रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

पेमेंट गेटवेद्वारे डिजिटल स्वाक्षरीत 7/12 उपलब्ध जनतेसाठी खुला


पेमेंट गेटवेद्वारे डिजिटल स्वाक्षरीत 7/12 उपलब्ध जनतेसाठी खुला

                            आज दिनांक 20/09/2019  एक संकल्पपूर्तीचा दिवस आहे . मी अनेक दिवसापूर्वी पाहिलेले स्वप्न आज प्रत्यक्षात उतरत आहे . मनस्वी आनंद आहे , समाधान आहे , संकल्पपूर्तीचा.

शासनाचे मान्यतेने व निर्देशाप्रमाणे आज पासून राज्यातील जनतेला 1 कोटी 67 लाख डिजीटल स्वाक्षरीत गा..नं.7/12  महाभूमी पोर्टलवरून (https://mahabhumi.gov.in) ऑनलाईन पेमेंट भरून डाऊनलोड करण्यासाठी खुले करून देण्यात आले आहे.
                            गेल्या अनेक वर्षापासून अचूक संगणकीकृत 7/12 8अ तयार करण्यासाठी महसूल विभागातील तलाठी व मंडळ अधिकारी, नायब तहसिलदार व तहसिलदार यांचेस‍ह सर्वच महसूल अधिकारी अहोरात्र  काम करत आहेत त्या ई-फेरफार प्रकल्पाचे काम अंतिम टप्यात असून राज्यातील 2 कोटी 51 लक्ष 7/12 पैकी 1 कोटी 67 लक्ष  गाव नमुना नं. 7/12 डिजिटल स्वाक्षरीत करण्याचे काम पुर्ण झाले असून, ते आज पासून राज्यातील जनतेला पेमेंट गेटवे द्वारे  उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
         राज्य शासनाच्या महसूल विभागाचे दिशानिर्देशान्वाये  राष्ट्रीय सुचना विज्ञान केंद्र पुणे ( NIC) यांचे मदतीने जमाबंदी आयुक्त कार्यालयाने महाभूमी पोर्टल ची निर्मिती केली असून https://mahabhumi.gov.in या पोर्टलची निर्मिती डिजिटल इंडिया मिशन अंतर्गत राष्ट्रीय भूमी अभिलेखांचे आधुनिकीकरण कार्यक्रमाअंतर्गत अनेक अडथळे पार करत सुरु असलेला ई फेरफार प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे . या अंतर्गत राज्यातील २ कोटी ५१ लक्ष गाव नमुना नं ७/१२ चे संगणकीकरण पूर्ण केलेअसून सदरचे सर्व ७/१२ राज्याचे भूलेख संकेतस्थळावर ( विना स्वाक्षरीत स्वरूपात ) उपलब्ध आहेत . तथापि हे विनास्वक्षारीत ७/१२ फक्त माहितीसाठी असल्याने ते कोणत्याही शासकीय किंवा कायदेशीर कामासाठी ग्राह्य धरले जात नाही . त्यामुळे राज्य शासनाने डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ जनतेला उपलब्ध करून देण्याचा मानस व्यक्त केला होता व त्याप्रमाणे १ मे ,२०१८ रोजी मा. मुख्यमंत्री महोदय यांचे शुभ हस्ते  व मा. महसूल मंत्री महोदयांचे उपस्थितीत डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ च्या सेवेचा शुभारंभ करणेत आला होतां तथपी क्लाऊड पोलिसी नंतर आलेले अडथळे पार करत ई फेरफार प्रकल्प आत्ता अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत आहे .
    यां अंतर्गत सुरु असलेल्या अनेक सुविधांपैकी डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ आज पासून पेमेंट गेटवे चा वापर करून जनतेला खुला करून देनेत आला आहे .
   डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ ची वैशिष्ट्ये ----
 १.        या 7/12 वर डिजीटल स्वाक्षरीत केल्याचा दिनांक वेळ नमूद असेल तसेच या नंतर त्यमध्ये काही बदल झाला असल्यास त्याचा देखील तपशील तळटीप म्हणून छापण्यात येणार आहेत.२.        अशा प्रत्येक 7/12 वर 16 अंकी पडताळणी क्रंमाक (व्हेरीफिकेशन आयडी) देखील असेल त्याचे आधारे अश्या 7/12 ची वैधता याच महाभूमी पोर्टल वरून तपासता येईल.३.        डिजिटल स्वाक्षरीत प्रत्येक 7/12 वर क्यू आर कोड (QR Code ) देखील असेल त्याचे आधारे असा 7/12 डिजिटल स्वाक्षरीत झाला असल्याचे स्पष्ट होईल.४.        पडताळणी ७/१२ च्या प्रतीवर क्यूआर कोड नसेल व verification version / Not for official use असे नमूद असेल .५.         संगणकीकृत ७/१२ मधे काही त्रुटी असल्यास कोणत्याही खातेदार महाभूमी पोर्टल वरील ई हक्क (public data entry ) ही लिंक वापरुन दुरुस्ती साठी तलाठ्या कडे ऑनलाईन अर्ज करु शकतात.
६.        डिजिटल स्वाक्षरीत गाव.नमुना.नं. ७/१२ ची नक्कल फी फक्त 15 रुपये प्रती ७/१२ शासनाने निश्चित केली आहे .
       रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्हे वगळता अन्य जिल्हयातील काम  80 ते 85 % पूर्ण झाले असून आत्ता लवकरच त्याजिल्ह्यातील  देखील  7/12 डिजिटल स्वाक्षरीने जनतेला उपलब्ध होणार आहेत. राष्ट्रीय सुचना विज्ञान केंद्र, पुणे (NIC, Pune ) यांनी विकसीत केलेल्या महाभूमी या पोर्टलवर स्टेट बँक ऑफ इंडियाचा पेंमेट गेटवे  वापरून नक्कल फी  कोणत्याही व्यक्तीला ऑनलाईन डिजिटल पेमेंट भरून असा डिजिटल स्वाक्षरीत 7/12 प्राप्त करून घेता येईल.


MANY THINGS DONE AND MANY MORE TO BE DONE ! 
  


https://mahabhumi.gov.in
महाभूमी पोर्टल - महसूल विभाग

रामदास जगताप
दि २०.९.२०१९





(रामदास जगताप)
उपजिल्हाधिकारी तथा राज्य समन्वय
ई फेरफार प्रकल्प , जमाबंदी आयुक्त कार्यालय , पुणे

Comments

Archive

Contact Form

Send