रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

पीक पहाणीच्या नोंदी अद्यावत करणे बाबत महत्वाच्या मार्गदर्शक सुचना


विषय – पीक पहाणीच्या नोंदी अद्यावत करणे बाबत महत्वाच्या           सुचना 

         महाराष्ट्र जमीन महसुल अधिकार अभिलेख नोंदवाह्या ( तयार करणेव सुस्थित ठेवणे ) नियम 1971 चा नियाम 29 अन्वये पिकांची नोंदवही निश्चित केली असून नियम 30 अन्वये पिकांच्या नोंदवहीत नोंदी करण्याची कार्यपद्धती निश्चित करून देण्यात आलेली आहे त्याप्रमाणे प्रत्येक भूमापन क्रमांक किंवा भू-मापन क्रमांकाचा उपविभाग यांच्या संबंधात प्रत्यक्ष निरीक्षण केल्यावर पिकांच्या नोंदवहीत नोंदी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच त्या नोंदीच्या पडताळणी साठी मंडल अधिकारी गावाला भेट देवून चौकशी करून काही नोंदी चुकीच्या आढळून आल्यास नोंदी दुरुस्त करील अशी तरतूद आहे त्याप्रमाणे सुधारणा / सुविधा OCU  प्रणाली मध्ये करण्यात आली असून त्याची परिपूर्ण माहिती  घेवूनच खरीप 2019 या हंगामापासून पिकांच्या नोंदी घेणे आवश्यक आहे त्यासाठी महत्वाच्या सूचना खलील प्रमाणे देण्यात येत आहेत .
1.   प्रत्येक हंगामाची पीक पाहणी त्या त्या हंगामात पीक शेतात उभे असताना करावी.


2.   खरीप 2019 या हंगामापासून पिकांची यादी,झाडांची यादी, लागवडी अयोग्य क्षेत्राचा तापशील,जलसिंचनाची साधने, यांचे राज्यस्थरावर प्रामाणिकरण ( standardization) करून मास्टर यादी तयार केली असल्याने अशी पिके आपल्या तालुक्यासाठी नायब तहसिलदार (डी.बी.ए.) यांनी निवडल्याशिवाय तलाठी यांना उपलब्ध होणार नाहीत.


3.   जुन्या वर्षाची पीक पाहणी कॉपी करण्यासाठी OCUBACKLOG ही लिंक वापरता येईल . ज्या तालुक्याचे फेज 1 चे फक्त काम झाले आहे मात्र फेज 2 चे काम झाले नसल्यास  ( सर्व गावांचे घोषणापत्र 3 व प्रख्यापान आदेश तहसिलदार यांनी काढणे) OCUBACKLOG1 ही लिंक वापरावी.


4.   ई पीक पाहणी चा पथदर्शी  प्रकल्प सुरू असलेल्या 1) बारामती , 2) फुलम्ब्री , 3) वाडा, 4)अचलपुर, 5)दिंडोरी व 6) कामठी या सहा तालुक्यातील  शेतकरी यांनी मोबाइल अॅप द्वारे अपलोड केलेली पिकांची माहिती ई पीक पाहणी प्रणालीद्वारे मान्य अथवा दुरुस्त करून मान्य करणे आवश्यक आहे त्यासाठी चे स्वतंत्र युजर म्यानुयल या पूर्वीच निर्गमीत केले आहे

.
5.   या पुढे कोणत्याही 7/12 वरील हंगामनिहाय पीक पाहणीचे काम पूर्ण झाल्यास त्या 7/12 साठी त्या हंगामासाठी
पीक पहाणीचे काम संपलाची घोषणा करणे आवश्यक राहील.


6.   ज्या सर्व्हे क्रमांकाचे पीक पहाणीचे काम संपलाची घोषणा झाली आहे त्याची पीक पहाणी वा पीक दुरुस्ती करता येणार नाही यांची नोंद घ्यावी.


