विविध बँका, सहकारी सोसायट्या ,पतसंस्था व खातेदार यांनी तलाठी कार्यालयाकडे ऑनलाईन फेरफार अर्ज दाखल करणेसाठी “ ई हक्क ” प्रणाली चा वापर करणे बाबत .
विषय - विविध बँका, सहकारी सोसायट्या ,पतसंस्था व खातेदार
यांनी तलाठी कार्यालयाकडे ऑनलाईन फेरफार अर्ज दाखल करणेसाठी “ ई हक्क ” प्रणाली चा वापर
करणे बाबत .
डिजिटल इंडिया भूमी
अभिलेखांचे आधुनिकीकरण ( DILRMP) अंतर्गत सध्या राज्यभर
कार्यान्वित असलेल्या ई-फेरफार प्रकल्पाला पूरक एक नवीन प्रणाली जमाबंदी आयुक्त, पुणे कार्यालयाच्या वतीने ई-हक्क प्रणाली या नावाने ( PDE -Public Data Entry ) विकसित केली आहे. या प्रणाली द्वारे कोणत्याही खातेदाराला /
संबंधित व्यक्तीला, बॅंका , सहकारी सोसायट्या आणि पतसंस्था यांना
तलाठी कार्यालयाकडे हक्काचे हस्तांतर अथवा कर्ज बोजाच्या नोंदी ७/१२ वर फेरफारच्या स्वरुपात घेण्यासाठी ऑनलाईन
पद्धतीने अर्ज दाखल करता येतील. यामध्ये सध्या पहिल्या
टप्प्यात १. इकरार २. बोजा चढविणे/गहाणखत
३. बोजा कमी करणे , ४.वारस नोंद ,
५. मयताचे नाव कमी करणे ६. अ.पा.क.
शेरा कमी करणे. ७. ए.कु.में.नोंद कमी करणे ८. विश्वस्थांचे नाव बदलणे व
९.
संगणकीकृत ७/१२ मधील चूक दुरुस्ती
करण्यासाठी अर्ज असे एकुण नऊ प्रकारचे फेरफार अर्ज
दाखल करता येतील अशी प्रणाली कार्यान्वित करणेत आली आहे. या प्रणालीचा वापर खातेदार यांचेसह बॅंका , सहकारी सोसायट्या व पतसंस्था यांना देखील करता येईल.
1)
कर्ज बोजा दाखल करणे व कमी करणे.
विविध बँका, सहकारी सोसायट्या व पतसंस्था यांचेकडून खातेदार कर्ज घेतात व
त्याच्या नोंदी जसे बोजा दाखल करणे, बोजा कमी करणे आणि इकरार या स्वरुपात ७/१२ च्या इतर हक्कात घेतल्या जाता. या नोंदी घेण्याकरीता ऑनलाईन
पद्धतीने अर्ज दाखल करता यावेत,
याकरीता ई-हक्क
प्रणाली या नावाने ( PDE
- Public Data Entry ) आज्ञावली विकसित केली आहे. यात बँक प्रतिनिधी यांना बोजा दाखल करणे, बोजा कमी करणे या दोन फेरफार प्रकारासाठी ऑनलाईन अर्ज या अज्ञावालीतून भरण्यासाठी संबंधितांनी https://pdeigr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करणे
आवश्यक आहे. व त्यासाठी पूर्ण नाव , पत्ता , मोबाइल नंबर , ई मेल आय डी व PAN कार्ड नंबर इत्यादी माहिती द्यावी लागेल व आपला युजर आयडी व पासवर्ड एकदा तयार
करावा लागेल . तयार केलेला युजर आयडी व
पासवर्ड जतन करून ठेवावा लागेल व तो प्रत्येकवेळी लॉगीन करण्यासाठी वापरावा लागेल. यात बँक
प्रतिनिधी व सोसायटीचे सचिव यांनी प्रत्येक फेरफाराची माहिती भरताना अर्जदाराची माहिती
मध्ये ७/१२ मधील नावाप्रमाणे
योग्य ते नाव भरावे, त्याचा इमेल आयडी उपलब्ध असल्यास भरावा तसेच खातेदाराचा चालू स्थितीतील मोबाईल
क्रमांक देखील भरावा त्यावर त्या व्यक्तीला अर्जाच्या प्रत्येक स्थितीचा SMS प्राप्त होणार असल्याने तो
अचूक असावा.
2)
सोसायटी कर्जाचे ई-करार नोंदी करणे.
