रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

७/१२ वरील चालू फेरफार क्रमांकापेक्षा मोठे फेरफार क्रमांक दुरुस्त करणे बाबत .


मार्गदर्शक सुचना क्रं.१३१                                        क्र.रा.भू.- /रा.स./ मा. सु. क्रं.१३१/२०२०
                                                                                 जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि
                                                                                 अभिलेख  (.राज्यपुणे यांचे कार्यालय,
                                                                                 पुणेदिनांक   १//२०२०
प्रति
       डिस्ट्रीक डोमेन  एक्सपर्ट तथा
       उपजिल्हाधिकारी    (सर्व)

                    विषय :-  ७/१२ वरील चालू फेरफार क्रमांकापेक्षा मोठे फेरफार क्रमांक दुरुस्त करणे बाबत.

                         -महाभूमी तथा  डिजिटल इंडिया भूमी अभिलेखांचे आधुनिकीकरण कार्यक्रमा अंतर्गत विकसित ई-फेरफार प्रणालीतून अचूक   ७/१२ व खाते उतारा मिळण्यासाठी ODC अहवाल १ ते ४१ मधील ७/१२ मध्ये विसंगती निर्माण करणारे अहवाल निरंक करणे आवश्यक आहे. असे अहवाल निरंक करताना  ७/१२ ची अचूकता तपासताना अश्या ७/१२ वर नमूद असलेला एकही फेरफार क्रमांक वगळला जाऊ नये. तसेच एकही अनावश्यक व संबंधित नसलेला  किंवा चुकीचा फेरफार क्रमांक संगणकीकृत ७/१२ वर येवू नये, हे अपेक्षित आहे. कोणत्याही ७/१२ वर नमुना ७ मध्ये फेरफारा शिवाय कोणताही बदल होत नाही. म्हणून कोणत्याही ७/१२ मधील झालेले सर्व बदल जाणून घेण्यासाठी त्या ७/१२ वर नमूद केलेले फेरफार पहिले जातात. म्हणून कोणत्याही ७/१२ वर कोणत्याही नोंदी समोर नमूद केलेला फेरफार क्रमांक व त्या ७/१२ वरील जुन्या फेरफार क्रमांकाला अनन्यसाधारण महत्व आहे.
                  हस्तलिखित अधिकार अभिलेख जतन करत असताना सामान्यत: कोणत्याही महसूल गावाचा प्रथम तयार केला जाणारा अधिकार अभिलेख तसेच कोणत्याही गावी एकत्रीकरण योजना लागू झाले नंतर तयार होणारा पहिला अधिकार अभिलेख म्हणजेच गाव नमुना नं. ७/१२ भूमी अभिलेख विभाग फेरफार क्रमांक १ ने तयार करतो. तसेच कोणत्याही महसूल गावातून वाडी विभाजन होवून नवीन महसूल गाव तयार होताना देखील त्या गावचा गाव नमुना नं. १ ( आकारबंद ) व गाव नमुना नं. ७/१२ ची पहिली प्रत भूमी अभिलेख विभागाकडूनच (उप अधीक्षक भूमी अभिलेख ) तयार केली जाते. त्यानुसार या नंतर गाव  नमुना नं. ७ मध्ये अनुक्रमे फेरफार घेवूनच बदल नोंदविले जातात. त्यानंतर दर दहा वर्षाने अथवा उप विभागीय अधिकारी यांचेकडील आदेशाने त्यापेक्षा कमी कालावधीत अधिकार अभिलेखांचे पुनर्लेखन करणे आदेशित केले असल्यास असे करताना फक्त खातेदारांच्या व इतर हक्कातील  चालू नोंदी व त्यासमोरील फेरफार क्रमांक नोंदविले जातात. त्या ७/१२ वरील सर्व जुने फेरफार क्रमांक पुनर्लिखित ७/१२ वर जुने फेरफार म्हणून नोंदविले जात असत. अर्थात कोणताही नवीन अधिकार अभिलेख अस्तित्वात आल्यापासून त्यावर