रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

ई हक्क प्रणालीच्या वापरासाठी प्रचार प्रशिद्धी करणे व प्रलंबित अर्जांची निर्गती विहित कालावधीत करणे.


मार्गदर्शक सुचना क्रं.१३२                                            क्र.रा.भू.- /रा.स./ मा. सु. क्रं.१३२/२०२०
                                                                                      जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि
                                                                                      अभिलेख  (.राज्यपुणे यांचे कार्यालय,
                                                                                     पुणेदिनांक –३.२.२०२०
प्रति
       डिस्ट्रीक डोमेन  एक्सपर्ट तथा
       उपजिल्हाधिकारी    (सर्व)


            विषय  ई हक्क प्रणालीच्या वापरासाठी प्रचार प्रशिद्धी करणे व
            प्रलंबित अर्जांची निर्गती विहित कालावधीत करणे.
     संदर्भ – महसूल व वन विभाग , दि.२८.१.२०२०

                        संदर्भीय शासन निर्णयान्वये शासन स्थरावरून महसूल विभागाची फलनिष्पत्ती क्षेत्र (K.R.A.) निश्चित करणेत आली असून ई फेरफार प्रणाली व गाव नमुना न. ७/१२ चे संगणकीकरण प्रकल्पामध्ये ई हक्क प्रणाली ची यशस्वी अंमलबजावणी हे प्रमुख फलनिष्पत्ती क्षेत्र निश्चित करणेत आले आहे.
              -महाभूमी तथा  डिजिटल इंडिया भूमी अभिलेखांचे आधुनिकीकरण कार्यक्रमा अंतर्गत विकसित ई-फेरफार प्रणालीतून अचूक   ७/१२ व खाते उतारा मिळण्यासाठी ७/१२ चा अचूक डेटाबेस तयार करणे अत्यावश्यक असल्याने व फेरफार नोंदी घेण्याची प्रक्रिया अधिक सुलभ , अचूक व गतिमान करण्यासाठी शासनाने तलाठी कार्यालयात फेरफार नोंदविण्यासाठी करावयाचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करावयासाठी ई हक्क प्रणाली (PDE – Public Data Entry) विकसित करून उपयोगात आणली आहे परंतु अद्याप या प्रणालीची फारशी प्रचार प्रशिद्धी झाली नसल्याने अजून या प्रणालीचा वापर अत्यल्प आहे.  या प्रणालीच्या उपयोगाने खालील फायदे होतील .
१. सामान्य जनतेला कोठूनही केंव्हाही फेरफार घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करता येईल.
२. अर्ज करणाऱ्या व्यक्तीला अर्ज दाखल करताच त्याची पोहोच ऑनलाईन मिळेल व आपल्या अर्जाची सद्यस्थिती ई हक्क प्रणालीतील dashboard वर (https://pdeigr.maharashtra.gov.in)  आणि फेरफाराची सद्यस्थिती आपली चावडीवर ( https://mahabhumi.gov.in/aaplichavdi) पाहता येईल.
३. तलाठी कार्यालयात प्राप्त होणाऱ्या आठ प्रकारच्या ऑनलाईन अर्जांचे रुपांतर तात्काळ व थेट फेरफार मध्ये होणार असल्याने तलाठी यांना फेरफार घेण्यासाठी पुन्हा डेटा एन्ट्री करावी लागणार नसल्याने तलाठी स्थरावर कामाचा ताण कमी होईल.
४.तलाठी कार्यालयात प्राप्त अर्जांचा MIS सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना उपलब्ध होणार असलेने या कामाचा मासिक आढावा घेणे सोपे होईल.
५. कोणत्याही खातेदाराला फेरफार घेण्यासाठी करावयाचा अर्ज दाखल करण्यासाठी तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नसल्याने त्यांचा वेळ, श्रम व पैसा यांची मोठी बचत होईल.
६. ई हक्क प्रणालीत दाखल केलेले अर्ज तलाठी यांना ई फेरफार प्रणाली मध्ये PDE Dashboard मध्ये त्यांना जोडलेल्या कागदपत्रासह उपलब्ध होत असल्याने तसेच अर्जदाराचा पूर्ण पत्ता, मोबाईल नं. व ई मेल आय डी उपलब्ध होणार असलेने  फेरफार तयार केलेनंतर त्यांना नोटीस बजावणे,गरज असल्यास अर्जदाराकडून जादा कागदपत्रांची मागणी करणे हे सुलभ होणार आहे.
७. फेरफार निर्गत करताना मंडळ अधिकारी यांना अर्जदाराने जोडलेली कागदपत्र ऑनलाईन तपासता येतील.
८. जे दस्त नोंदणीकृत आहेत त्यांचा फक्त तपशील दिला तरी ते दस्त अपलोड करण्याची आवश्यकता नाही.

