLogin.aspx) कोणत्याही खातेदाराला किंवा कर्ज पुरवठा करणाऱ्या बँका व
वित्तीय संस्था यांना कर्ज बोजा किंवा ई करारचे फेरफार घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज
तलाठी यांना पाठवता येतील व अर्जदार खातेदार अथवा संस्थेला त्याच्या Application
ID सह पोहोच देण्यात येते. अशा कर्ज बोजा अथवा ई करार फेरफारा साठी अर्जा सोबत खालील
स्वयंस्वाक्षरीत कागदपत्र जोडणे आवश्यक आहेत. कोणत्या फेरफार अर्जा साठी कोणती
कागदपत्र आवश्यक आहेत व अर्ज कोण दाखल करूशकतो.
अ.नं.
|
फेरफार प्रकार
|
अर्ज कोण करू शकते
|
आवश्यक कागदपत्र
|
नोटीस आवश्यक आहे का ?
|
१.
|
बोजा चढविणे
|
खातेदार / कर्ज पुरवठा करणारी बँक किंवा वित्तीय संस्था
|
१.बँक घोषणापत्र / नो.गहाणखताची सूची -२
२. बँकेचे पत्राची छायाप्रत
|
नोटीस आवश्यक आहे
|
२.
|
गहाणखत
|
खातेदार / नो.गहाणखत करून घेणारी करणारी बँककिंवा वित्तीय संस्था
|
१. नो.गहाणखताची सूची -२
२. बँकेचे पत्राची छायाप्रत
|
नोटीस आवश्यक आहे
|
३.
|
ई करार
|
खातेदार / ई करार करून घेणारी करणारी सहकारी सोसायटी .
|
१. सोसायटी ई करार ची छायाप्रत
|
नोटीस आवश्यक आहे
|
४.
|
बोजा / कर्ज बोजा कमी करणे
|
खातेदार / कर्ज पुरवठा करणारी बँक किंवा वित्तीय संस्था
|
१.बँक घोषणापत्र / नो. गहाणखत परतफेड दस्त किंवा रिलीज
दीड ची सूची -२
२. बँकेचे पत्राची छायाप्रत
|
नोटीस आवश्यक आहे
|
वरील प्रमाणे ई हक्क
प्रणालीतून दाखल केलेले ऑनलाईन अर्ज ई फेरफार प्रणालीमध्ये तलाठी यांचे लोगिनला त्याच
क्षणाला ऑनलाईन प्राप्त होतात. अशा ऑनलाईन अर्जांची तात्काळ दाखल घेवून PDE DASHBOARD
या ई फेरफार मधील पर्याय वापरून त्यासोबत जोडलेले कागदपत्रांचे अवलोकन करून करून
त्यान्वये फेरफार तयार करण्यात यावा व आर्व हितसंबंधितांना नोटीस काढावी. अर्जा
मध्ये काहे कमतरता असल्यास अर्जदार यांना त्यांचे मोबाईल नं. अथवा ई मेल आय डी वर
संपर्क करून पूर्तता कारण घेनेत यावी मात्र तलाठी यांनी अनावश्यक कागदपत्रांची
अपेक्षा ठेवून अथवा मागणी करून अर्ज नाकारू नयेत.
राज्याचे मुख्या सचिव
महोदयांनी राज्यस्थरीय बँकर्स समिती च्या दि.२५.०२.२०२० रोजी च्या राज्यस्थरीय
बँकर्स च्या बैठक क्र.१४६ व्या बैठकीत देलेलेल्या सुचानाप्रमाणे अनेक बँका ई हक्क
प्रणाली चा वापर करू लागल्या आहेत तथापी अनेक ठिकाणी तलाठी
त्रोटक व मोघम करणे देवून ऑनलाईन प्राप्त झालेले अर्ज नाकरत आहेत असे दिसून येते
हे अत्यंत चुकीचे व कार्यालयीन शिस्तीला धरून नाही. ई हक्क प्रणाली ची यशस्वी
अंमलबजावणी व्यवसाय सुगमता (E.O.D.B.) सध्या करण्यासाठी आवश्यक असून त्यातील अर्ज
विनाकारण नामंजूर होणार नाहीत ह्याची दक्षता घ्यावी.
१.
काही तलाठी यांचे कडून “ एकाच अर्जदाराला अनेक अर्ज दाखल
करू शकत नाही” असे कारण देवून अर्ज नाकारतात हे योग्य नाही. बँक, वित्तीय संस्था,
पतसंस्था किंवा सहकारी सोसायटी बोजा दाखल करणे / कमी करणे किवा ई करार साठी अनेक
अर्ज दाखल करू शकतात.
२.
काही तलाठी यांचे कडून “दाखल कागदपत्र अपूर्ण आहेत” किंवा “फक्त
सूची २ दाखल केली आहे संपर्ण गहाणखत आवश्यक आहे” असे कारण देवून अर्ज नाकारतात
तथापि नोंदणीकृत गहाणखताचा कारामांक व दिनांक माहित असल्यास आपल्याला दस्ताची प्रत
ई फेरफार मध्य पाहता येते. त्यामुळे संपूर्ण दस्त मागणी करू नये. तेव्हडी मोठी फाईल
अपलोड करता देखील येणार नाही.
३.
काही तलाठी यांचे कडून “दस्त चार वर्षापुर्वीचा आहे अजून
नोंद का करून घेतलेले नाही” असे कारण देवून अर्ज नाकारलेले दिसून येतात वस्तुता
नोंदणीकृत दस्त असल्यास यापूर्वी फेरफार घेतला नसल्यास अथवा फेरफार नामंजूर झालेल्या
नसल्यास फेरफार घेण्यात यावा.
४.
काही तलाठी यांचे कडून “सची २ सक्षम अधिकारी यांनी स्वाक्षरीत
केलेली व शिक्का केलेली असावी “ असे नमूद करून अर्ज नाकारता तथापि दस्त क्र. व
दिनांक माहित असल्यास सूची दोन ची प्रत व दस्त ची खात्री आपल्याला ई फेरफार अथवा
नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाच्या संकेत स्थळावरून पडताळणी करू शकतो त्यामुळे फक्त
याच कारणा साठी अर्ज नाकारू नयेत.
ई हक्क प्रणालीत प्राप्त , स्वीकृत व प्रलंबित अर्जांची गाव तालुका व जिल्हा निहाय माहिती ई फेफार प्रणालीतील MIS MODULE मध्ये स्वतंत्र लिंक द्वारे सर्व महसूल अधिकारी यांना उपलब्ध करून दिली आहे त्याचा वापर करून ई हक्क प्रणाली च्या यशस्वी अंमल बजावणी साठी तहसीलदार व प्रांत अधिकारी यांनी नियमित आढावा घ्यावा.
थोडक्यात ई हक्क प्रणालीतून प्राप्त
अर्ज किरकोळ कारणासाठी न नाकारता वेळेत फेरफार घेऊन निर्गत करावेत व असे हत आहे का
ह्याची खात्री तहसीलदार व उप विभागीय अधिकारी यांनी करावी.
सदरच्या सर्व सूचना सर्व तलाठी , मंडळ अधिकारी , नायब तहसीलदार व तहसीलदार
यांचे निदर्शनास आणून द्याव्यात ही विनंती.
आपला स्नेहांकित,
XX
स्वाक्षरीत XX
(रामदास जगताप)
राज्य समन्वयक , ई फेरफार प्रकल्प
प्रत
,
उप विभागीय अधिकारी (सर्व)
तहसीलदार (सर्व) यांना महिती साठी व उचित
कार्यवाही साठी.
Comments