रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

कोरोना संसर्गजन्य साथी मुळे राज्यभर लॉकडाऊन असताना देखील तलाठी मंडळ अधिकारी यांचे ऑनलाईन कामकाज सुरु




नमस्कार मित्रांनो ,


कोरोना संसर्गजन्य साथी मुळे राज्यभर लॉकडाऊन असताना देखील तलाठी मंडळ अधिकारी यांचे ऑनलाईन कामकाज सुरु - महसूल विभागाचा एक स्तुस्त्य उपक्रम .


                 देशाचे पंतप्रधान यांनी घोषित केलेल्या दि.२२ मार्च रोजी च्या जनता कर्फ्यू व त्यांनतर राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दि. २४ मार्च पासून घोषित केलेल्या लॉकडाऊन नंतर या साथी च्या  रोगाचा  प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना जिल्हाधिकारी यांचेकडूनच आदेशित , पर्यावेक्षित व  नियंत्रित केल्याजात असल्याने  च्या क्षेत्रीय स्थरावर ह्याची जबाबदारी संबंधित प्रांताधिकारी , तहसीलदार , तलाठी व मंडळ अधिकारी यांचेवर येते त्यामुळे या अत्यंत महत्वाच्या काळात सर्वच महसूल यंत्रणा या बाबतच्या विविध जबाबदाऱ्या मध्ये व्यस्त होते असे असताना देखील वर्क फ्रॉम होम मुळे ई फेरफार प्रकल्पाचे  ऑनलाईन कामकाज सुरळीत सुरु  असल्याचे दिसून येते .
१. या कालावधीत देखील ई फेरफार प्रकल्पाचे कामकाज सुरळीत सुरु आहे  .
२. जमाबंदी आयुक्त स्वतः झूम मीटिंग च्या माध्यमातून वरिष्ठ स्थरावर मीटिंग घेवून महत्वाचे निर्णय घेत आहेत.
२. राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राची (NIC) संपूर्ण टीम चे देखील कामकाज वर्क फ्रॉम होम द्वारे सुरु आहे.
३. जमाबंदी आयुक्त कार्यालयातील व NIC तील हेल्प डेस्क राज्यातील सर्व तलाठी मंडळ अधिकारी यांना येणाऱ्या अडचणी ऑनलाईन पद्धतीने सोडवत आहेत.
४. राज्यातील ९८% गाव नमुना नं. ७/१२ डिजिटल स्वाक्षरीत झाले असल्याने ते सामान्य जनतेला  महाभूमी  पोर्टल च्या  https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in/DSLR या लिंकवर   ऑनलाईन उपलब्ध होत आहे .
५. या कालावधीत देखील दररोज  सुमारे दिड ते दोन हजार डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ खातेदारांकडून रक्कम रुपये १५/- चा  ऑनलाईन भरणा करून उपलब्ध करून घेत आहेत.
६. ई हक्क प्रणालीचा वापर करून महाभूमी पोर्टल च्या https://pdeigr.maharashtra.gov.in/frmLogin.aspx  या लिंक चा वापर करून   खातेदार  अथवा बँक / वित्तीय संस्था यांना  फेरफार घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करता येत आहे . या २१ दिवसाच्या कालावधीत सुमारे तीन ते चार हजार ऑनलाईन अर्ज तलाठी यांना प्राप्त झाले असून त्यावर प्रक्रिया सुरु आहे. ह्याचा सर्वाधिक  फायदा बँकांना झाल्याचे  दिसून येते.
७. महाभूमी च्या पोर्टल वरून भूलेख https://bhulekh.mahabhumi.gov.in/ या लिंक वरून सुमारे १ लक्ष खातेदार आपला विनास्वाक्षरीत ७/१२ व खाते उतारा प्राप्त करून घेत आहेत.
८.२१ दिवसांच्या या कालावधीत तलाठी मंडळ अधिकारी यांनी सुमारे ५०,००० पेक्षा जास्त फेरफार घेवून निर्गत करण्याचे काम केले आहे.
८. तसेच संगणकीकृत ७/१२ मधील त्रुटी दूर करण्यासाठी कलम १५५ प्रमाणे दुरुस्ती चे कामकाज देखील ज्या ठिकाणी अजून फारसा विषाणू संसर्ग झालेला नाही त्या ठिकाणी चालू आहे.
९. राज्य समन्वयक स्थारावरून शासन , NIC, जमाबंदी आयुक्त कार्यालय, शासनाचा माहिती व तंत्रज्ञान विभाग व अन्य विविध विभाग, बँका,  महसूल अधिकारी, तलाठी मंडळ अधिकारी  व सामान्य वापरकर्ते यांच्यात समन्वय राखुण सर्व ऑनलाईन कामकाज सुरळीत सुरु ठेवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
१०. या कालावधीत देखील दररोज  सुमारे अडीच ते तीन  हजार  तलाठी मंडळ अधिकारी ई फेरफार प्रणाली मध्ये ऑनलाईन कामकाज करत आहेत.
       या कालावधीत ,
१. झूम मिटिंग द्वारे ई चावडी प्रणाली विकसित करताना क्षेत्रीय स्थरावर चालणारे कामकाज व कायदेशीर तरतुदींचा अभ्यास करण्यासाठी डोमेन टीम च्या ऑनलाईन बैठका सुरु आहेत .
२. ३५ जिल्ह्यांपैकी ३१ जिल्ह्यातील सुमारे १०,००० तलाठी  साजा साठी व्हार्चुंअल अकौंट (VAN) तयार करून त्याचे अभिलेख  वितरण प्रणालीत (DDM) मापिंग पूर्ण करण्यात आले असून एप्रिल २०२० पासून ची नक्कल फी बँक ऑफ बडोदा या बँकेत  ऑफलाईन व ऑनलाईन भरण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.
३.मार्च २०२० मध्ये विकसित केलेल्या सुमारे २५/३० नविन सुविधा वापरण्यासाठी उप्लाध करून दिल्या आहेत.
४. भारत नेट अंतर्गत ५११५ ग्राम पंचायतीना जोडणी दिलेल्या इंटरनेट कनेक्शन चा वापर तलाठी मंडळ अधिकारी यांना करता येईल का ? ह्याची देखील खात्री केली जात आहे. त्याची यादी सर्व जिल्हाधिकारी यांना पाठवली आहे .

                           थोडक्यात लॉकडाऊन या कालावधीत देखील महसूल विभागाच्या या  ई फेरफार प्रकल्पामुळे सामान्य जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न निश्चितच स्तुत्य व कौतुकास पात्र ठरत आहे ह्यात शंका नाही .

आपला 
रामदास जगताप date 11.4.2020


Comments

Archive

Contact Form

Send