ई फेरफार प्रणाली मधील वेगवेगळ्या भूधारणा असलेल्या ७/१२ वरील फेरफार नोंदी व दस्त नोंदणी बाबत
ई फेरफार प्रणाली मधील वेगवेगळ्या भूधारणा
असलेल्या ७/१२ वरील फेरफार नोंदी व दस्त नोंदणी बाबत
ई फेरफार प्रणाली मध्ये एकूण च्यार प्रमुख
भूधारणा आहेत
१. भोगवटादार
वर्ग १
२. भोगवटादार
वर्ग २
३. सरकार
४. सरकारी पट्टेदार
भोगवटादार वर्ग १
मध्ये दोन उप प्रकार आहेत कि ज्यावर देखील प्रणालीत जमीन हस्तांतरण व फेरफार
घेण्यावर निर्बंध आहेत १. आदिवशी
खातेदारांच्या वर्ग १ च्या जमिनी , व २. कुळ कायदा कलम ६३ १ (अ) प्रमाणे
खऱ्याखुऱ्या औद्योगिक कारणासाठी खरेदी केलेल्या जमिनी.
भोगवटादार वर्ग २ मध्ये
दिनांक १७ मार्च २०१२ च्या शासन निर्णयान्वये १ ते १४ उप प्रकार आहेत ज्यावर जमीन
हस्तांतरण व फेरफार घेण्यासाठी निर्बंध आहेत.
शासनाचे
दिनांक १७/३/२०१२ चे शासन
परिपत्रकाप्रमाणे गा.न.नं. १( क) मध्ये
सुधारणा करण्यात येऊन धारण जमीनीच्या हस्तांतरणा वरील निर्बंध विचारात घेवुन
भोगवटदार वर्ग २ चे १ ते १४ असे उप
प्रकार करण्यात आलेले आहेत. त्याप्रमाणे हस्तलिखीत गा.न.नं. १ (क) तयार करुन वापरात आणला असेल अशी अपेक्षा आहे. त्यानंतर
७/१२ संगणकीकरणा
मध्ये देखील गा.न.नं. १ (क) मधील भोगवटादार वर्ग २ ने धारण केलेल्या मिळकतीच्या तसेच गा.न.नं. १ (क) मध्ये नसलेल्या मिळकती दस्त नोंदणीसाठी हस्तांतरणाचे संबंधी
फेरफार घेण्यासाठी प्रतिबंधीत करण्यात आल्या आहेत. राज्यात
सध्या सुरु असलेल्या ई-फेरफार प्रणालीतुन अशा सर्व नियंत्रित सत्ताप्रकाराच्या जमीनीवरील
जमीनीच्या हस्तांतरणावर नियंत्रण ठेवलेले आहे. त्याबाबतची
कार्यपध्दती कशी असावी याबाबत खालीलप्रमाणे सुचना देण्यात
येत आहेत.
संगणकीकरणा मध्ये गा.न.नं. १ (क) मधील भोगवटादार वर्ग २ ने धारण
केलेल्या मिळकतीच्या आणि गा.न.नं. १ (क) मध्ये नसलेल्या परंतु वर्ग
१ ने धारण केलेल्या मुळच्या आदिवासींच्या जमिनी व वर्ग १ ने धारण केलेल्या कुळ
कायदा कलम ६३ (१) (अ) प्रमाणे खऱ्याखुऱ्या औदोगिक वापरासाठी खरेदी केलेल्या मात्र
हस्तांतरणावर निर्बंध असलेल्या मिळकती
तसेच सरकार व सरकारी
पट्टेदार म्हणून धारण केलेल्या मिळकतींचे हस्तांतरण दस्त नोंदणीसाठी व हस्तांतरणाचे संबंधी फेरफार घेण्यासाठी
ई-फेरफार प्रणाली मध्ये प्रतिबंधीत करण्यात
आले
आहेत. त्या खालीलप्रमाणे आहेत.