7.   ज्या सर्व्हे क्रमांकाचे पीक पहाणीचे काम संपलाची घोषणा झाली आहे तो 7/12 डिजिटल स्वाक्षरी करण्यासाठी DSD प्रणालीत तलाठी यांना उपलब्ध राहील .

.   वरील प्रमाणे काम संपल्याची घोषणा केलेले 7/12 फक्त डिजिटल स्वाक्षरीत करता येतील.


9.   OCU प्रणाली मध्ये “ सर्व्हे निहाय पीकपहाणी पूर्ण झाल्याची घोषणाहा नवीन पर्याय उपलब्ध केला . या पर्यायाचा  उपयोग करून सर्व्हे निहाय पीक पहाणी  पूर्ण झाल्याची घोषणा केल्या नंतर DSP मोडूल मध्ये पीकपहाणी डाटा डीजीटल साईन उपलब्ध होईल॰


10. या पुढे एकदा भरून घोषणा करून कायम केलेली पीक पाहणी तलाठी यांना बदलता येणार नाही त्यामुळे चुकीचे पीक पाहणी असलेले चुकीचे 7/12 नजरचुकीने वितरित केले जाण्याची शक्यता नाही.


11. तलाठी यांनी घोषणा करून कायम केलेल्या पीक पाहणीमध्ये चूक झाली आहे असे निदर्शनास आल्यास किंवा खातेदाराने तशी तक्रार केल्यास मंडल अधिकारी संबंधित खातेदारच्या समवेत व पंचांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष स्थळपाहणी करून पिकाचे नाव अथवा क्षेत्र दुरुस्त करू शकतो तशी सुविधा OCU मध्ये देण्यात आलेली आहे .


12. तलाठी यांनी कोणत्याही खातेदारला पेरणी किंवा पीकपेरा प्रमाणपत्र देवू नये फक्त त्याऐवजी पीक पाहणी अद्यावत केलेला 7/12 वितरित करणेत यावा.


13. अनेक भागात क्षेत्रीय भाषेत किंवा बोली भाषेत एकाच पिकांना वेगवेगळी नावे असतात आता शक्यतो राज्यभरात वापरत असलेली पिकांची नावे पीकपाहणी साठी वापरावीत.


14. गोठापड , शेतघरपड, मंदिरपड , मास्जिदपड , दर्गापड , शाळापड, पेट्रोलपंप पड, वस्तीपड, इमारतपड, पडळपड  या सर्वांसाठी इमारत पड हा एकच पड प्रकार वापरावा.


15. सुधारित प्रमाणित विहीर, विंधन विहीर, शेततळे, कालवा,  ही जल सिंचनाची साधने प्रत्येक पिकासाठी दर्शविणेत येतील  

       मात्र प्रत्यक्ष त्या 7/12 तील विहीर , तलाव , विंधन विहीर , असल्यास तसे नमूद करून लागवड अयोग्य क्षेत्र नमूद करावे.   

              वरील सर्व मार्गदर्शक सूचना सर्व तलाठी व मंडल अधिकारी यांचे निदर्शनास आणाव्यात व पीक पहाणीच्या नोंदी अत्यंत काळजीपूर्वक घेणेबाबत सर्व संबंधितांना सूचना द्याव्यात. ही विनंती
 आपला
   (रामदास जगताप)
राज्य समन्वयक ,
जमाबंदी आयुक्त कार्यालय , पुणे
दि. 23.10.2019 

Comments

  1. कृपया संगणकीकृत 7/12 मधील दुरुस्ती करण्यासाठी काही चूक नसताना शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक कमी करावी ही विनंती दुरूस्ती करीता 155 करा खूप पिळवणूक होती लोकांची ते हस्त लिखीत प्रमाणे दुरुस्ती अधिकार तलाठी यांना द्या व लोकांची पिळवणूक कमी करा ही विनंती

    ReplyDelete

Archive

Contact Form

Send