आदलाबदल व वाटणीपत्र दस्त नोंदणी संदर्भात ई-फेरफार प्रणाली च्या वापराबाबत.
तळमजला, नवीन प्रशासकीय इमारत, विधान भवन समोर, पुणे ०१
दूरध्वनी क्र.020-26123826 फॅक्स क्र.020-26129949
------------------------------------------------------------------------------------------
क्र.का.4/ई-फेरफार/2020/ दिनांक /03/2020
परिपत्रक-
विषय – आदलाबदल व वाटणीपत्र दस्त नोंदणी संदर्भात ई-फेरफार प्रणाली च्या वापराबाबत.
राज्यात गेल्या 2/3 वर्षापासून ई-फेरफार प्रणाली व आय-सरिता प्रणाली चे Integration करण्यात आले
असून, सद्य स्थितीत राज्यात 1. खरेदीपत्र , 2.गहाणखत , 3. बक्षीसपत्र व 4.हक्कासोडपत्र असे चार दस्त्तांची नोंदणी संलग्न प्रणालीचा (Integration) वापर करुन
केली जाते. 7/12 वरुन दस्त करून
देणार्याची माहिती घेवून नोंदणी झालेल्या मिळकतींचा डेटा फेरफार करण्यासाठी ई-फेरफार प्रणालीद्वारे संबंधित तलाठी यांचेकडे पाठवला जातो. सद्य स्थितीत या चार दस्तांबाबत ही कार्यापद्धती लागू आहे. आता आदलाबदल व वाटणीपत्र या दस्तांचा समावेश ई-फेरफार प्रणालीमध्ये करण्यात आला आहे. त्याप्रमाणे इथून पुढे अशा प्रकारचे दस्त नोंदणीस दाखल झाल्यांनतर ई-फेरफार प्रणालीचा अवलंब करण्यात यावा.
(ओमप्रकाश देशमुख)
नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक
महाराष्ट्र राज्य, पुणे.
Comments