1.भोगवटादार वर्ग १
ने धारण केलेल्या जमिनी-
अ.नं.
|
प्रकार
|
तपशिल
|
1
|
2
|
3
|
1.
|
उप
प्रकार -1
|
आदिवाशी
खातेदार ची वर्ग १ ची जमीन
|
2.
|
उप
प्रकार -2
|
मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम
१९४८ चे कलम ६३अ -१ च्या तरतुदीप्रमाणे खरेदी केलेल्या जमिनी
|
२. भोगवटादार वर्ग २ ने धारण केलेल्या जमिनी-
अ.क्रं.
|
प्रकार
|
तपशिल
|
1
|
2
|
3
|
1
|
उप प्रकार 1
|
कुळ कायदाच्या जमीनी (१)
|
2
|
उप प्रकार 2
|
इनाम व वतन जमीनी (देवस्थान वगळुण) (२)
|
3
|
उप प्रकार 3
|
भूमीहीन/शेतमजुर/स्वातंत्र सैनीकयांना
वाटप जमीनी (३)
|
4
|
उप प्रकार 4
|
गृह निर्माण संस्था/औदोगीक आस्थापना/शैक्षणीक
संस्था यांना वाटप जमीनी (४)
|
5
|
उप प्रकार 5
|
कायद्या अंतर्गत वाटप जमीनी/शेत जमीन
कमाल धारणा (५)
|
6
|
उप प्रकार 6
|
म.न.पा/न.पा/प्राधीकरण/ग्रा.पा.कडे वर्ग
जमीनी (६)
|
7
|
उप प्रकार 7
|
देवस्थान इनाम जमीनी (७)
|
8
|
उप प्रकार 8
|
आदिवासी खातेदारांच्या जमीनी (८)
|
9
|
उप प्रकार 9
|
पुर्नवसन कायद्या अंतर्गत वाटप जमीनी (९)
|
10
|
उप प्रकार 10
|
भाडे पट्ट्याने दिलेल्या शासकीय जमीनी (१०)
|
11
|
उप प्रकार 11
|
भूदान व ग्रामदाण अंतर्गत दिलेल्या
जमीनी (११)
|
12
|
उप प्रकार 12
|
वन व सिलिंग कायदा अंतर्गत चौकशीवर
प्रलंबित जमीनी (१२)
|
13
|
उप प्रकार 13
|
भूमीधारी हक्काने प्राप्त झालेल्या जमीनी (१३)
|
14
|
उप प्रकार 14
|
सिलिंग कायदया अंतर्गत सुट दिलेल्या
जमीनी (१४)
|
२. सरकार
भूधारणा असलेल्या जमिनी -
३. सरकारी
पट्टेदार म्हणून धारण केलेल्या जमिनी-
राज्यात सध्या सुरु असलेल्या ई-फेरफार प्रणालीतुन वरील प्रमाणे सर्व नियंत्रित सत्ताप्रकाराच्या जमीनी वरील जमीनीच्या हस्तांतरणावर नियंत्रण ठेवलेले
आहे. त्याबाबतची कार्यपध्दती कशी असावी याबाबत खालील प्रमाणे सुचना देण्यात येत आहेत.
१. चावडी वाचनाच्या वेळी प्रत्येक गावासाठी नियुक्त केलेल्या महसूल
पालक अधिकाऱ्याने तहसिलदार यांनी प्रमाणीत केलेला हस्तलिखीत गा.न.नं.१(क) (सुधारीत) प्रमाणे सर्व नोंदी संगणकीकृत ७/१२
मध्ये
घेण्यात आल्याचे संगणकीकृत गा.न.नं. १ (क ) तपासुन प्रमाणित केले असतील अशी अपेक्षा
आहे.
२. वरील प्रमाणे जमीन हस्तांतरणावर निर्बंध असलेल्या भोगवटदार वर्ग २ (गा.न.नं. १ क) समवेत
सरकार, सरकारी पट्टेदार म्हणून धारण केलेल्या जमीन मिळकती भोगवटदार वर्ग १ मधील अ) आदिवासी खातेदाराने धारण केलेले वर्ग - १ च्या मिळकती
आणि ब) कुळकायदा कलम ६३(१अ) अन्वये खऱ्याखुऱ्या औदयोगिक वापरासाठी खरेदी
केलेल्या मिळकती दुय्यम निबंधक यांचेकडे दस्त नोंदणीसाठी प्रतिबंधीत करण्यात आल्या आहेत.
