अभिलेख वितरण प्रणाली (DDM) मधील वितरित 7/12 , फेरफार व खातेउतार्यांची नक्कल फी बँक खात्यावर जमा करणे बाबत.
अभिलेख
वितरण प्रणाली (DDM) मधील वितरित 7/12 , फेरफार व खातेउतार्यांची
नक्कल फी बँक खात्यावर जमा करणे बाबत.
मार्गदर्शक सुचना क्रं.110 क्र.रा.भू.-4/मार्गदर्शक
सुचना क्रं.110/2019
जमाबंदी आयुक्त आणि
संचालक भूमि
अभिलेख (म.राज्य)
पुणे यांचे कार्यालय,
पुणे, दिनांक 03/09/2019
प्रति,
डिस्ट्रीक डोमेन एक्सपर्ट तथा
उपजिल्हाधिकारी (सर्व)
विषय - अभिलेख वितरण प्रणाली (DDM) मधून वितरित केलेल्या अभिलेखांच्या
नक्कल फी
बँक खात्यावर जमा
करणे बाबत.
ई-फेरफार प्रकल्पा अंतर्गत
संगणकीकृत केलेले अधिकार अभिलेख तलाठी स्थरवरुन वितरित करणेसाठी विकसित केलेल्या
अभिलेख वितरण प्रणाली (DDM) मधून वितरित केलेल्या अभिलेखांच्या नक्कल फी पैकी दिनाक 29/01/2019 च्या
शासन निर्णयाप्रमाणे महाभूमी प्रकल्प व्यवस्थापन संस्थेचा हिस्सा ( 5 रुपये प्रमाणे
) जमाबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख ( म.राज्य), पुणे
यांचे नावे असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया ट्रेजरी शाखा, पुणे
येथे असलेल्या बँक खाते नं. 38306827364 (IFSC code - SBIN0001904) वर जमा करणे आवश्यक आहे.
आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात DDM मधून वितरीत केलेल्या ७/१२ , फेरफार व खातेउतारे नकलांची
रुपये पाच (५) प्रमाणे होणारी रक्कम (महाभूमी संस्थेचा हिस्सा) जमाबंदी आयुक्त,
पुणे यांचे नावे असलेल्या स्टेट बँकेच्या खाते मध्ये सर्व तलाठी यांनी जमा केली
असल्याची खात्री करावी. खात्यावर रक्कम जमा होतानाची अडचण दूर केली असून, काही
अडचण आल्यास बँकेतूनच स्टेट बँक ऑफ इंडियाचे समन्वयक
श्री. मिलिंद गडकरी साहेब (CELL No.7769867998) यांना
फोन करावा. सोबत माहे/ऑगस्ट 2019 अखेरचा जमा करावयाच्या रकमेचा तपशील जोडला आहे. गाव निहाय / साजा निहाय अहवाल MIS मध्ये देखील उपलब्ध
आहे. त्याप्रमाणे माहे मार्च / एप्रिल 2019
पासून ( आपला जिल्हा ESDS CLOUD वर स्थलांतरीत झाले पासून ) व त्यापुर्वीची 01/02/2019 पासुनची हस्तलिखित
नोंदवही प्रमाणे तलाठी स्तरावर जमा झालेली नक्कल फी कोणत्याही परिस्थितीत दिनांक
10/09/2019 पूर्वी बँक खात्यावर जमा करावी व तहसिलदार यांनी अशी रक्कम जमा झाल्याचा
ताळमेळ घेवून आपला अहवाल उप जिल्हाधिकारी तथा डी.डी.ई. यांना सादर करावा व
डी.डी.ई. यांनी आपला अहवाल जमाबंदी आयुक्त, पुणे कार्यालयाला सादर करावा. तरी आपल्या जिल्ह्यातील सर्व रक्कम जमा करून पूर्तता
अहवाल पाठवावा, ही विनंती.
(रामदास जगताप)
राज्य समन्वयक, रा.भू.अ.आ.का.
जमाबंदी आयुक्त कार्यालय, पुणे
प्रत- मा.उपआयुक्त (महसूल) (सर्व) यांना माहितीसाठी सादर.
प्रत- उपविभागीय अधिकारी-(सर्व) यांना
माहितीसाठी अग्रेषीत.
Comments