रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

संगणकीकृत ७/१२ वर खातेदाराचे पहिले नाव, मधले नाव व आडनाव या पध्दतीने संपूर्ण नाव भरणेबाबत.


                                                                                                              
 प्रति,
          उप जिल्हाधिकारी तथा डी.डी.ई .
     औरंगाबाद , जालना , बीड , उस्मानाबाद ,
     परभणी , हिंगोली , नांदेड व लातूर

                        विषय :-  संगणकीकृत ७/१२  वर खातेदाराचे पहिले  नाव, मधले नाव आडनाव या पध्दतीने  संपूर्ण नाव भरणेबाबत.

                    उपरोक्त विषयांकीत प्रकरणी DILRMP अंतर्गत तयार करण्यात आलेल्या संगणकीकृत गा.न.नं.७/१२ मध्ये अनेक ठिकाणी खातेदारांचे / भोगवटादार यांचे संपूर्ण नाव  नमूद केलेचे दिसून येत नाही .
                   ई फेरफार प्रणालीच्या कामकाजामधील कार्यपध्दतीबाबत दिनांक 02/08/2019    03/08/2019  रोजी अनुक्रमे नांदेड औरंगाबाद येथे औरंगाबाद विभागाचे  प्रशिक्षण घेण्यात आले. या प्रशिक्षणात संगणकीकृत सातबाऱ्यात खातेदाराचे नांव, मधले नांव आडनाव असे  संपूर्ण नाव नमूद नसलेल्या ७/१२ वर नमूद करण्यासाठी विशेष मोहीम घेनेत यावी अश्या सूचना दिल्या आहेत. कोणत्याही गावात एकाच नावाचे  अनेक खातेदार असतील तर अश्या खातेदारांचे टोपण नाव नचुकता भरणे आवश्यक आहे .  
                     सध्यास्थितीत  पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा  निधी वितरीत करणेसाठी   अनेक खातेदारांची परिपुर्ण नावे उपलब्ध झालेली आहेत. त्यानुसार संगणकीकृत सातबाऱ्यातील नावात दुरूस्ती करण्यात यावी, जेणेकरून जनतेला अचूक ७/१२  उपलब्ध करून देणेचा उद्देश सफल होईल.
        सर्व तहसीलदार व उप विभागीय अधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रात कोणत्याही खातेद्राचे अपूर्ण नाव नमूद  नाही ना ? ह्याची ODC अहवाल ६ वरून खात्री करावी. सदरच्या मार्गदर्शक सूचना सर्व वापरकर्ते यांच्या निदर्शनास आणाव्यात ही विनंती .
     
 आपला विश्वासू
    

    रामदास जगताप

    राज्य समन्वयक, - फेरफार प्रकल्प           

Comments

Archive

Contact Form

Send