ODC मधील दुरूस्ती सुविधा बंद होणार असलेबाबत
नमस्कार मित्रांनो ,
विषय – ODC मधील दुरूस्ती सुविधा बंद होणार असलेबाबत .
संगनकीकृत 7/12 व 8अ च्या
अचूकतेबाबत खात्री करण्यासाठी ओडीसी प्रणाली मध्ये सध्या काही दुरूस्ती सुविधा सुरू
आहेत मात्र त्यासाठी कोणताही फेरफार घेतलाजात नसल्याने असा ओडीसी मधून केलेला बदल डिजिटल
स्वाक्षरीत साठी उपलब्ध होत नाही त्यामुळे असे बदल लवकरच फेरफराद्वारेच करावेत असा
निर्णय घ्यावा लागणार आहे .
खलील दुरुस्त्या सध्या ओडीसी
मधून करता येतात त्यासाठी थोड्याच दिवसात फेरफार घ्यावा लागू शकतो सबब त्यापूर्वी खलील
अहवालातील दुरुस्त्या पूर्ण करण्याची दक्षता घ्यावी .
1. अहवाल ४ : गाव नमुना ७ वरील एकुण क्षेत्र व जिरायत,बागायत,इत्यादी क्षेत्र यांचा मेळ न बसलेले सर्व्हे
2. अहवाल ५
: ७/१२ व
खाता रजिस्टर
मधील खात्यावरील नावांचा फ़रक
3. अहवाल ७ : खाता
रजिस्टर मध्ये
चुकीचे निवडलेले खाता प्रकार.
4.
अहवाल ८
: फ़ेरफ़ार क्र.
नसलेल्या कब्जेदारांची नावे.
5.
अहवाल १५.
निरंक अथवा
- अथवा 0 अथवा
TKN असलेले खाते.
6.
अहवाल १७.
खाता रजीस्टर
मध्ये असलेले
परंतु ७/१२ वर नसलेले
खाते क्रमांक.
7.
अहवाल २७.
खातेदारांचे नाव/नावे निरंक असलेले
खाता - सर्व्हे
क्रमांक.
8. अहवाल ३७.
खातेदारांच्या नावामध्ये स्पेस असल्याने तयार झालेले
डूप्लीकेट.
9. अहवाल ४०. खातामास्टर मध्ये अतिरिक्त नावे असलेल्या खात्यांची
सर्व्हे क्रमांकनिहाय यादी.
10. अहवाल ४१. अहवाल 5- अतिरिक्त
वरील अहवाल तातडीने दुरुस्त करून घ्यावेत .
आपला
रामदास जगताप
दि.17.10.2019
|
Comments