३. दुय्यम निबंधक यांची जबाबदारी - अशा ७/१२ वर सदरची मिळकत प्रतिबंधीत सत्ता प्रकार मध्ये असलेने दस्त नोंदणी करताना जिल्हा स्थरावर उप जिल्हाधिकारी
तथा डी.डी.ई. व तालुका स्थरावर तहसीलदार यांचेशी संपर्क
साधावा असा मेसेज आल्यास संबंधीत दुय्यम निबंधक यांनी संभाव्य खरेदी करणार / विक्री व्यवहार करणाऱ्यांना तहसिलदार यांचेशी संपर्क साधणेबाबत कळवावे. या बाबत दुय्यम निबंधक
यांनी त्यांचेकडे दस्त नोंदनिशी संबंधित दस्त लेखनिक किंवा वकील यांना या बाबत सविस्तर मार्गदर्शन
करावे.
४. अशा बाबतील सक्षम अधिकाऱ्यांचे परवानगी आदेश पाहून अथवा शेती कारणासाठी हस्तांतर करणेसाठी अथवा जमीन
तारण ठेवण्यासाठी परवानगीची गरज नाही ह्याची खात्री करून
तहसिलदार हस्तांतरणासाठी सदरचा सर्व्हे नं./ गट नं. आज्ञावलीतुन युजर क्रेयेशन (UC) मधून आपल्या Biometric लॉगीनने तात्पुरता खुला (UNBLOCK) करून देतील. याबाबतची नोंदवही दिनांक १०.३.२०१६ रोजीच्या पत्रात नमुद केल्याप्रमाणे असेल जिल्हा स्थरावर व तालुका स्थरावर ठेवणेत यावी व सदरच्या पत्रातील सुचना डी.डी.ई
व तहसिलदार यांना लागू राहतील.
५. डी.डी.ई. तथा उप जिल्हाधिकारी यांची जबाबदारी - विभागीय आयुक्त व जिल्हा स्थरावर हस्तांतर परवानगी अथवा तारण देण्यासाठीची
परवानगी आदेश दिलेल्या सर्व जमिनीचे सर्वे नं / गट नं चे आदेश पाहून संबंधित जिल्ह्याचे उप
जिल्हाधिकारी तथा डी. डी. ई यांनी असे प्रतीबंधीत स.नं./ग.नं. तात्काळ तात्पुरते खुले (unblock)
करून द्यावेत. त्याच्या नोंदी नोंदी दिनांक १०.३.२०१६ रोजीच्या
नमुन्यातील नोंदवहीत ठेवाव्यात.
६. तहसीलदार यांची जबाबदारी - उप विभागीय अधिकारी व तालुका स्थरावर हस्तांतर परवानगी अथवा तारण
देण्यासाठीची परवानगी आदेश दिलेल्या सर्व जमिनीचे सर्वे नं / गट नं चे आदेश पाहून संबंधित तालुक्याचे तहसीलदार यांनी
आपले Biometric लॉगीनने असे गट न./ स.न. तात्काळ तात्पुरते खुले (unblock) करून द्यावेत व त्याच्या नोंदी दिनांक १०.३.२०१६ प्रमाणे विहीत केलेल्या नोंदवहीत ठेवाव्यात. ज्या ठिकाणी अशा आदेशाची गरज नाही त्याची
खात्री करून तहसीलदार तो सर्वे न / गट नं unblock करून देतील
व तशी नोंद देखील नोंदवहीत ठेवतील .
७. जमीन हस्तांतरणावर निर्बंध असणाऱ्या
मिळकतींच्या हस्तांतरणासाठी परवानगी देण्यास सक्षम असलेल्या अधिकाऱ्याने परवानगी आदेश देताना
त्याची आदेशाची प्रत संबंधीत उपजिल्हाधिकारी /(डी.डी.ई) व तहसिलदार व संबंधीत दुय्यम
निबंधक यांनी प्रतीलीपीत
करावी. तसेच उपजिल्हाधिकारी/ तहसिलदार यांना या आदेशाप्रमाणे हस्तांतरणासाठी हा सर्व्हे नंबर / गट नं. युजर
क्रियेशन मॉडयुलमधून तात्पुरता खुला (Unblock) करावा असे
निर्देश द्यावेत. असा UNBLOCK केलेला
सर्व्हे नंबर / गट नंबर एक दस्त नोंदणी अथवा फेरफार घेई पर्यंतच
unblock राहील. त्यानंतर असा गट / सर्वे
नं पुन्हा block होईल. या मुळे नियंत्रित सत्ता प्रकाराने धारण
केलेल्या जमिनींचे विनापरवाना हस्तांतर व शर्तभंग होण्यास प्रतिबंध बसेल .
