रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

मोठ्या क्षेत्राचे ७/१२ वर फेरफार घेण्यासाठी तहसीलदार यांची अनुमती घेणे बाबत



नमस्कार मित्रांनो , 

विषय - मोठ्या क्षेत्राचे ७/१२ वर फेरफार घेण्यासाठी तहसीलदार यांची अनुमती घेणे बाबत (ODC अहवाल ३१ ) 


      ७/१२ संगणकीकरण करताना काही ७/१२ वरील क्षेत्र  भरताना व एकक निवडताना  झालेल्या चुका तसेच काही ठिकाणी ई फेरफार प्रणालीतून क्षेत्र रुपांतरीत करताना कार्यपद्धती व्यवस्थित लक्षात न आलेने राज्यातील अनेक जिल्ह्यात २० हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्राचे शेतीचे ७/१२ व ९९ आर पेक्षा जास्त क्षेत्राचे ७/१२ काही गावात असलेचे दिसून येतात . काही जिल्ह्यात तर लाखो हेक्टर क्षेत्र असलेले ७/१२ आढळून आले होते म्हणूनच odc मध्ये त्यासाठी अहवाल ३१ देण्यात आला आहे . 

   असे मोठ्याक्षेत्राचे ७/१२ चे प्रत्यक्ष क्षेत्र व एकक पाहून खात्री केली असता ते क्षेत्र व एकक योग्य असल्यास असे ७/१२ फेरफार घेण्यासाठी एकदाच तहसीलदार यांचे कडून कन्फर्म करून घेतल्यास असा ७/१२ कितीही क्षेत्राचा असलातरी त्यावर फेरफार घेण्यासाठी अथवा अन्य कोणत्याही कामासाठी अश्या ७/१२ वर एरर येणार नाही अथवा तो पुन्हा कान्फर्म करण्याची आवश्यकता असणार नाही . तसेच काही ७/१२ वरील क्षेत्र व एकक दुरुस्त करण्यासाठी कलम १५५ अथवा ई फेरफार मधून फेरफार घेवून दुरुस्ती करावी . काही ७/१२ वर १०० किंवा २०० हेक्टर सुद्दा क्षेत्र असू शकते उदा , वन जमीन , कारखाना जमीन , गायरान जमीन किंवा धरण / तलाव , कालवा इत्यादी चे ७/१२ . मोठ्या क्षेत्राचे असल्यास ते तहसीलदार यांचे कडून एकदाच कन्फर्म करून घेतल्यास पुन्हा या बाबत विचारणा होणार नाही . 

   या साठी ऑनलाईन विनंती तलाठी यांनी तहसीलदार यांना केली तरीही काही ठिकाणी असे ७/१२ कन्फर्म करण्यासाठी तहसीलदार लोगिन ला उपलब्ध होत नाहीत त्यासाठी आज पासून नवीन सुधारणा केली असून ती स्वतंत्र URL वर टेस्टिंग साठी खालील लिंक वर उपलब्ध करून दिली आहे .

https://mahaferfarnas.enlightcloud.com/eferfar2beta


 कृपया वापरून पहा व आपला अभिप्राय कळवावा .

Sir

Few places have reported that Large 7/12 - Request for Permission - Dashboard not loading is not working. For this we have changed flow to permit 7/12 on selection of each survey. So avoided all dashboard from loading and this will work faster and for all cases

Pl see attached user manual and ask concerned usres to try out the new site @


या बाबतची प्रक्रिया आपल्याला समजावावी म्हणून त्याचे युजर MANUAL द्खील पाठविनेत येत आहे ,   सदरच्या सूचना सर्व तलाठी व मंडळ अधिकारी यांचे निदर्शनास आणाव्यात हि विनंती .



आपला 

रामदास जगताप 
दि . ४,९,२०१९ 

Comments

Archive

Contact Form

Send