नक्कल फी बँक खात्यात जमा करणे बाबत
नमस्कार मित्रांनो ,
विषय - नक्कल फी बँक खात्यात जमा करणे बाबत
दि ३१.१.२०१९ च्या शासन निर्णयाप्रमाणे ७/१२ , ८ अ व फेरफार च्या नक्कल फी मधील रक्कम रु.५ प्रती प्रत प्रमाणे रक्कम जमाबंदी आयुक्त यांचे नावे असलेल्या खात्यात रोख स्वरुपात भरण्याची व्यवस्था केली आहे त्यासाठी येत असलेल्या अडचणी दूर करणे साठी SBI च्या वतीने सर्व शाखा व्यवस्थापक यांना दि १०.१०.२०१९ च्या लेखी परिपत्रकान्वये सूचना देणेत आल्या आहेत .
सर्व तलाठी यांनी आप्याकडील माहे सप्टे २०१९ अखेर ची संपूर्ण रक्कम खात्यावर भरावी .
आज पासून अभिलेख वितरण प्रणालीतून ( DDM) चलन / जमा पावती तयार होण्याच्या सुविधेत सुधारणा करणेत आली असून जुन्या पावत्यांची पुन्हा पुन्हा पावती तय्यार केल्यास पावतीवर येणारी तळटीप काढून टाकली आहे ह्याची नोंद घ्यावी
सदरच्या सर्व सूचना सर्व संबंधित तलाठी यांचे निदर्शनास आणाव्यात ही विनंती .
आपला
रामदास जगताप
दि १०.१०.२०१९
DBA यांना स्वतःहून साझे DDM मध्ये नोंदणी करण्यास सांगावे ही नम्र विनंती
ReplyDelete