रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

शेतकरी यांना अद्यावत ७/१२ उपलब्ध होण बाबत अत्‍यंत महत्‍वाची सुचना

 शेतकरी यांना अद्यावत ७/१२ उपलब्ध होण बाबत अत्‍यंत महत्‍वाची सुचना 

बॅंक, से.स.सो., पतसंस्‍था व नागरीकांना चालु हंगामाचे पिक पेरा भरलेला डिजीटल स्‍वाक्षरीयुक्‍त उपलब्‍ध करून देणेसाठी सर्व तलाठी यांनी खालीलप्रमाणे कार्यवाही करणे आवश्‍यक आहे.

प्रथम सर्व तलाठी यांनी त्‍यांचे  कडील सर्व गावांचे खरीप, रब्‍बी 2019/2020 चे पेरेपत्रक भरणे आवश्‍यक आहे.
⬇️
त्‍यानंतर OCU आज्ञावलीमध्‍ये गाव निवडुन “सर्व्‍हे क्रमांक Declaration” या पर्यायाचा वापर करून हंगाम / वर्ष निवडून ज्‍या सर्व्‍हे क्रमांकाचे काम झाले आहे अशा सर्व्‍हे क्रमांकांना निवडून निवडलेल्‍या सर्व्‍हे क्रमांकाचे काम संपल्‍याची घोषणा करणे आवश्‍यक आहे. 
⬇️
त्‍यानंतर OCU आज्ञावलीतील काम संपल्‍याची घोषणा केलेले सर्व्‍हे क्रमांक DSD आज्ञावलीत “पिक पाहणी पश्‍चात ७/१२ अभिलेख डिजीटल स्‍वाक्षांकीत करण्‍यास पात्र सर्व्‍हे क्रमांकाचा डॅशबोर्ड” मध्‍ये जाऊन त्‍याठिकाणी उपलब्‍ध सर्व ७/१२ Confirm करणे आवश्‍यक आहे.
⬇️

उक्‍त कार्यवाही केल्‍यानंतरच बॅंक, से.स.सो., पतसंस्‍था व नागरीकांना चालु हंगामाचे पिक पेरा भरलेला डिजीटल स्‍वाक्षरीयुक्‍त उपलब्‍ध होऊ शकेल याची सर्वानी नोंद घ्‍यावी.

 तसेच

ज्‍या सर्व्‍हे क्रमांकावर फेरफार प्रमाणीत झाला किंवा पुढे होइल, असा सर्व्‍हे क्रमांक DSD आज्ञावलीत “फेरफार पश्‍चात ७/१२ अभिलेख डिजीटल स्‍वाक्षांकीत करण्‍यास पात्र सर्व्‍हे क्रमांकाचा डॅशबोर्ड” मध्‍ये  उपलब्‍घ होतील,,  त्‍यामुळे सर्व तलाठी यांनी फेरफार पश्‍चात डिजीटल स्‍वाक्षांकीत करण्‍यास पात्र सर्व्‍हे क्रमांकाचा डॅशबोर्ड मध्‍ये जावून सर्व ७/१२ Confirm करणे आवश्‍यक आहे.

हे न केल्‍यास संबंधीतांना फेरफार प्रमाणीत होणेपुर्वी चे स्थितीताच डिजीटल ७/१२ मिळेल.....

👆🏻याची सर्वांनी नोंद घेवुन

  फेरफार पश्‍चात व पिक पाहणी पश्‍चात (OCU मधील चालु हंगामापर्यंत पिकपहाणी भरून त्‍याची घोषणा करून)   DSD आज्ञावलीत उपलब्‍ध झालेले सर्व ७/१२ DSD आज्ञावलीतून Confirm करण्‍याचे काम करावे..

कृपया सर्व डी बी ओ यांनी सर्व तलाठी तसेच माहितीकरता मंडळ अधिकारी यांना सूचित करावे. ही विनंती
आपला
रामदास जगताप

Comments

Archive

Contact Form

Send