झालेले बदल दर्शविण्यासाठी गाव निहाय चढत्या क्रमाने अनुक्रमे फेरफार क्रमांक दिले जातात. त्यामुळे कोणत्याही गावातील  अधिकार अभिलेखामध्ये असलेले फेरफार क्रमांक चढत्या क्रमानेच येणे अपेक्षित आहे. घोषणापत्र १, २ व ३ चे काम करताना असे सर्व फेरफार क्रमांकांची तपासणी करणे अपेक्षित होते. त्यानंतर व काही ठिकाणी काही नोंदी घेताना फेरफार क्रमांक दिला गेला नसल्यास जुने ७/१२ व फेरफाराचे अभिलेख पाहूनच फेरफार क्रमांक दुरुस्त करणे अपेक्षित होते. त्यासाठी  भंडारा जिल्ह्यात तत्कालीन जिल्हाधिकारी, भंडारा यांनी विशेष मोहीम घेवून सर्व नोंदी साठी अचूक फेरफार क्रमांक नमूद करून घेतले होते. मात्र अन्य जिल्ह्यात या बाबी कडे विशेष लक्ष दिले नसल्याचे दिसून येते.  
                    वरील प्रमाणे ७/१२ वरील चालू फेरफार क्रमांकापेक्षा मोठे फेरफार क्रमांक आलेल्या स.नं. ची गावनिहाय माहिती डेटाबेस मधून काढली असता, राज्यात एकूण ३३,३२८ गावामध्ये सुमारे  १४,७४,५११   इतक्या ७/१२ वर मोठ्या क्रमांकाचे फेरफार नमूद असल्याचे दिसून येते. हे अयोग्य व अनावश्यक आहे. त्यामुळे या पुढे अशा ७/१२ वर फेरफार घेताना अडचण निर्माण होवू शकते. कोणत्याही गाव.न.न.७/१२ वर नमूद असलेला हस्तलिखित किंवा संगणकीकृत फेरफार नोंदवही नक्कल देण्यासाठी उपलब्ध असणे आवश्यक आहे म्हणून कोणत्याही गावात असे चालू फेरफार क्रमांका पेक्षा मोठे फेरफार क्रमांक दुरुस्त करणे आवश्यक आहे. त्यासाठी योग्य फेरफार क्रमांक दुरुस्ती करण्यासाठी खात्री करूनच कार्यवाही करणे अपेक्षित आहे . ह्यासाठी जुन्या मूळ हस्तलिखित अधिकार अभिलेखांचे अवलोकन करणे आवश्यक आहे. १. जर दुरुस्ती करणे आवश्यक नसल्यास किंवा शक्य नसल्यास त्याचा निर्णय तहसीलदार यांनी घ्यावा व त्यासाठी असे मोठ्या क्रमांकाचे फेरफार नंबर कायम करण्यासाठी स्वतंत्र सुविधा देनेत येईल . २. जर असा मोठ्या क्रमांकाचा फेरफार नंबर दुरुस्त करणे आवश्यक आहे असे निश्चित केल्यास कलम १५५ च्या आदेशाने फेरफार क्रमांक बदलने या पर्यायातून योग्य  फेरफार क्रमांकाची  दुरुस्ती करणेत यावी.

सोबत - जिल्हा / तालुका  निहाय व गाव निहाय चालू खाते क्रमांकपेक्षा  मोठ्या  फेरफार क्रमांक  
            असलेल्या  स.न. ची यादी जोडली आहे.
                                         सदरच्या मार्गदर्शक सूचना सर्व संबंधितांचे निदर्शनास आणाव्यात, ही विनंती.
                                                                           


(रामदास जगताप)
राज्य समन्वयकई फेरफार प्रकल्प  
जमाबंदी आयुक्त कार्यालयपुणे

प्रतमा.उपआयुक्त (महसूल) (सर्वयांना माहितीसाठी सादर.
प्रत - अधीक्षक भूमी अभिलेख (सर्वयांना माहितीसाठी व योग्य त्या कार्यवाहीसाठी.
प्रतउपविभागीय अधिकारी-(सर्वयांना माहितीसाठी व योग्य त्या कार्यवाहीसाठी.
प्रततहसिलदार-(सर्वयांना माहितीसाठी व योग्य त्या कार्यवाहीसाठी.
प्रत - उप अधीक्षक भूमी अभिलेख (सर्वयांना माहितीसाठी व योग्य त्या कार्यवाहीसाठी.




     



Comments

Archive

Contact Form

Send