विविध कार्यकारी सेवा
सहकारी सोसायटीकडून शेतकरी खातेदारांना पीक कर्जाचे ई-करार
प्रमाणे वाटप केले जाते. या ई-करारच्या
नोंदी साठी ऑनलाईन अर्ज दाखल करताच शेतकऱ्यांने सोसायटी सोबत केलेल्या ई-कराररची नोंद गा.न.नं.7/12
च्या इतर हक्कात घेता येईल. आत अशी नोंद करण्यासाठी
सोसायटीचे सचिवांना खातेदारांचे वतीने या प्रणालीतून ऑनलाईन अर्ज तलाठयाकडे करता
येईल व त्यासोबत ई-कराराची प्रत स्कॅन करून
अपलोड केल्यास अशा ई-फेरफाराची नोंद ई-फेरफार प्रणालीतून तलाठी स्थरावर
घेतली जाईल व याबाबत खातेदाराला व हितसंबधीत व्यक्तीला नमुना 9 प्रमाणे नोटीस काढली जाईल. रितसर नोटीस कालावधी संपल्यानंतर मंडळ अधिकारी अशी नोंद ऑनलाईनच प्रमाणीत करतील.
या ऑनलाईन अर्जाच्या प्रतीसह पोहोच त्याच्या
अर्जाच्या संकेतांक क्रमांकासह (Aplicatiopn ID) मिळेल.
त्याचे आधारे अर्जदार संस्था / व्यक्तीला आपल्या अर्जाची
स्थिती आपल्या लॉगीनने ई-हक्क प्रणालीच्या DASHBOARD वर केंव्हाही पाहता येईल. अशा फेरफार प्रकारासाठी
कोणती कागदपत्र जोडावी लागतील त्यांचे यादी प्रणाली मध्येच देणेत आली असून, ही कागदपत्रे स्कॅन करून (स्वयं साक्षांकित प्रत ) अर्जा सोबत पीडीएफ स्वरुपात अपलोड करणे
आवश्यक राहील. अर्जासोबत अर्जदाराचे कोणतेही ओळखपत्र /आधारकार्ड ची प्रत अपलोड
करावी. तद्नंतर असा अर्ज तलाठी लॉगिनला
फेरफार घेण्याकरिता उपलब्ध होईल. तलाठी सदर अर्ज तपासून फेरफार घेणेसाठी स्विाकरले अथवा
कागदपत्रे अपुरी असल्यास वा योग्य पद्धतीत अर्ज नसल्यास कारण देऊन अर्ज नाकारेल.
स्विकारलेल्या अर्जा प्रमाणे ई-फेरफार प्रणालीतून फेरफार तयार करून कलम-150 अन्वये संबधीत जमीन खातेदार
व हितसंबधीत यांना नोटीस काढुन त्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी देण्यात येईल. व 15 दिवसांच्या
नोटीस कालावधीत हरकत न आल्यास नोंद निर्गत करण्याची कार्यवाही देखील ऑनलाईन
पध्दतीने मंडळ अधिकारी यांचे मार्फत करण्यात येईल.
वरील प्रमाणे सर्व बँक व पतसंस्था, सहकारी सोसायटी अथवा अन्य वितरीत संस्था
यांना फेरफार, बोजा कमी करणे व ई-करार हे प्रमुख फेरफार
प्रकार घेण्यासाठी या प्रणालीचा वापर करावा यासाठी तहसिलदार यांनी त्यांचे
स्थरावर सोसायटी पतसंस्था, बँका अथवा अन्य वित्तिय संस्था यांना प्रशिक्षण देऊन व येणाऱ्या स्थानिक अडचणी
सोडवून ई-हक्क प्रणालीचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी
प्रयत्न करावेत. तसेच ई-हक्क प्रणालीतून दाखल, स्विकृत नाकरलेल्या व प्रलंबित अर्जाचा MIS च्या आधारे तहसिलदार यांनी नियमीत आढावा घ्यावा. तलाठी स्थरावर प्राप्त अर्ज PDE - DASH BOARD या ई-फेर फार प्रणालीतील पर्यायातून पाहून पुढील कार्यवाही 7 दिवसांचे आत करतील. सदरच्या सुचना राज्यस्तरीय
बँकर्स कमीटीने (SLBC) यांनी सर्व बँक सभासदांना उपलब्ध करून द्याव्यात. तसेच अशा प्राप्त अर्जा बाबतचा MIS अहवाल उपलब्ध करून देण्यात
आलेला आहे. तरी तहसिलदार यांनी आपल्या तालुक्यातील कामाचा नियमित
आढावा घ्यावा व ई-हक्क मधील कोणताही अर्ज एक
महिन्यापेक्षा जास्त कालावधीकरीता प्रलंबित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी.
रामदास जगताप
दि 5.9.2019
सदर प्रणाली मध्ये वारस नोंदी चा १ दा अर्ज केल्यानंतर दुसऱ्या वेळेला सदरची Tab open होत नाही
ReplyDeletesir are these corrections rule applicable to online transactions only????
ReplyDelete