रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

१ कोटी ७० लाख डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ जनतेला पेमेंट गेटवे मार्फत ऑनलाईन उपलब्ध



नमस्कार मित्रांनो ,
  विषय - १ कोटी ७० लाख डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ जनतेला पेमेंट गेटवे मार्फत प्रत्येकी  रु.१५ भरून ऑनलाईन उपलब्ध 


                               शासन आदेशाने दि. २० सप्टे,२०१९ पासून जनतेला उपलब्ध करून दिलेल्या १ कोटी  ६७ लक्ष डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ मध्ये आणखी साडेतीन लाख ७/१२ ची भर पडली असून दि २३ .९.२०१९ अखेर १ कोटी ७० लाख ५० हजार डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ राज्यातील जनतेला मह्भूमी पोर्टल ( https;//aapleabhilekh.mahabhumi.gov.in/dslr  ) वरून प्रत्येकी 15 रुपये भरून उपलब्ध झाले आहे . आज दिनांक २४.९.२०१९ साय अखेर सुमारे ३००० सातबारा देखील डाऊनलोड झाले आहेत .

                                महसूल विभागाच्या या सुविधे बाबत जनमानसातून कौतुक करणेत येत असून तलाठी , मंडळ अधिकारी व सर्व महसूल अधिकारी यांनी गेले ३/४ वर्षे दिवस रात्र केलेल्या कामाचे चीज होत आहे . राज्यभरातून डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ च्या या सेवेबद्दल चांगल्या प्रतिक्रिया व्यक्त करणेत येत असून आज राज्याचे मुख्य सचिव मा. अजोय मेहता यांनी देखील या बद्दल महसूल विभागाचे अभिनंदन केले आहे . अनेक महसूल अधिकारी यांनीन देखील अत्यंत अवघड व किचकट असा हा ई फेरफार प्रकल्प अंतीम टप्प्याकडे येत असल्याने समाधान व्यक्त करून आपल्या सर्वांचे कौतुक केले आहे तरीही अदयाप  आपल्याला खूप काम करायचे आहे .

१. ८१ लाख ७/१२ डिजिटल स्वाक्षरीत करणे बाकी आहे
२. फेरफार झाल्या नंतर व पीक पाहणी झाल्यानंतर होणारे बदल डिजिटल स्वाक्षरीत करण्यासाठी ची सुविधा लवकरच तलाठी व मंडळ अधिकारी यांना उपलब्ध करून दिली जाणार आहे .
३. ODC अहवाल १ ते ४२ मध्ये असलेले ७/१२ दुरुस्त करण्यासाठी दिलेली कलम १५५ च्या आदेशाने दुरुस्ती ही सुविधा वापरून लवकरात लवकर हे ७/१२ दुरुस्त करून डिजिटल स्वाक्षरीत करणेत यावेत .
४. आपल्या अपार कष्टामुळेच हे शक्य झाले आहे त्यामुळे वर्तमानपत्रात आलेल्या बातमी वरून नाराज न होता आपण आपले कर्तव्य आणखी चांगल्या पद्धतीने निभावल्यास आपल्या बद्दल ची जनतेची भावना आणखी सकारात्मक होईल यात मला शंका वाटत नाही .
५. कलम १५५ च्या दुरुस्ती सुविधा मध्ये तहसीलदार यांनी दुरुस्ती साठी मान्यता दिल्या शिवाय तलाठी दुरुस्त्या करू शकत नाही व परिशिष्ट क मधील आदेश स्वाक्षरीत करून दिल्या शिवाय मंडळ अधिकारी हा फेरफार मंजूर करू शकत नाही हे लक्षात घेवून तहसीलदार यांनी काम करावे अशी विनंती करणेत येत आहे .

आपला

रामदास जगताप
दि २४.९.२०१९ 

Comments

Archive

Contact Form

Send