८. मंडळ अधिकारी यांची जबाबदारी - अशा
पद्धतीने सर्वे नं / गट नं unblock केला तरी फेरफार
मंजूर करताना आशा परवानगी आदेशाची खात्री करूनच मंडळ अधिकारी यांनी फेरफार निर्गत
करावेत.
९. सरकार ही भूधारणा असलेल्या गाव.न.नं. ७/१२ वर फक्त आदेश व दस्ताऐवज या फेरफार प्रकारातून
तसेच जुना 7/12 बंद करून नविन पोटहिस्स तयार करणे हे फेरफार घेता येतील हयाची नोंद
घ्यावी.
सदरच्या सर्व मार्गदर्शक सूचना डी डी ई
, तहसीलदार . नायब तहसीलदार ( ई फेरफार ) , मंडळ अधिकारी व तलाठी यांचे निदर्शनास
आणाव्यात ही विनंती .
१. भोगवटादार वर्ग १ ( उप प्रकाराशिवाय ) व अहवाल १ व ३ मध्ये नसलेले
७/१२ -- कोणताही फेरफार व दस्त नोंदणी साठी ७/१२ डी डी ई अथवा
तहसीलदार यांनी बंधमुक्त ( UNBLOCK) करण्याची गरज नाही .
२. भोगवटादार वर्ग १ ( उप प्रकाराशिवाय ) व अहवाल १ व ३ मध्ये असलेले परंतु पटीत अहवाल १ व ३ ची (n
times) क्षेत्र विसंगती नसलेले ७/१२ -कोणताही फेरफार व दस्त नोंदणी साठी ७/१२ डी डी ई अथवा
तहसीलदार यांनी बंधमुक्त ( UNBLOCK) करण्याची गरज नाही .
३. भोगवटादार वर्ग १ ( उप प्रकाराशिवाय ) व अहवाल १ मध्ये असलेले परंतु पटीत अहवाल १ ची (n times) क्षेत्र विसंगती असलेले ७/१२ – फक्त अहवाल १ ची दुरुस्ती व कलम १५५ चे फेरफार व खाता दुरुस्ती चे
फेरफार घेण्यासाठी उपलब्ध
४. भोगवटादार वर्ग १ ( उप प्रकाराशिवाय ) व अहवाल ३ मध्ये असलेले परंतु पटीत अहवाल ३ ची (n
times) क्षेत्र विसंगती असलेले ७/१२ – फक्त अहवाल ३ ची दुरुस्ती
करण्याची विनंती तलाठी यांनी ODC मधून करून त्यास तहसीलदार यांनी UC मधून मान्यता
देवून विसंगती दूर केल्याशिवाय कोणताही फेरफार घेण्यासाठी असे ७/१२ उपलब्ध नाहीत.
५. भोगवटादार वर्ग १ ( उपप्रकारासह
) व अहवाल १ मध्ये नसलेले असलेले ७/१२-- कोणताही फेरफार व दस्त
नोंदणी असा ७/१२ डी डी ई अथवा तहसीलदार
यांनी UC मधून बंधमुक्त ( UNBLOCK) केल्या शिवाय होणार नाही. थोडक्यात प्रत्येक
फेरफार किंवा दस्त नोंदणी ला बंधमुक्त करावा लागेल.
६. भोगवटादार वर्ग २ व अहवाल
१ मध्ये असलेले परंतु पटीत अहवाल १ व ३ ची (n
times) क्षेत्र विसंगती नसलेले ७/१२ - कोणताही फेरफार व दस्त नोंदणी साठी ७/१२ डी डी ई अथवा
तहसीलदार यांनी UC मधून बंधमुक्त ( UNBLOCK) करणे आवश्यक आहे. थोडक्यात प्रत्येक
फेरफार किंवा दस्त नोंदणी ला बंधमुक्त करावा लागेल.
