पेमेंट गेटवेद्वारे डिजिटल स्वाक्षरीत 7/12 उपलब्ध जनतेसाठी खुला
पेमेंट गेटवेद्वारे डिजिटल स्वाक्षरीत 7/12 उपलब्ध जनतेसाठी खुला
आज दिनांक 20/09/2019
एक संकल्पपूर्तीचा
दिवस आहे . मी अनेक दिवसापूर्वी पाहिलेले स्वप्न आज प्रत्यक्षात उतरत आहे . मनस्वी
आनंद आहे , समाधान आहे , संकल्पपूर्तीचा.
शासनाचे
मान्यतेने व निर्देशाप्रमाणे आज पासून राज्यातील जनतेला 1 कोटी 67 लाख डिजीटल
स्वाक्षरीत गा.न.नं.7/12 महाभूमी पोर्टलवरून (https://mahabhumi.gov.in) ऑनलाईन पेमेंट भरून डाऊनलोड करण्यासाठी खुले करून देण्यात आले
आहे.
गेल्या अनेक
वर्षापासून अचूक संगणकीकृत 7/12 व 8अ तयार करण्यासाठी
महसूल विभागातील तलाठी व मंडळ अधिकारी, नायब तहसिलदार व तहसिलदार यांचेसह सर्वच
महसूल अधिकारी अहोरात्र काम करत आहेत त्या ई-फेरफार प्रकल्पाचे
काम अंतिम टप्यात असून राज्यातील 2 कोटी 51 लक्ष 7/12 पैकी 1 कोटी 67 लक्ष गाव नमुना नं. 7/12 डिजिटल स्वाक्षरीत
करण्याचे काम पुर्ण झाले असून, ते आज पासून राज्यातील जनतेला पेमेंट गेटवे द्वारे उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
राज्य शासनाच्या महसूल विभागाचे
दिशानिर्देशान्वाये राष्ट्रीय सुचना
विज्ञान केंद्र पुणे ( NIC) यांचे मदतीने जमाबंदी आयुक्त कार्यालयाने महाभूमी
पोर्टल ची निर्मिती केली असून https://mahabhumi.gov.in या
पोर्टलची निर्मिती डिजिटल इंडिया मिशन अंतर्गत राष्ट्रीय भूमी अभिलेखांचे
आधुनिकीकरण कार्यक्रमाअंतर्गत अनेक अडथळे पार करत सुरु असलेला ई फेरफार प्रकल्प
अंतिम टप्प्यात आहे . या अंतर्गत राज्यातील २ कोटी ५१ लक्ष गाव नमुना नं ७/१२ चे
संगणकीकरण पूर्ण केलेअसून सदरचे सर्व ७/१२ राज्याचे भूलेख संकेतस्थळावर ( विना
स्वाक्षरीत स्वरूपात ) उपलब्ध आहेत . तथापि हे विनास्वक्षारीत ७/१२ फक्त
माहितीसाठी असल्याने ते कोणत्याही शासकीय किंवा कायदेशीर कामासाठी ग्राह्य धरले
जात नाही . त्यामुळे राज्य शासनाने डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ जनतेला उपलब्ध करून
देण्याचा मानस व्यक्त केला होता व त्याप्रमाणे १ मे ,२०१८ रोजी मा. मुख्यमंत्री
महोदय यांचे शुभ हस्ते व मा. महसूल मंत्री
महोदयांचे उपस्थितीत डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ च्या सेवेचा शुभारंभ करणेत आला होतां
तथपी क्लाऊड पोलिसी नंतर आलेले अडथळे पार करत ई फेरफार प्रकल्प आत्ता अंतिम
टप्प्याकडे वाटचाल करत आहे .
यां अंतर्गत सुरु असलेल्या अनेक सुविधांपैकी
डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ आज पासून पेमेंट गेटवे चा वापर करून जनतेला खुला करून
देनेत आला आहे .
डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ ची वैशिष्ट्ये ----
६.
डिजिटल
स्वाक्षरीत गाव.नमुना.नं. ७/१२ ची नक्कल फी फक्त 15 रुपये प्रती ७/१२ शासनाने
निश्चित केली आहे .
रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्हे वगळता अन्य
जिल्हयातील काम 80 ते 85 % पूर्ण
झाले असून आत्ता लवकरच त्याजिल्ह्यातील
देखील 7/12 डिजिटल स्वाक्षरीने
जनतेला उपलब्ध होणार आहेत. राष्ट्रीय सुचना विज्ञान केंद्र, पुणे (NIC,
Pune ) यांनी
विकसीत केलेल्या महाभूमी या पोर्टलवर स्टेट बँक ऑफ इंडियाचा पेंमेट गेटवे वापरून नक्कल फी कोणत्याही व्यक्तीला ऑनलाईन डिजिटल पेमेंट भरून असा डिजिटल
स्वाक्षरीत 7/12 प्राप्त करून घेता येईल.
MANY THINGS DONE AND MANY MORE TO BE DONE !
https://mahabhumi.gov.in
महाभूमी पोर्टल - महसूल विभाग
रामदास जगताप
दि २०.९.२०१९
(रामदास जगताप)
उपजिल्हाधिकारी तथा राज्य
समन्वयक
ई फेरफार प्रकल्प , जमाबंदी आयुक्त कार्यालय ,
पुणे
Excellent work, Sir.
ReplyDeleteBest work
ReplyDeleteBest work
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
DeleteCongratulations Sir...
ReplyDelete