    ई हक्क प्रणाली अशा अनेक प्रकारे सामान्य जनतेच्या हिताची असलेने या प्रणालीची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी या प्रणालीचा जास्तीत जास्त प्रचार व प्रसार करावा. त्यासाठी तालुका स्थरावर व ग्राम स्थरावर खालील प्रमाणे कार्यवाही करावी.
१.     सर्व खातेदार यांना या प्रणालीची माहिती होण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत / गावात विशेष ग्रामसभा, बैठका, मेळावे घेवून या प्रणालीची माहिती द्यावी व फायदे समजावून सांगावेत.
२.     तालुकास्थरावर सर्व बँक प्रतिनिधी व सहकारी सोसायटी चे चेअरमन व सेक्रेटरी यांची बैठक घेवून सर्व नवीन कर्ज पुरवठ्याची किंवा बोजाची नोंद/ गहाणखताची नोंद तसेच पीक कर्ज किंवा ई कराराची फेरफार नोंद शक्यतो ई हक्क प्रणालीतील ऑनलाईन प्राप्त अर्जांचेद्वारेच घेणेत येईल अशी व्यवस्था करावी.
   तालुक्यातील सर्व महा-ईसेवा केंद्र चालक व ग्राम पंचायतीचे संग्राम केंद्र चालक यांची प्रशिक्षण कार्यशाळा घेवून ई हक्क प्रणालीतील कामकाज त्यांचे मार्फत करण्याची शक्यता देखील तपासून पहावी.
३.     आज पर्यंत प्राप्त ऑनलाईन अर्ज तातडीने निर्गत करणेसाठी तलाठी व मंडळ अधिकारी यांनी विशेष मोहीम घ्यावी.
४.     सर्व तहसीलदार व उप विभागीय अधिकारी यांनी ई हक्क प्रणालीचा नियमित आढावा ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने घेण्यात यावा व आपल्या तालुक्यात / उप विभागात ई हक्क प्रणालीची यशस्वी अंमलबजावणी करावी.
     सर्व डी.डी.ई. यांनी खालील नमुन्यात ई हक्क प्रणालीच्या प्रचार व प्रसार करण्यासाठी केलेल्या कार्यवाही चा खालील नमुन्यातील आपला अहवाल दरमहा इकडे सादर करावा.
    
     
अ.न.
तालुक्याचे नाव
एकूण गावे
एकूण ग्रामसभा / बैठका / मेळावे घेतलेली गावे
प्रचार प्रशिद्धी साठी ची कार्यवाही
ई हक्क मध्ये  एकूण प्राप्त अर्ज
ई हक्क मधील एकूण निर्गत अर्ज
एकूण प्रलंबित अर्ज

























                                             
        वरील प्रमाणे अहवाल अहवाल नियमित जमाबंदी आयुक्त कार्यालयात पाठवावा.   .
          सदरच्या मार्गदर्शक सूचना सर्व संबंधितांचे निदर्शनास आणाव्यात ही विनंती
                                                                           


(रामदास जगताप)
राज्य समन्वयकई फेरफार प्रकल्प  
जमाबंदी आयुक्त कार्यालयपुणे

प्रतमा.उपआयुक्त (महसूल) (सर्वयांना माहितीसाठी सादर.
प्रत - अधीक्षक भूमी अभिलेख (सर्वयांना माहितीसाठी व योग्य त्या कार्यवाहीसाठी.
प्रतउपविभागीय अधिकारी-(सर्वयांना माहितीसाठी व योग्य त्या कार्यवाहीसाठी.
प्रततहसिलदार-(सर्वयांना माहितीसाठी व योग्य त्या कार्यवाहीसाठी.
प्रत - उप अधीक्षक भूमी अभिलेख (सर्वयांना माहितीसाठी व योग्य त्या कार्यवाहीसाठी.


Comments

Archive

Contact Form

Send