७. भोगवटादार वर्ग २ व अहवाल
३ मध्ये पटीत
अहवाल ३ ची (n times) क्षेत्र विसंगती असलेले ७/१२ - कोणताही
फेरफार व दस्त नोंदणी साठी ७/१२ डी डी ई
अथवा तहसीलदार यांनी UC मधून बंधमुक्त ( UNBLOCK) करणे आवश्यक आहे. थोडक्यात
प्रत्येक फेरफार किंवा दस्त नोंदणी ला बंधमुक्त करावा लागेल. अहवाल ३ दुरुस्ती
साठी तलाठी यांनी ODC मधून विनंती करून तहसीलदार यांनी UC मान्यता देल्यानंतर करता
येईल.
८. भोगवटादार वर्ग २ व अहवाल १ मध्ये
असलेले व पटीत अहवाल १ (n
times) क्षेत्र विसंगती असलेले ७/१२ – अहवाल १ मधील विसंगती
दुरुस्त केल्या शिवाय कलम १५५ च्या दुरुस्त्या
, खाता दुरुस्ती व चूक दुरुस्ती शिवाय अन्य कोणताही फेरफार घेता येणार नाही व दस्त नोंदणी करता येणार नाही . अहवाल १ ची दुरुस्ती करताना
नमुना ७ वरील एकूण क्षेत्र व खातेदारांच्या क्षेत्राची बेरीज जुळल्या शिवाय फेरफार
साठवा होणार नाही.
९. भोगवटादार वर्ग २ व अहवाल ३ मध्ये असलेले व पटीत अहवाल ३ (n
times) क्षेत्र विसंगती असलेले ७/१२ – अहवाल ३ मधील विसंगती दुरुस्त करण्यासाठी तलाठी यांनी
ODC मधून केलेली विनंती तहसीलदार यांनी UC मधून मान्य केल्या शिवाय शिवाय अन्य कोणताही
फेरफार घेता येणार नाही व दस्त नोंदणी करता येणार नाही .
१०. भोगवटादार सरकार व अहवाल १ मध्ये नसलेले असलेले ७/१२ – सरकार भूधारणा असलेल्या ७/१२ वर फक्त आदेश व दस्त ऐवज , जुना ७/१२ बंद करून नवीन पोट हिस्सा तयार करणे व
सर्वे नंबर बदलणे हे फेरफार घेण्यासाठी तहसीलदार यांनी आदेशाची प्रत अपलोड करून UC
मधून असे ७/१२ बंधमुक्त करून दिल्यास हे फेरफार घेता येतील . या वर अन्य कोणतेही
फेरफार प्रकार घेता येणार नाहीत.
११. भोगवटादार सरकार व अहवाल १ मध्ये असलेले असलेले परंतु अहवाल १ च्या पटीतील विसंगती नसलेले ७/१२ –
सरकार भूधारणा असलेल्या ७/१२ वर फक्त आदेश व दस्त ऐवज , जुना ७/१२ बंद करून नवीन पोट हिस्सा तयार करणे व
सर्वे नंबर बदलणे हे फेरफार घेण्यासाठी तहसीलदार यांनी आदेशाची प्रत अपलोड करून UC
मधून असे ७/१२ बंधमुक्त करून दिल्यास हे फेरफार घेता येतील . या वर अन्य कोणतेही
फेरफार प्रकार घेता येणार नाहीत.
१२. भोगवटादार सरकार व अहवाल ३ मध्ये
असलेले असलेले परंतु अहवाल ३ च्या पटीतील विसंगती नसलेले ७/१२ – सरकार भूधारणा असलेल्या ७/१२ वर फक्त आदेश व दस्त ऐवज , जुना ७/१२ बंद करून नवीन पोट हिस्सा तयार करणे व
सर्वे नंबर बदलणे हे फेरफार घेण्यासाठी तहसीलदार यांनी आदेशाची प्रत अपलोड करून UC
मधून असे ७/१२ बंधमुक्त करून दिल्यास हे फेरफार घेता येतील . या वर अन्य कोणतेही
फेरफार प्रकार घेता येणार नाहीत.
