जुन्या खात्यातून नवीन खाते तयार करण्याची सोपी सुविधा बाबत.
मार्गदर्शक सुचना क्रं.
109 क्र.रा.भू.4/मा.सुचना क्रं./109/2019
जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि
अभिलेख (म.राज्य) पुणे यांचे कार्यालय,
पुणे, दिनांक ३ /09/2019
प्रति,
डिस्ट्रीक डोमेन एक्सपर्ट तथा
उपजिल्हाधिकारी (सर्व)
विषय -
जुन्या खात्यातून नवीन खाते तयार करण्याची सोपी सुविधा बाबत.
आपल्याला ई-फेरफार प्रणाली मध्ये काम करताना अनेक वेळा नवीन खाते तयार करावे लागते, तरच एखाद्या फेरफारचा योग्य अंमल आपण ७/१२ वर घेवू
शक्तो व त्यासाठी खूप वेळ खर्च होतो.
तसेच नावाचे स्पेलिंग चुकीचे झाल्यास अनेक वेळा अडचणी निर्माण होतात. म्हणून तलाठी यांचे विनंती प्रमाणे एखादे खाते तयार
करण्याची सोपी पद्धती विकसित करून/आकारून दिनांक 21.08.2019 पासून सर्वांना वापर करणेसाठी उपलब्ध करून दिली
आहे. यामध्ये या पूर्वी अस्तित्वात असलेल्या खात्यातून नवीन
खाते तयार करता येत असल्याने, काम अचूक व गतीने काम होण्यास
निश्चित मदत होणार आहे.
ही सुविधा ई-फेरफार प्रणाली मध्ये मेनूमध्ये इतर यापर्याय मध्ये दिली आहे. त्यामध्ये खात्या संबंधी माहिती बटन क्लिक केल्यास, तेथे नवीन खाते तयार करणे असा पर्याय आहे. तो वापरून आपण जुने खाते नंबर निवडून त्यातील काही नावे नष्ट करून अथवा काही नावे नवीन खात्यातून समाविष्ट करून व योग्य खाते प्रकार निवडून अत्यंत कमी वेळात अचूक खाते तयार करू शकतो. या मुळे नवीन खाते तयार होताना होणाऱ्या चुका होणार नाहीत, यात शंका नाही. या बाबतची कार्यपद्धती स्पष्ट करणारे युजर मॅन्युअल सोबत जोडले आहे. सदरच्या सूचना सर्व संबधीतांना तलाठी/मंडळ अधिकारी यांच्या निर्दशनास आणव्यात, ही विनंती.
(रामदास जगताप)
राज्य समन्वयक, रा.भू.अ.आ.का.
जमाबंदी आयुक्त कार्यालय, पुणे
प्रत- मा.उपआयुक्त (महसूल) (सर्व) यांना माहितीसाठी सादर.
प्रत- उपविभागीय अधिकारी-(सर्व) यांना
माहितीसाठी अग्रेषीत.
प्रत- तहसिलदार-(सर्व) यांना
माहितीसाठी रवाना.
R Sir,
ReplyDeletePlease attach user manual.