मोठ्या क्षेत्राचे ७/१२ – अहवाल ३१ दुरुस्त करणे बाबत
प्रति,
डिस्ट्रीक डोमेन एक्सपर्ट तथा
उपजिल्हाधिकारी (सर्व )
विषय – मोठ्या क्षेत्राचे ७/१२ – अहवाल ३१ दुरुस्त करणे बाबत
ई- महाभूमी तथा डिजिटल इंडिया भूमी अभिलेखांचे आधुनिकीकरण कार्यक्रमा अंतर्गत विकसित ई-फेरफार प्रणालीतून अचूक ७/१२ व खाते उतारा मिळण्यासाठी ODC अहवाल १ ते ४१ मधील ७/१२ मध्ये विसंगती निर्माण करणारे अहवाल निरंक करणे आवश्यक आहे त्या पैकी ODC अहवाल ३१ हा एक प्रमुख अहवाल आहे.
अहवाल 31 मध्ये असलेल्या सर्व मोठ्या क्षेत्राचे 7/12 ची जिल्हानिहाय यादी यापूर्वीच सर्वांना पाठविली आहे त्याचे अवलोकन करता त्यामध्ये काही 7/12 खूपच मोठ्या क्षेत्राचे (अवास्तव) तयार झाले आहेत. सदारचे 7/12 प्रथम दुरुस्त करणे आवश्यक आहे ह्याचा आढावा उप विभागीय अधिकारी व तहसिलदार यांनी स्वतः घ्यावा. कित्तेक 7/12 तर लाखो हेक्टर क्षेत्राचे आहेत व ह्याची यादी सर्व उप जिल्हाधिकारी तथा डिस्ट्रीक डोमेन एक्सपर्ट यांना नोव्हेंबर 2018 मध्येच उपलब्ध करून दिली होती . त्याचा आढावा एक वर्षापेक्षा जास्त कालावधी पासून सुरू आहे तरीही त्यातील शिल्लक 7/12 ची संख्या दोन लाखापेक्षा जास्त आहे ह्याचा अर्थ या बाबीकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही हेच स्पष्ट होते. अश्या वाढीव क्षेत्राचे 7/12 चे आधारे क्षेत्र हस्तांतरित झाल्यास होणार्या परिणामांना सर्व संबंधित जबाबदार राहतील ह्याची नोंद घ्यावी . अवास्तव क्षेत्राचे चे आवलोकण होवून उचित कार्यवाही तात्काळ करावी .
अहवाल ३१ मध्ये मोठ्या क्षेत्राचे ७/१२ स.न. दर्शविले जातात जे शेतीचे ७/१२ मध्ये क्षेत्र २० हे.आर. पेक्षा जास्त आहे किंवा ज्या बिनशेती चे ७/१२ मधील क्षेत्र ९९ आर. पेक्षा जास्त नमून आहे असे ७/१२ दर्शविले जातात. असे अहवाल ३१ मध्ये समाविष्ट असेलेले ७/१२ चे एकक व क्षेत्राबाबत हस्तलिखित ७/१२ वरून खात्री करून त्यापैकी काही ७/१२ चे क्षेत्र व एकक योग्य असल्यास असे ७/१२ य तलाठी यांनी तहसीलदार यांना एकदा मान्यता देण्याबाबत ऑनलाईन विनंती करावी. अशी ऑनलाईन विनंती पाहून तहसीलदार यांनी user creation मधून एकदा मान्यता दिल्यास असे सातबारा कितीही मोठ्या क्षेत्राचे असलेतरी ते योग्य समजून अहवाल ३१ मधून कायमस्वरूपी निघून जातील. तथापी जर या ७/१२ वरिल क्षेत्र व एकक अथवा फक्त क्षेत्र किंवा एकक चुकीचे असल्यास कलम १५५ च्या आदेशाने दुरुस्ती सुविधा पैकी क्षेत्र दुरुस्ती या पर्यायातून तलाठी यांनी ऑनलाईन विनंती करावी त्यानंतर तहसीलदार यांनी user creation मधून मान्यता दिल्यास तलाठी यांना दुरस्ती करून परिशिष्ट क तयार करता येईल व असे परिशिष्ट क तहसीलदार यांनी स्वाक्षरीत करून दिल्यास ते पाहून मंडळ अधिकारी फेरफार मंजूर करून ७/१२ दुरुस्त करतील त्यानंतरच असे ७१२ या अहवाल ३१ मधून कमी होतील . अशा पद्धतीने मोठ्या क्षेत्राचे दुरुस्त होई पर्यंत अशा स.न. वर प्रत्येक फेरफार घेण्यासाठी असे स.न. तात्पुरते खुले (unblock) करुन घ्यावे लागतील ह्याची नोंद घ्यावी .
शेती ७/१२ - २० हेक्टर पेक्ष्या मोठे असलेले सर्व्हे क्रमांक व बिनशेती ७/१२ ९९ आर पेक्ष्या मोठे असलेले सर्व्हे क्रमांक (अहवाल-31)
अजूनही राज्यभरात सुमारे ३.१५ लक्ष सातबारा अहवाल ३१ मध्ये आहेत ते प्रथम निरंक करून घ्या अन्यथा या गटांवर फेरफार घेता येणार नाही , दस्त नोंदणी करता येणार नाही तसेच ई पीक पाहणी मधून पीक देखील नोंदविता येणार नाहीये ह्याची नोंद घ्यावी
आपला , रामदास जगताप |
Comments