एक महिन्यावरील सर्व फेरफार नोंदी निर्गत करणेबाबत
एक महिन्यावरील सर्व फेरफार नोंदी निर्गत करणेबाबत
संदर्भ- 1) शासन परिपत्रक
दिनांक-4/07/2019
2) या
कार्यलायचे पत्र दिनांक -4/03/2020
राज्यभर सुरू असलेल्या ई फेरफर प्रणालीतील कामकाजातील विविध महसूल
कर्मचारी व अधिकारी यांच्या जबाबदार्या संदर्भ क्रं.1 च्या परिपत्रकान्वये
निश्चित करून दिल्या आहेत तरीही आपल्या जिल्ह्यात असंख्य तक्रार नसलेल्या फेरफार
नोंदी प्रलंबित असल्याचे MIS
वरून दिसून येते याबाबत विधिमंडळात देखील चर्चा होते. त्यानुषंगाने ईकडील दिनांक 4/03/2020 च्या
संदर्भ क्रं.2 च्या पत्रान्वये फेरफार अदालती घेण्याबाबत देखील सूचना देण्यात आलेल्या
आहेत.
फेरफार प्रमाणित करण्याच्या
कार्यपद्धतीमध्ये मंडल अधिकारी स्तरावर देखील अनुक्रमणिता (FIFO) लागू करण्यात आला आहे तरीही अनेक तालुक्यातील अनेक गावामध्ये
असंख्य फेरफार प्रमाणित करण्यास उपलब्ध असूनही प्रमाणित केले जात नाहीत असे दिसून
येते याबाबत तालुका,उपविभाग,जिल्हा व विभाग स्तरावर प्रलंबित फेरफारचा ऑनलाइन MIS
वापरुन आढावा घेण्यात यावा व एक महिन्यावरील एकही तक्रार नसेलेली फेरफार नोंद प्रलंबित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. तक्रार
नोंदी निर्गतीची कार्यवाहीदेखील 3 महिन्यात पूर्ण करून सर्व तक्रार नोंदींचे
निकालपत्र https://eqjcourts.gov.in या संकेत स्थळावर अपलोड करण्यात
यावेत याबाबतची कार्यवाही योग्य पद्धतीने होत नसल्यास याची नोंद संबंधितांच्या
गोपनीय अहवालात घेण्यात यावी.
सध्या ई फेरफार प्रणालीतील सर्व
कामकाज ऑनलाईन पद्धतीने MIS द्वारे नियंत्रित करता येते. त्याचा योग्य वापर
करून ई हक्क प्राणिद्वारे प्राप्त ऑनलाईन अर्ज व प्रलंबित फेरफार संख्या नियंत्रित
कण्यात यावी.
आपला ,
रामदास जगताप
30 Dec 2019 LA kheredi dast zala aahe tari ferfar pralambit aahe. Konti hi takrar nahi tari nond zali nahi satbara var. Kay karave sir
ReplyDelete