१३. भोगवटादार सरकार व अहवाल १ मध्ये असलेले असलेले व अहवाल १ च्या पटीतील विसंगती असलेले ७/१२ – सरकार भूधारणा असलेल्या व पटीत अहवाल १ असलेल्या ७/१२ वर कोणतेही फेरफार प्रकार घेता येणार
नाहीत. कलम १५५ च्या दुरुस्ती ची सोय विकाशित केली जात आहे. तलाठी यांना ODC मधून अहवाल १ ची दुरुस्ती ची ऑनलाईन विनंती पाठवून
त्यास तहसीलदार यांनी UC मान्यता दिल्यास अहवाल १ ची दुरुस्ती करता येईल.
१४. भोगवटादार सरकार व अहवाल ३ मध्ये असलेले
असलेले व अहवाल ३ च्या पटीतील विसंगती असलेले ७/१२ – सरकार भूधारणा असलेल्या व पटीत अहवाल ३ असलेल्या ७/१२ वर कोणतेही फेरफार प्रकार घेता येणार
नाहीत. कलम १५५ च्या दुरुस्ती ची सोय विकाशित केली जात आहे. तलाठी यांना ODC मधून अहवाल ३ ची दुरुस्ती ची ऑनलाईन विनंती पाठवून
त्यास तहसीलदार यांनी UC मान्यता दिल्यास अहवाल ३ ची दुरुस्ती करता येईल.
१५. भोगवटादार सरकारी पट्टेदार असल्यास तहसीलदार यांनी UC मधून ७/१२ बंधमुक्त
केल्यास फेरफार घेता येतील.
१६. भोगवटादार भोगवटादार वर्ग १ , वर्ग २ , सरकार अथवा सरकारी पट्टेदार असलेले व मोठ्या क्षेत्राचे (
शेती चे २० हेक्टर वरील व बिनशेती चे ९९ आर पेक्षा मोठे क्षेत्र असलेले ) तथापि
कोणत्याही अहवाला मध्ये नसलेले ७/१२ – तहसीलदार यांनी एकदा परवानगी
देवून ते योग्य क्षेत्राचे असल्याने कायम केल्या शिवाय अथवा क्षेत्र दुरुस्त करून विसंगती दूर
केल्या शिवाय हे ७/१२ सर्व फेरफारासाठी प्रतिबंधित केले आहेत.
१७. भोगवटादार भोगवटादार वर्ग १ , वर्ग २ असलेले व मोठ्या क्षेत्राचे ( शेती चे २० हेक्टर
वरील व बिनशेती चे ९९ आर पेक्षा मोठे क्षेत्र असलेले ) तथापि अहवाल १ मध्ये असलेले
७/१२ – तलाठी यांनी ई फेरफार मधून अहवाल १ मध्ये
असलेल्या व मोठ्या क्षेत्राचे ७/१२ वर दुरुस्ती ची ऑनलाईन विनंती पाठवून त्यास तहसीलदार यांनी विनंती मान्य तलाठी यांन क्षेत्र
दुरुस्त चा फेरफार घेवून विसंगती दूर केल्या शिवाय तसेच भूधारणे संबंधीची बंधमुक्तता
केले नंतर या ७/१२ अन्य सर्व फेरफार घेता येतील .
१८. भोगवटादार भोगवटादार सरकार व सरकारी पट्टेदार असलेले
व मोठ्या क्षेत्राचे ( शेती चे २० हेक्टर वरील व बिनशेती चे ९९ आर पेक्षा मोठे
क्षेत्र असलेले ) तथापि अहवाल १ मध्ये असलेले ७/१२ – तहसीलदार
यांनी UC आदेशाची प्रत अपलोड करून मान्यता दिल्या शिवाय तलाठी यांना अहवाल १ मध्ये असलेल्या व मोठ्या क्षेत्राचे
७/१२ वर दुरुस्ती ची कार्यवाही करता येणार नाही . तलाठी यांनी क्षेत्र दुरुस्त चा
फेरफार घेवून विसंगती दूर केल्या शिवाय या ७/१२ अन्य सर्व फेरफार घेता येतील. सरकार भूधारणा
असलेल्या ७/१२ वर फक्त आदेश व दस्त ऐवज , जुना ७/१२ बंद करून नवीन पोट हिस्सा तयार
करणे व सर्वे नंबर बदलणे फरफार हे फेरफार घेता येतील .
सदरच्या मार्गदर्शक सूचना
बारकाईने समजून घेवून ई फेरफार प्रणालीत कामकाज करणे आवश्यक आहे.
आपला
रामदास जगताप
Nice info sir
ReplyDelete